Poco घेऊन येत आहे आपला पहिला 5G स्मार्टफोन Poco M3 Pro, कमी किंमतीत करेल धमाकेदार एंट्री

POCO बद्दल अनेक दिवसांपासुन बातमी समोर येत आहे कि कंपनी भारतीय बाजारात आपला नवीन आणि पहिला 5G फोन POCO M3 Pro स्मार्टफोन लॉन्च करण्याची प्लानिंग करत आहे. आतापर्यंत कंपनीने याबाबत कोणतीही ऑफिशियल माहिती दिली नाही. अलीकडेच BIS आणि FCC सर्टिफिकेशन साइटवर Poco M3 Pro 5G स्मार्टफोन स्पॉट केला गेला होता. आता फोन Indonesia Telecom certification वर लिस्ट झाला आहे. यावर्षीच्या सुरुवातीला पोकोने आपला Poco M3 स्मार्टफोन आणला होता आणि या हँडसेटची किंमत 12 हजार रुपये ठेवण्यात आली होती. त्यामुळे आशा आहे कि या फोनचा अपग्रेडेड वर्जन म्हणून कंपनी पोको एम3 प्रो लॉन्च करण्याची योजना बनवत आहे. (Poco M3 Pro Indonesia telecom certification launch soon)

POCO M3 Pro 5G

POCO M3 Pro इंडोनेशिया टेलीकॉम सर्टिफिकेशनवर मॉडेल नंबर M2103K19PG सह लिस्ट केला गेला आहे. तसेच लिस्टिंगमध्ये फोनच्या नावाचा उल्लेख केलेला नाही. आम्हाला आधीपासून माहित आहे कि हा मॉडेल नंबर कंपनी POCO M3 Pro 5G नावाने सादर करेल. गेल्या आठवड्यात झालेल्या IMEI डेटाबेसवर लिस्टिंगवर याची माहिती समोर आली होती.

हे देखील वाचा : OPPO A74 5G भारतात लाॅन्च, देशातील सर्वात स्वस्त 5जी फोन्समध्ये झाला समावेश

आतापर्यंत समोर आलेले रिपोर्ट्स पाहता माहिती मिळाली आहे कि Poco M3 Pro स्मार्टफोन Redmi Note 10 5G चा रीब्रँडेड वर्जन असू शकतो जो ग्लोबल मार्केटमध्ये अलीकडेच मॉडेल नंबर M2103K19G सह आला होता. पण अजूनतरी कंपनीने याबाबत कोणतीही माहिती दिली नाही.

POCO M3 Pro 5G चे स्पेसिफिकेशन्स

याआधी एफसीसी लिस्टिंगवरून संकेत मिळाले होते कि पोको एम3 प्रो स्मार्टफोन 22 वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट, मीयुआय 12 आणि ब्लूटूथ वर्जन 5.1 सपोर्टसह सादर केला जाईल. तसेच जर हा अपकमिंग Poco फोन रेडमी नोट 10 5जी चा रीब्रँडेड वर्जन असला तर फोनमध्ये कोणते फीचर्स असतील तर ते आधीच समजतील.

फोनमध्ये 6.5 इंचाचा फुलएचडी+ एलसीडी डिस्प्ले, 20:9 आस्पेक्ट रेशियो, 90 हर्ट्ज रिफ्रेश रेट, ब्राइटनेस 1100 निट्स आणि प्रोटेक्शनसाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 3 चा वापर केला जाऊ शकतो.

हे देखील वाचा : Moto G60 स्मार्टफोन Snapdragon 732G चिपसेट, 108MP कॅमेरा आणि 6000mAh बॅटरीसह लॉन्च, जाणून घ्या किंमत

हा भारतात पोकोचा पहिला मीडियाटेक चिपसेट असलेला पण स्मार्टफोन असू शकतो. लक्षात असू द्या कि Redmi Note 10 5G मध्ये MediaTek Dimensity 700 SoC सह ग्राफिक्ससाठी माली-जी 57 एमसी2 जीपीयू, 4 जीबी रॅम आणि 128 जीबी यूएफएस 2.2 स्टोरेज आहे.

Source

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here