Realme GT Neo 5 SE चे स्पेसिफिकेशन्स लीक; चीनमध्ये होऊ शकतो लाँच

Highlights

  • Realme GT Neo 5 SE स्मार्टफोन 1.5K डिस्प्लेसह बाजारात येऊ शकतो.
  • फोनमध्ये मिळणार 64MP ट्रिपल कॅमेरा सेटअप
  • सर्वप्रथम चीनमध्ये होऊ शकते Realme GT Neo 5 SE ची एंट्री

Realme नं या महिन्याच्या सुरुवातीलाच चीनमध्ये Realme GT Neo 5 स्मार्टफोन सादर केला आहे. हाच स्मार्टफोन पुढील आठवड्यात MWC 2023 च्या माध्यमातून Realme GT 3 नावानं जागतिक बाजारात एंट्री करू शकतो, ज्यात भारताचा देखील समावेश असू शकतो. परंतु काही दिवसांपूर्वी या स्मार्टफोनच्या हलक्या व्हर्जन म्हणजे Realme GT Neo 5 SE ची चर्चा सुरु झाली होती. हा फोन सर्वप्रथम चीनमध्ये सादर होऊ शकतो. आज या आगामी हँडसेटची अजून माहिती समोर आली आहे.

प्रसिद्ध टिपस्टर डिजिटल चॅट स्टेशननं रियलमी जीटी नियो 5 एसई ची माहिती दिली आहे. त्यानुसार, या फोनमध्ये रेग्युलर रियलमी जीटी नियो सारखी डिजाईन मिळेल, फक्त आरजीबी एलईडी लाइट्स आणि पारदर्शक कव्हर मिळणार नाही. फ्रंटला एक पंचहोल फ्लॅट डिस्प्ले दिला जाऊ शकतो. हा एक ओएलईडी पॅनल असेल जो 1.5K रिजोल्यूशनला सपोर्ट करू शकतो.

हा फोन ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपसह बाजारात येऊ शकतो. यातील मुख्य कॅमेरा 64एमपी ओम्नीव्हिजन ओव्ही64एम सेन्सर असेल. सर्वात महत्वाची माहिती म्हणजे हा स्मार्टफोन अजूनपर्यंत बाजारात न आलेल्या क्वॉलकॉमच्या Snapdragon 7 Plus Gen 1 चिपसेटवर चालू शकतो. हा चिपसेट लवकरच Snapdragon 7 Gen 2 SoC सह लाँच केला जाऊ शकतो. हे देखील वाचा: लो बजेटमधील युद्धाची रंगत वाढणार; Tecno Spark 10C स्मार्टफोन 4GB RAM सह वेबसाइटवर लिस्ट

Realme GT Neo5 Specifications

  • 6.74″ 144Hz display
  • 16GB RAM + 1TB storage
  • Qualcomm Snapdragon 8+ Gen 1
  • 50MP Triple Rear Camera

रियलमी जीटी नियो 5 स्मार्टफोन 2772 x 1240 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.74 इंचाच्या मोठ्या 1.5के डिस्प्लेला सपोर्ट करतो. पंच-होल स्टाईल ही स्क्रीन अ‍ॅमोलेड पॅनलवर बनली आहे तसेच 144हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि 1500हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करते. Realme GT Neo5 क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगन 8प्लस जेन 1 ऑक्टाकोर प्रोसेसरसह लाँच झाला आहे. ग्राफिक्ससाठी यात एड्रेनो जीपीयू 730 जीपीयू देण्यात आला आहे. हा फोन अँड्रॉइड 13 आधारित रियलमी युआय 4.0 वर चालतो.

फोटोग्राफीसाठी रियलमी जीटी नियो5 ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह एफ/1.88 अपर्चर असलेला 50MP Sony IMX 890 OIS प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे. जोडीला एफ/2.2 अपर्चर असलेली 8 मेगापिक्सलची वाइड अँगल लेन्स आणि एफ/3.3 अपर्चर असलेला 2 मेगापिक्सलचा मॅक्रो सेन्सर आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा स्मार्टफोन एफ/2.45 अपर्चर असलेल्या 16 मेगापिक्सल फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. हे देखील वाचा: परवडणाऱ्या किंमतीत सर्वात शक्तिशाली स्मार्टफोनचे फिचर; Samsung Galaxy S23 FE ची माहिती लीक

Realme GT Neo5 ची खासियत म्हणजे फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी. कंपनीनं या फोनचे दोन मॉडेल सादर केले आहेत. एका मॉडेलमध्ये 240वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह 4,600एमएएच बॅटरी आहे. हा फोन फक्त 8 मिनिटांत फुल चार्ज होऊ शकते. तर दुसरा रियलमी जीटी नियो5 150वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह 5,000एमएएचच्या बॅटरीला सपोर्ट करतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here