अनेक दिवसांपासून बातम्या येत होत्या की Xiaomi चा सब-ब्रँड रेडमी आपल्या नव्या रेडमी नोट 10 सीरीज वर काम करत आहे. या सीरीज मध्ये येणारा फोन Redmi Note 10 Pro स्मार्टफोन अनेक सर्टिफिकेशन वेबसाइट्स सोबत ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) वेबसाइट वर दिसला होता, त्यामुळे संकेत मिळाले होते कि फोन लवकरच भारतात लॉन्च केला जाऊ शकतो. दरम्यान ई-कॉमर्स साइट अमेजॉन इंडिया वर 5G कनेक्टिविटी सह Redmi 10T विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे. लिस्टिंग मध्ये फोनची डिजाइन, स्पेसिफिकेशन्स, किंमत आणि कलर ऑप्शनची माहिती देण्यात आली आहे. पण हा विकत घेणे तुम्हाला महागात पडू शकते कारण ही एक फेक लिस्टिंग आहे.
रेडमी बिजनेस लीड स्नेहा तेनवाला यांनी ट्विट करून माहिती दिली आहे की कंपनीने आता पर्यंत रेडमी 10 टी नावाचा फोन सादर केला नाही आणि ग्राहकांना रेडमी फोन विकत घेताना Mi.com वर लिस्टिंग चेक करण्यास सांगितले आहे. अमेजॉन वर ‘जेनुइन ओरिजिनल’ आणि az अमेजकार्ट ’ नावाच्या विक्रेत्यांनी हा फोन फोन विक्रीस ठेवला आहे.
लिस्टिंगनुसार Redmi 10T 5G (6GB + 128GB) ची किंमत लूनार कलरसाठी 34,999 रुपये आणि कॉस्मिक ब्लॅक पर्याय आणि त्याच रॅम / स्टोरेज कॉन्फिगरेशनसाठी 33,999 रुपये द्यावे लागतील.
विशेष म्हणजे Redmi 10T ची डिजाइन आणि स्पेक्स Mi 10T फ्लॅगशिप फोन सारखे आहेत जो ऑक्टोबर मध्ये भारतात लॉन्च केला गेला होता आणि सध्या फ्लिपकार्टच्या माध्यमातून 35,999 रुपये (6GB + 128GB) मध्ये विकला जात आहे.
याचा अर्थ असा की दोन्ही विक्रेत्यांनी फोनचे नाव चुकीचे लिस्ट केले असण्याची शक्यता आहे, जसे देशातील काही ऑफलाइन स्टोर ‘Mi’ आणि ‘Redmi’ ब्रांडिंग मध्ये गोंधळून जातात (उदाहरणार्थ : Redmi Note 9 ऐवजी Mi नोट 9).
तुम्हाला सांगू इच्छितो की Xiaomi ने अधिकृतपणे असा कोणताही Redmi 10T फोन लॉन्च केला नाही, तुम्हाला या नकली लिस्टिंगची माहिती असावी असा आमचा उद्देश आहे. जर तुम्हाला Mi 10T विकत घ्यायचा असेल तर तो तुम्ही अधिकृतपणे विकत घ्यावा.
शाओमी मी 10टी वीडियो
















