गेल्या अनेक दिवसांपासून असे दिसत आहे कि जवळपास सर्व स्मार्टफोन कंपन्या आपल्या फोन मध्ये दिली जाणारी फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीची मर्यादा वाढवण्याचे प्रयत्न करत आहेत. या यादीत स्मार्टफोन निर्माता कंपनी शाओमी, ओप्पो, वनप्लस, वीवो इत्यादींचा समावेश आहे. अलीकडेच माहिती समोर आली होती कि शाओमी गेल्या वर्षी मार्च मध्ये सादर केलेल्या 100W सुपर चार्ज टर्बो फास्ट चार्जिंग सह स्मार्टफोन सादर करू शकते. प्रसिद्ध टिप्स्टर इशान अग्रवालने याची माहिती दिली आहे कि Realme जुलै मध्ये 100W सुपर चार्जिंग टेक्नॉलॉजी आपल्या फोन मध्ये घुएन येऊ शकते, ज्यामुळे फोन काही मिनिटांत चार्ज होईल.
इशान अग्रवालने केलेल्या ट्विटनुसार हि टेक्नॉलजी अल्ट्रा डार्ट चार्ज चार्जिंगच्या नावाने सादर केली जाईल. या टेक्नॉलॉजीच्या मदतीने 4000mAh ची बॅटरी 33 टक्क्यांपर्यंत फक्त 3 मिनिटांत चार्ज केली जाईल. सर्वात आधी हि टेक्नॉलॉजी कोणत्या स्मार्टफोन मध्ये दिली जाईल हि माहिती अजूनतरी समोर आलेली नाही. सोबतच कंपनीने पण याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.
A reliable source tells me that #realme’s developing a 100W+ fast charging tech to be revealed in July. It might be called "Ultra Dart" and can charge 1/3rd of a 4000mah+ battery in just 3 mins.
As you can see in the image, 11660mA indicates almost 120W of charging speed. pic.twitter.com/tfjJZFHiPx
— Ishan Agarwal (@ishanagarwal24) July 9, 2020
याआधी माहिती समोर आली होती थी कि Oppo द्वारे SuperVOOC 3.0 80W चार्जिंग टेक्नॉलॉजी सादर केली जाईल. या टेक्नॉलॉजी बाबत सांगण्यात आले होते कि हि 4,000mAh ची बॅटरी जवळपास 15 मिनिटांत चार्ज करेल, जी सध्याच्या टेक्नॉलॉजीने 30 मिनिटांत चार्ज केली जाते. लक्षात असू द्या कि SuperVOOC 2.0 कंपनीने Oppo Reno Ace सह गेल्यावर्षी ऑक्टोबर मध्ये सादर केली होती. तसेच हि फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी ओप्पोच्या दुसऱ्या हाई-एंड फोन्स जसे कि Oppo Find X2 आणि Find X2 Pro मध्ये पण दिसले होते.
शाओमी पण शर्यतीत सामील
काही रिपोर्ट्सनुसार कंपनी Mi Mix 4 मध्ये 100W चार्जिंगचा वापर करू शकते. अजूनतरी याबाबत कंपनीकडून कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. या टेक्नोलॉजीची पावर इतकी आहे कि यामुळे 4000mAh बॅटरी असलेला फोन पूर्णपणे फक्त 17 मिनिटांत चार्ज केला जाऊ शकतो. या टेक्नॉलजीचा वापर आतापर्यंत कंपनीने कोणत्याही फोन मध्ये केला नाही. पण माहितीनुसार कंपनी लवकरच 100W फास्ट चार्जिंग टेक्नॉलजी घेऊन येणार आहे.
या फोन मध्ये मिळू शकते सर्वात फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी
लेनोवोने अलीकडेच दावा केला आहे कि Lenovo Legion फोन 90W फास्ट चार्जिंग सह लॉन्च होईल. हा फोन या महिन्यात 22 जुलैला चीन मध्ये सादर केला जाईल. तसेच काही रिपोर्ट्स मध्ये सांगण्यात आले आहे कि अपकमिंग Black Shark स्मार्टफोन मध्ये जगातील सर्वात फास्ट चार्जिंग मिळू शकते. पण याची अधिकृतपणे माहिती मिळाली नाही.














