कमी किंमतीत V-शेप इनफिनिटी डिस्प्ले सह लॉन्च झाला सॅमसंग Galaxy A10e

साउथ कोरियन इलेक्ट्रॉनिक कंपनी सॅमसंग ने आज अधिकृतपणे आपल्या A-सीरीजचा नवीन स्मार्टफोन A10e यूएस मध्ये सादर केला आहे. तसेच कंपनीने यूएस मध्ये Galaxy A50 आणि A20 पण सादर केले आहेत. हे दोन्ही फोन आधी इतर देशांत लॉन्च झाले आहेत. पण A10e पहिल्यांदा अधिकृतपणे सादर केला गेला आहे.

किंमत आणि उपलब्धता
Samsung Galaxy A10e ची किंमत पाहता हा अमेरिकेत 179.99 डॉलर (जवळपास 12,485 रुपये) मध्ये सादर केला गेला आहे. किंमती व्यतिरिक्त उपलब्धतेबद्दल कोणतीही ऑफिशियल माहिती समोर आली नाही. तसेच Galaxy A50 आणि A20 ची किंमत क्रमश: 249.99 डॉलर (जवळपास 17,345 रुपये) व 349.99 डॉलर (जवळपास 24,209 रुपये) आहे.

सॅमसंगचा Galaxy A10e स्मार्टफोन कंपनी द्वारा लॉन्च केला गेलेल्या Galaxy A10 चा छोटा वर्जन असल्याचे बोलले जात आहे. हा फोन ब्लूटूथ 5.0 आणि डुअल बँड वाईफाई सह येतो. पुढे आम्ही Galaxy A10e च्या स्पेसिफिकेशन्सची माहिती दिली आहे.

Galaxy A10e चे स्पेसिफिकेशन्स
ऑफिशियल लिस्टिंग नुसार Galaxy A10e मध्ये 5.83-इंचाचा इनफिनिटी-वी डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच फोटोग्राफी साठी 8-मेगापिक्सलचा रियर कॅमेरा आणि पावर बॅकअप साठी 3,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. लिस्टिंग मध्ये डिवाइसच्या रॅम, प्रोसेसर आणि फ्रंट कॅमेऱ्याची माहिती समोर आली नाही.

पण समोर आलेल्या काही माहितीनुसार Galaxy A10e मध्ये 2जीबी रॅम असेल. तसेच एंडरॉयड ओएस सोबतच या फोन मध्ये मीडियाटेक चा हेलीयो पी22 चिपसेट असेल जो आक्टाकोर प्रोसेसर सह येईल. हा फोन ब्लूटूथ 5.0 आणि डुअल बॅंड वाईफाई सह येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here