108MP कॅमेऱ्यासह येत आहे नवीन Redmi Note 9, Realme साठी असू शकते हि धोक्याची घंटा

चिनी कंपनी शाओमी बद्दल बातमी समोर येत आहे कि रेडमी नोट 9 च्या नवीन वर्जन वर काम करत आहे. या नवीन स्मार्टफोनची सर्वात मोठी खासियत 108 मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा असेल. याची माहिती टेक वेबसाइट GSMArena द्वारे देण्यात आली आहे. रिपोर्टनुसार याचा महिन्यात हा हँडसेट चीन मध्ये लॉन्च केला जाऊ शकतो. नवीन रेडमी नोट 9 स्मार्टफोन मध्ये फ्रंट फेसिंग कॅमेऱ्यासाठी डिस्प्ले मध्ये पंच-होल पण दिला जाईल. तसेच 6.67 इंचाचा IPS LCD डिस्प्ले मिळू शकतो, जो फुल एचडी+ रेजॉलूशन आणि 120Hz ऍडप्टिव रिफ्रेश रेट सह येईल.

108MP कॅमेऱ्यासह येईल नवीन रेडमी फोन

दुसरीकडे चायनीज टिप्स्टर डिजिटल चॅट स्टेशनने दावा केला होता कि शाओमी लवकरच रेडमी लाइनअप अंतगर्त 108 मेगापिक्सल कॅमेरा असलेला फोन घेऊन येणार आहे. या रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले होते कि फोन रेडमी नोट 9 सीरीजचा असेल आणि रेडमी नोट 10 सीरीजचा नाही. फोनचा प्राइमरी कॅमेरा 108 मेगापिक्सलचा असेल जो सॅमसंगचा ISOCELL HM2 सेंसर असेल. सॅमसंगचा हा सेंसर 0.7-माइक्रोन पिक्सल आणि 1/1.52 इंच सेंसर साइजचा असेल.

हे देखील वाचा : iPhone 12 Mini प्रमाणे Xiaomi घेऊन येऊ शकते Redmi Mini, जाणून घ्या खासियत

Redmi Note 9 Pro Max

स्पेसिफिकेशन्स पाहता Redmi Note 9 Pro Max मध्ये 6.67-इंचाचा फुल एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. फोन मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 720G प्रोसेसर देण्यात आला आहे. डिवाइस मध्ये 8GB पर्यंतचा रॅम आणि 128GB पर्यंतची स्टोरेज देण्यात आली आहे. तसेच फोटोग्राफीसाठी फोन मध्ये क्वाड कॅमेरा सेटअप आहे. यात रियर वर 64 मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा, 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल लेंस, 5 मेगापिक्सलचा मॅक्रो लेंस आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेंसर देण्यात आला आहे. सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी फोन मध्ये 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. पावर बॅकअपसाठी फोन मध्ये 5020एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे जी 33 वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट सह येते. फोनच्या बॉक्स मध्ये पण 33 वॉटचा चार्जर आहे.

हे देखील वाचा : Xiaomi ने आणला स्वस्त Redmi 9i स्मार्टफोन, Realme च्या अडचणीत वाढ

या फोन मध्ये कंपनीने नाविक सपोर्ट दिला आहे. नाविक भारताची सॅटेलाइट नेविगेशन सिस्टम आहे. जशी अमेरिकेकडे जीपीएस आहे, रशियाकडे ग्लोनॉस आहे, यूरोप कडे गॅलीलियो आहे, चीन कडे बायडू (BeiDou) नेविगेशन सिस्टम आहे, तशीच भारताकडे नाविक (NavIC) आहे. नाविक नेविगेशनच्या माध्यमातून पाच मीटर पर्यंत अचूक माहिती मिळवता येईल.

सोर्स

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here