Redmi Note 13 Pro+ 5G फोनचे स्पेशल XFF Edition झाले लाँच, जाणून घ्या या नवीन रेडमी फोनमध्ये काय आहे खास

रेडमीने वर्षाच्या सुरुवातीला आपल्या नोट सीरिज अंतर्गत Redmi Note 13 Pro+ 5G फोन भारतात लाँच केला होता जो 31,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. आता आपल्या Xiaomi Fan Festival च्या निमित्ताने कंपनीने या मोबाईलचा एक नवीन आणि खास Redmi Note 13 Pro+ 5G Xiaomi Fan Festival Special Edition पण सादर केला आहे.

Redmi Note 13 Pro+ 5G चे स्पेशल एडिशन

रेडमी नोट 13 प्रो प्लस 5 जी फोनमध्ये एक विशेष प्रकाराचा XFF म्हणजे Xiaomi Fan Festival LOGO देण्यात आला आहे. हा बॅक पॅनलवर Mystic Silver मध्ये देण्यात आला आहे. फोनच्या रिअल पॅनलवर सिल्व्हर फिल्मची कोटिंग करण्यात आली आहे, ज्याच्या वरती ग्लास लेयर आहे. Redmi Note 13 Pro+ 5G चा हा स्पेशल एडिशन अनेक प्रकारच्या शाओमी फॅन फेस्टिवल (एक्सएफएफ) स्टीकर्ससह सादर करण्यात आला आहे. तसेच फोनमध्ये exclusive wallpapers पण देण्यात आले आहेत. हा एडिशन सध्या मलेशियामध्ये विकला जाईल.

Redmi Note 13 Pro+ 5G स्पेसिफिकेशन

  • 6.67″ 1.5K 3D Curved AMOLED
  • MediaTek Dimensity 7200-Ultra
  • 12GB RAM + 512GB Storage
  • 200MP Rear Camera
  • 16MP Selfie Camera
  • 120W HyperCharge
  • 5,000mAh Battery

डिस्प्ले : रेडमी नोट 13 प्रो मध्ये 2712 x 1220 पिक्सल रिजोल्यूशन असलेला 6.67 इंचाचा 1.5 के डिस्प्ले देण्यात आला आहे. ही स्क्रीन अ‍ॅमोलेड पॅनलवर बनली आहे जी 120 हर्ट्झ रिफ्रेश रेट, 240हर्ट्झ टच सॅम्पलिंग रेट, 1920 ​हर्ट्झ पीडब्ल्यूएम डिमिंग तसेच 1800 निट्स ब्राइटनेसला सपोर्ट करतो. फोनला इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर टेक्नॉलॉजीसह करण्यात आले आहे.

प्रोसेसिंग : Redmi Note 13 Pro+ 4 एनएम फॅब्रिकेशन आधारित मीडियाटेक डाइमेंसिटी 7200 अल्ट्रा ऑक्टा-कोर प्रोसेसरला सपोर्ट आहे जो 2.8 गीगाहर्ट्झ पर्यंतच्या क्लॉक स्पीडवर प्रोसेस करतो. तसेच ग्राफिक्ससाठी फोनमध्ये एआरएम जी 610 एमसी 4 जीपीयू आहे.

बॅक कॅमेरा : फोटोग्राफीसाठी ट्रिपल रिअर देण्यात आला आहे ज्यात 200 मेगापिक्सल प्रायमरी सेन्सर आहे. हा 1/1.4″ सेन्सर आहे जो एफ/1.65 अपर्चरवर चालतो. याला OIS आणि EIS टेक्नॉलॉजीसह करण्यात आले आहे. त्याचबरोबर बॅक पॅनलवर एफ/2.2 अपर्चर असलेला 8 मेगापिक्सल अल्ट्रा वाईड अँगल लेन्स तसेच एफ/2.4 अपर्चर असलेली 2 मेगापिक्सल मॅक्रो लेन्स आहे.

फ्रंट कॅमेरा : सेल्फी काढणे तसेच रिल्स बनविण्यासाठी Redmi Note 13 Pro Plus 5G फोन एफ/2.45 अपर्चर असलेला 16 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. या कॅमेऱ्याने 1080p@60fps व्हिडिओ रेकॉर्डिंग केली जाऊ शकते.

बॅटरी : रेडमी नोट 13 प्रो+ 5,000 एमएएच बॅटरीला सपोर्ट करतो. या फोनमध्ये 120 वॉट हायपर चार्ज टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आला आहे जो 19 मिनिटामध्ये याला 0 ते 100% पर्यंत चार्ज केला जाऊ शकतो. चार्जिंग फास्ट बनविण्यासाठी तसेच बॅटरी सुरक्षेसाठी फोनमध्ये Xiaomi Surge P1 चिप देण्यात आली आहे. हा रेडमी मोबाइल स्मार्ट चार्जिंग इंजिनला सपोर्ट करतो.

Redmi Note 13 Pro+ 5G फिचर्स

  • हा फोन 3.5 मिमी हेडफोन जॅक आणि आयआर ब्लास्टर सारखे फिचर्ससह आहे.
  • कनेक्टिव्हिटीसाठी यात ड्युअल सिम 5 जी, वायफाय 6, ब्लूटूथ 5.3 आणि एनएफसीला सपोर्ट देण्यात आला आहे.
  • त्याचबरोबर पाणी आणि धूळीपासून वाचण्यासाठी IP68 रेटिंग देण्यात आली आहे.
  • हा फोन 4000mm² VC Stainless Steel कूलिंग सिस्टमला सपोर्ट करतो.
  • गेमिंग दरम्यान फोनला हिटपासून वाचण्यासाठी HyperEngine 5.0 पण आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here