जियो सेलिब्रेशन पॅक मध्ये मिळत आहे 10जीबी 4जी डेटा फ्री, जाणून घ्या कसा मिळवावा लाभ

आधी फक्त कॉलिंग पॅक बदल बोलले जायचे पण रिलायंस जियो आल्यापासून संपूर्ण भारत 4जी—4जी करत आहे. जरी अनेक लोक स्लो इंटरनेटची तक्रार करत असले तरी जेवढा डेटा रिलायंस जियो देते तेवढा डेटा इतर कोणताही आॅपरे​टर देत नाही. संधी मिळताच कंपनी थोडाफार अ​तिरिक्त डेटा यूजर्सना देतेच. मागे सप्टेंबर मध्ये कंपनी ने दोन वर्ष पूर्ण केले म्हणून यूजर्सना पुन्हा एकदा 10जीबी अतिरिक्त डेटा दिला जात आहे.

कंपनी ने याला जियो सेलिब्रेशन पॅकचे नाव दिले आहे ज्या अंतर्गत यूजर्सना हे बेनिफिट देण्यात येत आहे. जियो कडून हा 10जीबी एक साथ देण्यात येत नाही तर कंपनी हा 5 दिवसांसाठी देत आहे ज्यात तुम्ही रोज 2जीबी 4जी डेटा वापरू शकता. पण हि आॅफरप्रत्येकाला मिळणार नाही. आम्हाला पण दोन जियो नंबर पैकी फक्त एकात हि ऑफर मिळाली. विशेष म्हणजे हि आॅफर 49 रुपयांचा मासिक पॅक असणाऱ्या जियो नंबर वर मिळाली आहे.

जर तुम्हाला हा डेटा लाभ मिळाला असेलतर ठीक अन्यथा तुम्ही माय जियो ऍप मध्ये जाऊन हा चेक करू शकता. यासाठी तुमच्या फोन मध्ये माय ऍप असणे आवश्यक आहे नसेल तर आधी गूगल प्ले स्टोर मध्ये जाऊन हा ऍप इंस्टॉल करा.

त्यानंतर तुम्हाला तुमच्या नंबर ने लॉगिन करावी लागेल. तिथे वरच्या बाजूला मेन्यू आॅप्शन येईल. त्यात तुम्हाला माय प्लान मध्ये जावे लागेल. तिथेच तुम्हाला एक्सट्रा डेटाची माहिती मिळेल. जर तिथे काही माहिती नसेल तर तुम्हाला हा डेटा मिळणार नाही असे समजावे.

तसेच कंपनीने दिवाळीनिमित्त जियोफोन फेस्टिवल आॅफर सुरु केली आहे ज्यात तुम्ही कमी किंमतीत जियोफोन घेऊ शकता. त्याचबरोबर कपंनी प्रीपेड प्लान आॅफर पण देत आहे, संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here