Redmi K70 सीरीज लवकरच होऊ शकते लाँच, लीकमधून स्पेसिफिकेशन्सचा खुलासा

Highlights

  • ह्या सीरीजमध्ये 3 मॉडेल सादर होऊ शकतात.
  • Pro डिवाइसमध्ये स्नॅपड्रॅगन 8 जेन 3 चिपसेट असू शकतो.
  • टेलिफोटो कॅमेरा लेन्स देखील दिली जाऊ शकते.

मोबाइल निर्माता Xiaomi चा सब ब्रँड रेडमी लवकरच बाजारात Redmi K70 सीरीज लाँच करू शकते. ह्यात रेडमी के70, रेडमी के 70प्रो आणि रेडमी के 70ई सारखे 3 मॉडेल सादर होण्याची शक्यता आहे. लाँच पूर्वीच टिपस्टर डिजिटल चॅट स्टेशननं डिवाइसच्या खास स्पेसिफिकेशनची माहिती दिली आहे. ह्या लेखातून आपण लीक झालेली माहिती पाहणार आहोत.

Redmi K70 सीरीजची डिजाइन

ही सीरीज गेल्यावर्षी आलेल्या रेडमी के60 सीरीजचा अपग्रेड म्हणून बाजारात सादर केली जाऊ शकते. फोन्सच्या डिजाइनमध्ये जास्त बदल करण्यात आलेला नाही. डिवाइसमध्ये लेदर टेक्सचर्ड पॅनल असण्याची शक्यता आहे. तसेच जोडीला टेलीफोटो कॅमेरा मिळू शकतो. एकंदरीत हा डिवाइस मिड रेंज सेगमेंटमध्ये खूप लोकप्रिय ठरू शकतो.

रेडमी के70 सीरीज कधी येणार बाजरात (लीक)

कंपनीनं के70 सीरीजबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा केली नाही, परंतु लीकमध्ये माहिती मिळाली आहे की डिवाइस सर्वप्रथम चीनमध्ये लाँच होऊ शकतो. त्यानंतर ही पोको ब्रँडिंगसह ग्लोबल मार्केट आणि भारतात सादर केली जाऊ शकते.

Redmi K70 सीरीज स्पेसिफिकेशन्स (लीक)

  • डिस्प्ले : ह्या सीरीजच्या सर्व फोन्समध्ये 2K रिजॉल्यूशन असलेला डिस्प्ले मिळण्याची शक्यता आहे. ह्यात 120Hz रिफ्रेश रेट मिळू शकतो. तसेच, डिस्प्ले साइजचा खुलासा अद्याप झालेला नाही.
  • प्रोसेसर : Redmi K70 फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 8 जेन 2 चिपसेट मिळू शकतो, असं सांगण्यात आलं आहे. तर Redmi K70 Pro डिवाइसमध्ये स्नॅपड्रॅगन 8 जेन 3 चिपसेट दिला जाऊ शकतो. सीरीजच्या सर्वात लो मॉडेल Redmi K70e मध्ये Dimensity 8300 प्रोसेसर असू शकतो.
  • बॅटरी : के70 सीरीजचे स्मार्टफोन 5120mAh बॅटरीसह बाजारात येऊ शकतात, ज्यात 120W फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळू शकतो.
  • कॅमेरा : फोनमध्ये टेलिफोटो कॅमेरा लेन्स दिली जाऊ शकते.
  • OS : डिवाइस लेटेस्ट अँड्रॉइड 13 आधारित असू शकतो.
  • अन्य : फोनमध्ये ड्युअल सिम 5G सपोर्ट, वायफाय, ब्लूटूथ, फिंगरप्रिंट सेन्सर सारखे फीचर्स दिले जाऊ शकतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here