Samsung Galaxy A14 4G ची भारतातील किंमत आली समोर; स्पेसिफिकेशनचाही खुलासा

Highlights

  • किंमत 13,999 रुपांपासून सुरु होईल.
  • हा दोन मेमरी व्हेरिएंट्समध्ये विकला जाईल.
  • 31 मेला मार्केटमध्ये होईल लाँच.

Samsung Galaxy A14 4G फोन संबंधित बातम्या अनेक दिवसांपासून समोर येत आहेत. हा मोबाइल फोन ग्लोबली ऑफिशियल झाला आहे आणि आता भारतीय बाजारात एंट्री करण्याची तयारी करत आहे. कंपनी आपल्या भारतीय फॅन्सना सरप्राइज देऊ पाहत आहे म्हणून फोन लाँचची माहिती लपवून ठेवण्यात आली आहे. परंतु एका नवीन लीकमध्ये गॅलेक्सी ए14 च्या भारतीय किंमतीचा खुलासा झाला आहे.

सॅमसंग गॅलेक्सी ए14 4जी प्राइस

  • 4GB RAM + 64GB Memory = 13,999 रुपये
  • 4GB RAM + 128GB Memory = 14,999 रुपये

Samsung Galaxy A14 4G मॉडेल दोन व्हेरिएंट्समध्ये भारतात लाँच होईल. बेस व्हेरिएंटमध्ये 4जीबी रॅमसह 64जीबी स्टोरेज दिली जाईल ज्याची किंमत 13,999 रुपये असेल. तर मोठा व्हेरिएंट 4जीबी रॅमसह 128जीबी मेमरीला सपोर्ट करेल आणि ह्याची किंमत 14,999 रुपये असेल. ही किंमत सॅमइन्साइडर वेबसाइटच्या माध्यमातून समोर आली आहे.

सॅमसंग गॅलेक्सी ए14 4जी इंडिया लाँच व सेल

Samsung Galaxy A14 4G चं सपोर्ट पेज सॅमसंग इंडियाच्या ऑफिशियल वेबसाइटवर लाइव्ह करण्यात आलं आहे जिथे फोनचे फोटोज सार्वजनिक आहेत. कंपनीनं अजूनतरी ह्याच्या लाँच डेटची माहिती दिली नाही परंतु मीडिया रिपोर्ट्सनुसार येत्या 31 मेला गॅलेक्सी ए14 4जी भारतीय बाजारात येईल आणि सॅमसंग फोनची विक्री देखील तेव्हाच सुरु होईल. Galaxy A14 4G ऑनलाइन व ऑफलाइन दोन्ही प्लॅटफॉर्मवर विकला जाईल.

सॅमसंग गॅलेक्सी ए14 4जी चे स्पेसिफिकेशन्स

  • 6.6″ FHD+ Display
  • 50MP Triple Rear Camera
  • 6GB RAM Plus
  • 6GB RAM + 128GB Storage
  • 2.0GHz octa-core processor
  • 15W 5,000Mah Battery

सॅमसंग गॅलेक्सी ए14 4जी फोन 1080 x 2408 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.6 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेसह लाँच झाला आहे. फोनची स्क्रीन पीएलएस एलसीडी पॅनलवर बनली आहे. या फोनचे डायमेंशन 167.7 x 78.0 x 9.1एमएम आणि वजन 201 ग्राम आहे. मलेशियन वेबसाइटवर हा फोन सध्या 6जीबी रॅम आणि 128जीबी स्टोरेजसह समोर आला आहे.

Samsung Galaxy A14 4G फोन अँड्रॉइड 13 आधारित वनयुआय 5 वर लाँच झाला आहे ज्यात 2.0गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेला ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे. कंपनीनं चिपसेटचं नाव सांगितलं नाही परंतु हा मोबाइल मीडियाटेक हीलियो जी80 सह विकला जाईल, अशी चर्चा आहे. गॅलेक्सी ए14 रॅम प्लस फीचरनं सुसज्जित आहे त्यामुळे फोनचा इंटरनल 6जीबी रॅम वाढवून 12जीबी करता येतो.

फोटोग्राफीसाठी हा सॅमसंग फोन ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. याच्या बॅक पॅनलवर एफ/1.8 अपर्चर असलेला 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जो एफ/2.2 अपर्चर असलेल्या 5 मेगापिक्सलच्या अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि एफ/2.4 अपर्चर असलेल्या 2 मेगापिक्सलच्या मॅक्रो सेन्सरसह येतो. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा सॅमसंग फोन एफ/2.0 अपर्चर असलेल्या 13 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

Samsung Galaxy A14 4G फोनमध्ये ड्युअल सिमचा सपोर्ट देण्यात आला आहे. पावर बॅकअपसाठी हा मोबाइल फोन 5,000एमएएचची मोठी बॅटरीला सपोर्ट करतो जी 15वॉट फास्ट चार्जिंगसह येते. तसेच सिक्योरिटीसाठी याच्या साइड पॅनलवर फिंगरप्रिंट सेन्सर इम्बेडेड पावर बटन आहे. हा सॅमसंग फोन Black, Silver, Green आणि Dark Red कलरमध्ये सादर करण्यात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here