Jio चा सर्वात स्वस्त 84 दिवस असलेला प्लान, तुम्हाला माहित आहे का याबाबत

रिलायंस जियो आपल्या स्वस्त प्रीपेड प्लान्समध्ये जास्त बेनिफिट्स देण्यासाठी ओळखली जाते. कंपनी अनेक दिवस आपल्या ग्राहकांसोबत दुसऱ्या कंपन्यांच्या युजर्सना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहे. आज आम्ही तुम्हाला कंपनीच्या एका अश्या प्लानबाबत सांगणार आहोत जो खूप फेमस आहे. तसेच 84 दिवसांच्या वैधतेसह कंपनीचा सर्वात स्वस्त प्लान आहे. या प्लानची किंमत फक्त 329 रुपये आहे. तर दुसऱ्या कंपन्यांच्या प्लानची किंमत 350 पेक्षा जास्त आहे. (Reliance Jio cheapest 84 days validity plan with 6GB data)

329 रुपयांचा जियो प्लान

Jio च्या 329 रुपयांच्या रिचार्जबद्दल बोलायचे तर हा 84 दिवसांची वैधता असलेला सर्वात स्वस्त प्लान आहे. तसेच या प्लानमध्ये युजर्सना 6GB हाई-स्पीड डेटा मिळतो. हा हाई-स्पीड डेटा संपल्यावर स्पीड 64Kbps होतो. म्हणजे तुम्ही तुम्हाला अनलिमिटेड डेटा वापरू शकता.

हे देखील वाचा : Poco घेऊन येत आहे आपला पहिला 5G स्मार्टफोन Poco M3 Pro, कमी किंमतीत करेल धमाकेदार एंट्री

डेटा आणि वैधताव्यतिरिक्त या प्रीपेड प्लानमध्ये Jio युजर्सना दुसऱ्या नेटवर्कवर कॉलिंग अनलिमिटेड मिळेल. त्याचबरोबर ग्राहक 1000 एसएमएस फ्री पाठवू शकतील. जियो अ‍ॅप्सचे सब्सक्रिप्शन पण कंपनी मोफत देत आहे.

Airtel-Jio दरम्यान कोणता सौदा झाला?

Reliance Jio आणि Airtel दरम्यान दिल्ली, मुंबई आणि आंध्र प्रदेश सर्कलमध्ये 800Mhz बॅंडमध्ये काही स्पेक्ट्रम विकत घेण्याचा समझौता झाला आहे. यानुसार रिलायंस जियोला 800Mhz बॅंड मध्ये जो अतिरिक्त स्पेक्ट्रम मिळेल, त्याचा वापर करून कंपनी आंध्र प्रदेश, दिल्ली आणि मुंबईमध्ये आपल्या ग्राहकांना चांगली सेवा देऊ शकेल. कंपनी याचा सर्वात जास्त भाग आंध्र प्रदेशात वापरेल, जो 3.75Mhz असेल. तसेच दिल्लीमध्ये 1.25 आणि मुंबईत 2.50 मेगाहर्ट्ज अतिरिक्त स्पेक्ट्रमचा वापर केला जाईल. निश्चितपणे अतिरिक्त स्पेक्ट्रममुळे जियो ग्राहकांना भविष्यात चांगली सेवा मिळू शकेल.

हे देखील वाचा : WhatsApp वर आलेल्या या मेसेजपासून रहा सावधान, क्लिक करताच…

या डीलमुळे एयरटेलला किती पैसे मिळाले?

रिलायंस जियोने दिलेल्या माहितीनुसार हा सौदा 1,497 कोटी रुपयांचा आहे. पण एयरटेलने एका विधानात सांगितले, “या समझौत्यामुळे, एयरटेलला 1037.6 कोटी रुपये मिळाले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here