पुणेकरांना मिळणार मोफत 5G ची मजा; निवडक ठिकाणी Airtel 5G Plus उपलब्ध, पाहा यादी

Bharti Airtel ही भारतातील पहिली टेलिकॉम कंपनी आहे जिने भारतात 5G सर्व्हिस सुरु केली होती. तेव्हापासून कंपनी झपाट्यानं 5G Plus चा विस्तार करत आहे. गेली काही दिवस कंपनी सतत घोषणा करत आहे. आज एयरटेलनं घोषणा केली आहे की पुण्यातील नागरिकांसाठी आता 5जी सर्व्हिस (Airtel 5G Plus In Pune) लाइव्ह करण्यात आली आहे. याचा अर्थ असा की इतर शहरांप्रमाणे पुण्यातील एयरटेल युजर्स देखील आता कोणताही अतिरिक्त खर्च न करता 5जी वापरू शकतील. कंपनीकडे एक चांगलं 4जी नेटवर्क इन्फ्रास्ट्रक्चर असल्यामुळं एयरटेल भारतभर 5जीचा विस्तार नॉन स्टॅन्ड अलोन पद्धतीनं करत आहे त्यामुळे चांगला स्पीड मिळत आहे. चला पाहूया पुण्यातील कोणत्या भागांमध्ये Airtel 5G Plus उपलब्ध झालं आहे.

पुण्यातील या भागांमध्ये मिळणार Airtel 5G Plus ची सेवा

एयरटेलनं दिलेल्या माहितीनुसार पुण्यातील पुढील भागांमध्ये आता 5जी नेटवर्क उपलब्ध झालं आहे. यात कोरेगाव पार्क, कल्याणी नगर, बाणेर, हिंजवडी, मगरपट्टा, हडपसर, खराडी, मॉडेल कॉलनी, स्वारगेट, पिंपरी-चिंचवड आणि इतर काही निवडक ठिकाणांचा समावेश आहे. तसेच लवकरच शहरातील इतर भागांमध्ये देखील लवकरच 5जी उपलब्ध होईल, अशी माहितीही कंपनीनं दिली आहे. हे काम टप्याटप्यात सुरु आहे. हे देखील वाचा: फक्त 499 रुपयांमध्ये करा बुक; 115Km च्या जबरदस्त रेंजसह आली BGAUSS BG D15 इलेक्ट्रिक स्कूटर

19 शहरांमध्ये एयरटेल 5जी

एयरटेलचं 5जी नेटवर्क आता एकूण 19 शहरांमध्ये पोहोचलं आहे. यात पुण्याचा समावेश आता करण्यात आला आहे. त्यामुळे आता पानिपत, गुरुग्राम, गुवाहाटी, चेन्नई, पुणे, मुंबई, दिल्ली, वाराणसी, नागपूर, सिलिगुडी, अहमदाबाद, गांधीनगर, हैदराबाद, बेंगळुरू, शिमला, इंफाळ, विशाखापट्टणम, लखनऊ आणि पटना मधील एयरटेल युजर्स एयरटेल 5जी वापरू शकतील. एयरटेलची 5जी प्लस सेवा सध्या कंपनीच्या 4जी ग्राहकांसाठी मोफत उपलब्ध आहे.

5G वापरण्यासाठी आवश्यक गोष्टी

5G नेटवर्क: 5G सेवा वापरण्यासाठी तुमच्या एरियामध्ये 5G नेटवर्क असणं आवश्यक आहे. एयरटेलनं आधीच सांगितलं आहे की सध्या त्यांची 5G सेवा काही ठरविक ठिकाणीच उपलब्ध आहे जिथे त्यांचे 5G टॉवर इंस्टॉल करण्यात आले आहेत.

Airtel 5G services launch full list of cities where Airtel 5G Plus available 5G SIM 5G Plan

5G स्मार्टफोन: 5G सेवा वापरण्यासाठी तुम्हाला 5G कम्पॅटिबल स्मार्टफोनची गरज पडेल. तुम्ही 4G स्मार्टफोनवर 5G वापरू शकणार नाही. कंपनीनं 5G साठी नवीन रिचार्ज प्लॅन्स सादर केले नाहीत, त्यामुळे तुम्ही 4G च्या रेट्सवर 5G वापरू शकाल. हे देखील वाचा: 12GB दणकट रॅमसह स्वस्त 5जी फोन Vivo S16e लाँच; डिस्प्लेपासून चार्जिंगपर्यंत सर्वकाही टिपटॉप

Airtel 5G कसं अ‍ॅक्टिव्हेट करायचं

एयरटेलनं कंफर्म केलं आहे की त्यांचं 4G सिम 5G रेडी आहे. त्यामुळे तुम्हाला 5G सेवेचा लाभ घेण्यासाठी नव्या सिमची आवश्यकता नाही. तुम्ही तुमच्या स्मार्टफोनवरून 5G अ‍ॅक्टिव्ह करू शकता.

  • स्टेप 1: 5G अ‍ॅक्टिव्ह करण्यासाठी फोनच्या सेटिंग अ‍ॅपवर जा.
  • स्टेप 2: इथे तुम्हाला कनेक्शन्स किंवा मोबाइल नेटवर्कचा ऑप्शन दिसेल.
  • स्टेप 3: या ऑप्शनमध्ये जाऊन तुम्हाला नेटवर्क मोड 5G/4G/3G/2G निवडण्याचा पर्याय दिसेल.
  • स्टेप 4: 5G सिलेक्ट करा म्हणजे आपोआप 5G सुरु होईल. तुमच्या एरियामध्ये एयरटेलचं 5G नेटवर्क असेल तर तुम्हाला 5G चा लोगो दिसेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here