120 km रेंजसह हाय-स्पीड River Indie इलेक्ट्रिक स्कूटर लाँच, इतकी आहे किंमत

Highlights

  • हाय-स्पीड River Indie इलेक्ट्रिक स्कूटरची रेंज 120 km आहे
  • इंडी इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत 1.25 लाख (एक्स-शोरूम, बेंगळूर) आहे.
  • River Indie मध्ये IP67-रेटेड 4 kWh बॅटरी पॅकचा वापर करण्यात आला आहे.

रिव्हर इलेक्ट्रिक (River Electric) नं भारतात आपली इंडी इलेक्ट्रिक स्कूटर (Indie electric scooter) 120Km रेंजसह सादर केली आहे, जिची किंमत 1.25 लाख (एक्स-शोरूम, बेंगळूर) आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरची डिजाइन थोडदी वेगळी आहे, त्यामुळे हिच्याकडे सहज नजर वळते. ईव्ही स्टार्टअपनं असं देखील म्हटलं आहे की स्कूटरसाठी बुकिंग आधीपासून खुली करण्यात आली आहे. तसेच, स्टार्टअपला 2025 पर्यंत या नवीन हाय-स्पीड इलेक्ट्रिक स्कूटरचे एक लाख यूनिट विकले जातील अशी अपेक्षा आहे.

River Indie इलेक्ट्रिक स्कूटरची डिजाइन

River Indie इलेक्ट्रिक स्कूटरची डिजाइन पाहता, हिची फ्रंट डिजाइन बाजारातील अन्य मॉडेलपेक्षा खूप वेगळी आहे. यात इंटीग्रेटेड एलईडी डेटाइम रनिंग लाइट्ससह ड्युअल फ्रंट एलईडी हेडलॅम्प्स देण्यात आले आहेत. यात पूर्णपणे डिजिटल सहा इंचाचा कलर इंस्ट्रूमेंट क्लस्टर, 20 इंचाचा मोठा फुटबोर्ड आणि एलईडी टेललाइट्स देखील आहेत. ही 14 इंचाच्या ब्लॅक अलॉय चाकांवर चालते. फ्रंट व्हीलमध्ये 240 मिमी डिस्क ब्रेक मिळतो, तर मागे 200 मिमी डिस्क आहे. सस्पेंशनसाठी स्कूटरमध्ये फ्रंटला टेलिस्कोपिक सेटअप आणि मागे ट्विन हाइड्रॉलिक सिस्टम मिळते. हे देखील वाचा: Realme Mobile मध्ये मिळणार iPhone 14 Pro सारखा डिस्प्ले! माधव सेठ यांनी चुकून केलं ट्वीट

River Indie मध्ये 43 लीटर बूट स्पेस

विशेष म्हणजे स्कूटरमधील सीटची उंची 770 मिमी आणि 14 इंचाच्या चाकांमुळे ही यामाहा एरोक्स (Yamaha Aerox) आणि एप्रिलिया SR160 (Aprilia SR160) सारखी वाटते. ही 18 डिग्री ग्रेडेबिलिटीसह येते, जी ओला एस1 प्रो पेक्षाही जास्त आहे. ही 15 डिग्री उतारावर देखील चालू शकते. रिव्हर इंडीमध्ये 43-लीटर अंडर-सीट बूट स्पेससह 12 लीटर ग्लोव बॉक्स आहे. यात अ‍ॅक्सेसेरीज देखील मिळतात, ज्या सहज माउंट करता येतात. यात दोन्ही बाजूंना पॅनियर माउंट आणि बॅग हुकचा समावेश आहे. स्कूटरमध्ये पार्क असिस्ट, ड्युअल USB पोर्ट इत्यादी आहेत. हे देखील वाचा: OnePlus Nord 3 ची वाट पाहत असाल तर नक्की वाचा; स्पेसिफिकेशन्स आणि लाँचची माहिती लीक

पावरट्रेन पाहता, River Indie मध्ये IP67-रेटेड 4 kWh बॅटरी पॅकचा वापर करण्यात आला आहे, जो 6.7 kWh च्या इलेक्ट्रिक मोटरला पावर देतो, जी 26Nm चा टार्क देते. बेल्ट ड्राईव्हच्या माध्यमातून मागच्या चाकांना पावर पाठवली जाते. या इलेक्ट्रिक स्कूटरचा टॉप स्पीड ताशी 90km आहे. ही फक्त 3.9 सेकंदात ताशी 0-40 km चा वेग गाठू शकते. स्कूटर एकदा चार्ज केल्यावर 120km ची रेंज देते, असा दावा करण्यात आला आहे. कंपनी या इलेक्ट्रिक स्कूटरवर 5 वर्ष/50,000 किलोमीटर वॉरंटीसह येते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here