
Revolt Motors नं पुन्हा एकदा आपल्या लोकप्रिय Revolt RV400 electric bike ची बुकिंग ओपन केली आहे. बुकिंगनंतर या ई-बाइकची डिलिव्हरी 31 मार्चपासून सुरु होईल. तसेच जर तुम्ही ही बॅटरी असलेली बाइक बुक करू इच्छित असाल तर तुम्हाला कंपनीच्या वेबसाइटवर जाऊन फक्त टोकन मनी म्हणून 2,499 द्यावे लागतील. रिव्हॉल्ट कंपनीला अलीकडेच पूर्णपणे RattanIndia Enterprises नं विकत घेतलं आहे.
विशेष म्हणजे RV400 2023 मॉडेल या वर्षासाठी थोडा अपडेट करण्यात आला आहे आणि ही भारतातील हरियाणामधील कंपनीच्या मानेसर प्लॅन्टमध्ये बनवला जात आहे. Revolt RV400 इलेक्ट्रिक बाइक भारतात रिबेल रेड, कॉस्मिक ब्लॅक आणि मिस्ट ग्रे अशा तीन कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे. हे देखील वाचा: परवडणाऱ्या किंमतीत सर्वात शक्तिशाली स्मार्टफोनचे फिचर; Samsung Galaxy S23 FE ची माहिती लीक
Revolt RV400 electric bike price
RV400 इलेक्ट्रिक बाइकची किंमत पाहता ही 1.29 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. तसेच ही बाइक 2,499 रुपयनमध्ये कंपनीच्या वेबसाइटवरून सहज बुक करता येईल. बुकिंग कंपनीच्या ऑनलाइन पोर्टलच्या माध्यमातून केली जाऊ शकते. रिव्हॉल्ट मोटर्सची देशातील 22 राज्यांमध्ये 35 ठिकाणी डिलरशिप आहे. तसेच, रिव्हॉल्ट वाहनावर पाच वर्षांची किंवा 75,000 किमीची वॉरंटी देत आहे.
Revolt RV400 electric bike specifications
R400 ई-बाइक 150 किमी पर्यंतच्या फुल चार्ज बॅटरी रेंजसह येते आणि ताशी 85 किमीचा टॉप स्पीड देते. बाइकमध्ये 3kW ची मिड-ड्राईव्ह मोटर देण्यात आली आहे जी 3.24kWh लिथियम-आयन बॅटरीने सुस्सज आहे. तसेच मोटरसायकलमध्ये माय रिवॉल्ट कनेक्टिव्हिटी अॅप आहे. यामध्ये जियोफेसिंग, कस्टमाइज्ड साऊंड, बाइक डायग्नोस्टिक, बॅटरी स्टेटस, राइड डेटा यासारखे फिचर्स आहेत. हे देखील वाचा: असे असतील Realme GT Neo 5 SE चे स्पेसिफिकेशन्स; लाँचपूर्वीच लीक झाली महत्वाची माहिती
Revolt RV400 इलेक्ट्रिक मोटरसायकलमध्ये तीन राइडिंग मोड्स- इको, नॉर्मल आणि स्पोर्ट आहेत. प्रत्येक राइडिंग स्टाइल आणि ड्राईव्हरच्या गरजेनुसार काम करता. तसेच यामध्ये अपसाइड जाउन फ्रंट फॉकर्स आणि रेअरमध्ये अॅडजेस्टेबल मोनोशॉक देण्यात आलेत. RV400 इलेक्ट्रिक बाइकमध्ये अलॉय व्हील्स, डिस्क ब्रेक्स, 120-सेक्शन रियर टायर्स, LED लाइटिंग आणि एक एग्जॉस्ट नोट जेनरेटर सारखे फीचर्सही आहेत.
















