WhatsApp वर आलेल्या या मेसेजपासून रहा सावधान, क्लिक करताच…

भारतात कोरोना विषाणूची दुसरी लाट खूप धोकादायक स्थरावर पोहोचली आहे. रोज येणाऱ्या केसेस नवीन रेकॉर्ड बनवत आहेत जे भीतीदायक आहे. राज्य सरकार यावर नियंत्रण मिळवण्यासाठी शक्य तितके प्रयत्न करत आहे. पण या दरम्यान एका इंजेक्शनची कमतरता सगळीकडे दिसत आहे, ज्याचा काळाबाजार मोठ्याप्रमाणावर होत आहे आणि तो आहे रेमडेसिवीर (Remdesivir) इंजेक्शन. काळाबाजारीव्यतिरिक्त दुसरीकडे व्हाट्सअ‍ॅपवर एक मेसेज वायरल होत आहे, ज्यात रेमडेसिविर इंजेक्शन मेडिकल स्टोर्सवर 4000 रुपयांपेक्षा जास्त किंमतीत विकला जात आहे, पण पंतप्रधान जन औषधी केंद्रावरून तुम्ही हा फक्त 899 रुपयांमध्ये विकत घेता येईल. पण या मेसेजमागील सत्य भयानक आहे जे तुम्हाला माहित असावे.(Remdesivir Injection in just RS 899 Pradhanmantri Jan Aushadhi Kendra Whatsapp viral message)

Whatsapp वर वायरल होत आहे मेसेज

सध्या व्हाट्सअ‍ॅपवर एक मेसेज येत आहे, ज्यात लिहिण्यात आले आहे कि कोणाला रेमडेसिविर इंजेक्शनची गरज असेल तर हा मेडिकल स्टोरद्वारे चार्ज केल्या जाणाऱ्या 4000 रुपयांच्या जागी फक्त 899 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तुम्ही हा थेट पंतप्रधान भारतीय जन औषधी केंद्रवरुन विकत घेता येईल. पंतप्रधान जन औषधी केंद्र भारताच्या जवळपास सर्व शहरांमध्ये आहे.

इतकेच नव्हे तर मेसेजमध्ये उल्लेख केला गेला आहे कि पंतप्रधान भारतीय जन औषधी केंद्रावरून हा इंजेक्शन घेण्यासाठी काही डॉक्यूमेंट्सची आवश्यकता पडेल. तसेच या मेसेजमध्ये एक लिंक http://janaushadhi.gov.in/StoreDetails.aspx दिला जात आहे जी पूर्णपणे फेक आहे.

हे देखील वाचा : Moto G60 स्मार्टफोन Snapdragon 732G चिपसेट, 108MP कॅमेरा आणि 6000mAh बॅटरीसह लॉन्च, जाणून घ्या किंमत

रुग्णाचा आधार कार्ड

कोविड पॉजिटिव रिपोर्ट

ओरिजिनल डॉक्टर प्रिस्क्रिप्शन

मेडिसिन घेणाऱ्या व्यक्तीचा आधार कार्ड

मेसेजचे सत्य

तुम्हाला सांगू इच्छितो कि पंतप्रधान जन औषधी केंद्राच्या ऑफिशियल वेबसाइटवर देण्यात आलेल्या माहितीनुसार वेबसाइटच्या माध्यमातून रेमडेसिवीर इंजेक्शन विकले जात नाही. पंतप्रधान जन औषधी केंद्राच्या दुकानात पण असे कोणतेही इंजेक्शन मिळत नाही.

Whatsapp Fake मेसेज

व्हाट्सअ‍ॅपवर अश्या खोट्या मेसेजबद्दल वेळोवेळी अलर्ट जारी केला जातो. तुम्ही काही पॉईंट्सद्वारे या फेक मेसेजपासून स्वतःला आणि तुमच्या कुटुंबियांना वाचवू शकता.

हे देखील वाचा : Poco घेऊन येत आहे आपला पहिला 5G स्मार्टफोन Poco M3 Pro, कमी किंमतीत करेल धमाकेदार एंट्री

व्हाट्सअ‍ॅपवर कोणत्याही अनोळखी नंबरवरून आलेल्या मेसेजवर विश्वास ठेवू नका.

प्रत्येक लिंकवर क्लिक करण्यापासून वाचा.

कोणताही असा मेसेज फॉरवर्ड करू नका.

कोणत्याही व्हाट्सअ‍ॅपवर अकाउंट डिटेल्स शेयर करू नका.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here