Jio 2023 Plan सादर; 2.5GB डेली डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि एसएमएसही

Jio Happy New Year Offer 2023: आकाश मुकेश अंबानींच्या टेलीकॉम कंपनी Reliance Jio नं नवीन वर्षानिमित्त आपल्या युजर्ससाठी एक खास ऑफर सादर केली आहे. या Jio Offer अंतगर्त कंपनीनं 2023 रुपयांचा स्पेशल रिचार्ज प्लॅन सादर केला आहे, ज्यात एकूण 630GB डेटा सोबतच फ्री कॉलिंग आणि काही जियो अ‍ॅप्सचं फ्री सब्सक्रिप्शन मिळेल. चला जाणून घेऊया या प्लॅनमध्ये तुम्हाला रोज किती डेटा आणि क्या लाभ मिळतील इन सब सवालों बाबत आगे पूरी माहिती देते आहेत.

Jio 2023 प्लॅनची माहिती

जियोच्या या 2023 रुपयांच्या नव्या प्लॅनमध्ये युजर्सना रोज 2.5 जीबी डेटा मिळणार आहे. त्या हिशोबाने एकूण वैधतेसाठी कंपनी युजर्सना एकूण 630 जीबी डेटा वापरण्यासाठी देत आहे. तसेच या प्लनंदाचे युजर्सना कोणत्याही अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंगचा फायदा मिळत आहे. यामुळे ग्राहक ऑन आणि ऑफ नेटवर्क अमर्याद कॉलिंग करू शकतात. तसेच लोकल आणि एसटीडी नंबर्सवर एसएमएस पाठवण्यासाठी डेली 100 एसएमएस मोफत मिळतील. हे देखील वाचा: पुणेकरांना मिळणार मोफत 5G ची मजा; निवडक ठिकाणी Airtel 5G Plus उपलब्ध, पाहा यादी

जियोच्या या 2023 रुपयांच्या नव्या प्लॅनची वैधता 252 दिवस आहे म्हणजे हा एक लॉन्ग टर्म रिचार्ज प्लॅन आहे – रिलायन्स जियो युजर्सना कंपनीकडून मिळणारा अतिरिक्त फायदा म्हणजे Jio Apps चा अ‍ॅक्सेस. कंपनीच्या नवीन 2023 रुपयांच्या प्लॅनमध्ये देखील जियोकडून JioCinema, JioTV, JioSecurity आणि JioCloud सारख्या अ‍ॅप्सचं मोफत सब्सक्रिप्शन देण्यात आलं आहे.

नोट: हा जियोचा पहिला 5G रिचार्ज प्लॅन म्हणता येईल कारण कंपनी या प्लॅनसह 5G डेटा ऑफर करत आहे. तसेच कॉम्प्लिमेंट्री प्राइम मेंबरशिप नव्या युजर्सना मिळेल.

कधी पर्यंत असेल Jio New Year Offer?

तुम्हाला पण प्रश्न पडला असेल की ही ऑफर कधीपर्यंत उपलब्ध असेल. जर तुम्हालाही या ऑफरचा फायदा घ्यायचा असेल तर लवकरच रिचार्ज करा कारण कंपनी पुढील वर्षाच्या पहिल्या आठवड्यात ही ऑफर बंद करू शकते. परंतु ही काही अधिकृत माहिती नाही कारण कंपनीनं या ऑफरच्या लास्ट डेटबद्दल कोणतीही माहिती दिली नाही. हे देखील वाचा: फक्त 499 रुपयांमध्ये करा बुक; 115Km च्या जबरदस्त रेंजसह आली BGAUSS BG D15 इलेक्ट्रिक स्कूटर

नवीन 749 रुपयांचा प्लॅन देखील केला लाँच

विशेष म्हणजे जियोनं अलीकडेच आणखी एक नवा प्लॅन सादर केला आहे. जियोनं 90 दिवसांची वैधता असलेला एक नवीन रिचार्ज प्लॅन सादर केला होता. या रिचार्ज प्लॅनची किंमत 749 रुपये आहे, ज्यात ग्राहकांना रोज 2 जीबी 5जी इंटरनेट डेटा दिला जात आहे. तसेच डेली 100 फ्री एसएमएस, अनलिमिटेड कॉलिंग आणि जियो अ‍ॅप्सचा फायदा मिळेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here