स्वस्त सॅमसंग फोन Galaxy A14 भारतात लाँच, पाहा किती आहे किंमत आणि कसे आहेत स्पेसिफिकेशन

Highlights

  • सिंगल चार्जमध्ये हा फोन 2 दिवस चालू शकतो.
  • हा 2 वर्षांच्या OS upgrade सह येतो.
  • फोनमध्ये 4 वर्षांचे security update देखील मिळतात.

सॅमसंगनं आज भारतीय बाजारात आपला प्रोडक्ट पोर्टफोलियो वाढवत नवीन स्मार्टफोन Galaxy A14 लाँच केला आहे. हा मोबाइल फोन फक्त 13,999 रुपयांच्या प्रारंभिक किंमतीत बाजारात आला आहे. ज्याच्या फीचर्स, स्पेसिफिकेशन्ससह प्राइस व सेलची माहिती तुम्ही पुढे वाचू शकता.

सॅमसंग गॅलेक्सी ए14 4जी प्राइस व ऑफर

  • 4GB RAM + 64GB Memory = 13,999 रुपये
  • 4GB RAM + 128GB Memory = 14,999 रुपये

Samsung Galaxy A14 4G फोन 4जीबी रॅमसह भारतात लाँच करण्यात आला आहे जो दोन स्टोरेज ऑप्शन्समध्ये सेलसाठी उपलब्ध होईल. ह्यात 64जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 13,999 रुपये आहे तर 128जीबी मेमरी व्हेरिएंटची किंमत 14,999 रुपये आहे. सुरुवातीला सेलमध्ये कंपनी फोनवर 1,000 रुपयांचा कॅशबॅक देखील देत आहे त्यामुळे गॅलेक्सी ए14 ची प्रारंभिक किंमत 12,999 रुपये होईल. हा सॅमसंग फोन Light Green, Black आणि Silver कलरमध्ये विकत घेता येईल.

सॅमसंग गॅलेक्सी ए14 4जी फीचर्स व स्पेसिफिकेशन्स

  • 6.6″ FHD+ Display
  • LCD Panel

सॅमसंग गॅलेक्सी ए14 4जी फोनमध्ये 1080 x 2408 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.6 इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे जो वॉटरड्रॉप नॉच स्टाईलवर बनला आहे. ह्या फोनमध्ये पीएलएस एलसीडी पॅनलचा वापर करण्यात आला आहे ज्यावर 60हर्ट्झ रिफ्रेश रेट मिळतो. नवीन सॅमसंग फोनचे डायमेंशन 167.7 x 78.0 x 9.1एमएम आणि वजन 201 ग्राम आहे.

  • RAM Plus
  • Exynos 850

Samsung Galaxy A14 4G फोन अँड्रॉइड 13 आधारित वनयुआय 5 वर लाँच झाला आहे. यात प्रोसेसिंगसाठी सॅमसंग एक्सनॉस 850 ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे जो 2.0गीगाहर्ट्झ क्लॉक स्पीडवर चालतो. हा मोबाइल फोन रॅम प्लस फीचरसह येतो त्यामुळे फोनची इंटरनल 4जीबी रॅममध्ये एक्स्ट्रा 4जीबी रॅम जोडून 8जीबी रॅमची पावर दिली जाऊ शकते.

  • 50MP Rear Camera
  • 13MP Selfie Camera

फोटोग्राफीसाठी हा फोन ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. गॅलेक्सी ए14 च्या बॅक पॅनलवर एफ/1.8 अपर्चर असलेला 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जो एफ/2.2 अपर्चर असलेल्या 5 मेगापिक्सलच्या अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि एफ/2.4 अपर्चर असलेल्या 2 मेगापिक्सलच्या मॅक्रो सेन्सरसह येतो. अशाप्रकारे सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फोनमध्ये एफ/2.0 अपर्चर असलेला 13 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

  • 2 Days Backup
  • 5,000mAh Battery

पावर बॅकअपसाठी Samsung Galaxy A14 4G फोनमध्ये 5,000एमएएचची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. कंपनीचा दावा आहे की एकदा फुल चार्ज केल्यावर हा मोबाइल फोन सरासरी वापर केल्यास 2 दिवस बॅकअप देऊ शकतो. तसेच ही मोठी बॅटरी वेगानं चार्ज करण्यासाठी फोनमध्ये 15वॉट फास्ट चार्जिंगचा सपोर्ट देखील देण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here