8जीबी रॅम सह लॉन्च होईल रियलमी 2 प्रो, किंमत पण असेल सर्वात कमी

मे महिन्यात ओपो ने आॅनलाइन ब्रँड रियलमी ची सुरवात केली होती आणि कंपनी ने रियलमी 1 आणला होता. तसेच गेल्या महिन्यात रियलमी ब्रँड अंतर्गत कंपनी ने दूसरा मॉडेल रियलमी 2 आणला आणि त्याचबरोबर 91 मोबाईल्सने माहिती दिली होती की कंपनी लवकरच रियलमी2 प्रो लॉन्च करू शकते आणि त्यानंतर कंपनी ने हे मान्य पण केले. काही दिवसांपूर्वी कंपनी ने यासाठी मीडिया इनवाट शेयर केला आहे ज्यात माहिती दिली आहे की 27 सप्टेंबरला हा फोन लॉन्च केला जाईल. तुम्हाला तर माहितीच आहे रियलमी फोन आपल्या चांगल्या स्पेसिफिकेशन सह अग्रेसिव प्राइस साठी ओळखला जातो आणि यावेळी पण असेच काहीसे होणार आहे.

नुकतेच लीक मधून समोर आले आहे की रियलमी 2 प्रो मध्ये एक वेरियंट 8जीबी चा असेल. त्यानुसार आज गीकबेंच वर हा मॉडेल लिस्ट करण्यात आला आहे. बेंचमार्क साइट गीकबेंच वर कंपनी ने हा फोन ओपो आरएमएक्स1807 नावाने लिस्ट केला आहे जो एंडरॉयड आॅपरेटिंग सिस्टम 8.1 वर आधारित आहे. तसेच फोनच्या सीपीयू आणि रॅम ची माहिती पण देण्यात आली आहे.

रियलमी 2 प्रो क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 660 चिपसेट सह लिस्ट करण्यात आला आहे. लिस्ट केलेल्या फोनचा प्रोसेसर क्लॉक स्पीड 1.84गीगाहट्र्ज चा आहे आणि हा आॅक्टाकोर आर्किटेक्चर वर आधारित आहे. तसेच फोनचा रॅम 7742 ए​मबी दर्शविण्यात आला आहे. यावरुन अंदाज लावला जात आहे की यात 8जीबी रॅम आहे.

गीकबेंच वर लिस्ट करण्यात आलेला रियलमी 2 प्रो ला सिंगल कोर वर 1452 स्कोर मिळाला आहे तर याला मल्टी कोर वर 5511 स्कोर मिळाला आहे. याव्यतिरिक्त इतर स्पेसिफिकेशन देण्यात आले नाहीत पण आता पर्यंत मिळालेल्या माहितीनुसार रियलमी 2 प्रो कंपनी 15,000 रुपये ते 20,000 रुपयांच्या आतील किंमतीत लॉन्च करेल. आशा आहे की रियलमी 2 प्रो मध्ये 6जीबी रॅम वेरियंट पण असेल. काही दिवसांपूर्वी कंपनी ने या फोनचा एक फोटो शेयर केला होता ज्यानुसार फोन मध्ये एयरड्रॉप नॉच सह डुअल कॅमेरा असेल. हा फोन ओपो एफ9 सारखा असेल.

रियलमी 2 किंमत पाहता देशात हा फोन दोन वेरिएंट मध्ये लॉन्च झाला आहे. फोनचा 3जीबी रॅम व 32जीबी स्टोरेज वेरिएंट 8,990 रुपयांमध्ये लॉन्च करण्यात आला आहे तसेच फोनचा 4जीबी रॅम व 64जीबी स्टोरेज वेरिएंट 10,990 रुपयांमध्ये सेल साठी उपलब्ध होईल. रियलमी 2 देशात शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वर एक्सक्लूसिव सेल साठी उपलब्ध आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here