वनप्लस 11 मॅट ब्लॅक आणि ग्लॉसी ग्रीन कलरमध्ये होऊ शकतो लाँच

वनप्लस कंपनी आपल्या फ्लॅगशिप स्मार्टफोन OnePlus 11 वर काम करत आहे. गेली कित्येक दिवस वनप्लस 11 चे लीक्स समोर येत आहेत, ज्यात फोनचे फीचर्स व स्पेसिफिकेशन्सची माहिती देण्यात आली आहे. आता पुन्हा एकदा या स्मार्टफोन संबंधित मोठी माहिती समोर आली आहे ज्यात OnePlus 11 लाँच डिटेल्स शेयर करण्यात आले आहेत. नवीन रिपोर्ट्समध्ये सांगण्यात आलं आहे की वनप्लस 11 कधी लाँच होईल आणि कोणत्या कलर्समध्ये सेलसाठी उपलब्ध होऊ शकतील.

OnePlus 11 लाँच

कंपनीनं आतापर्यंत वनप्लस 11 च्या लाँचबद्दल कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही परंतु ताज्या लीकमध्ये समोर आलं आहे की OnePlus 11 पुढील वर्षी 2023 मध्ये लाँच होऊ शकतो. आधी हा फोन डिसेंबरमध्ये लाँच होईल अशी बातमी आली होती परंतु नवीन रिपोर्टनुसार हा फोन वर्ष 2023 च्या सुरवातीला ग्लोबल मार्केटमध्ये एंट्री घेऊ शकतो. टिपस्टरनुसार वनप्लस 11 matte black आणि glossy green कलरमध्ये लाँच होऊ शकतो तसेच हेच कलर व्हेरिएंट्स भारतात देखील सेलसाठी उपलब्ध होऊ शकतात. हे देखील वाचा: सॅमसंग-ओप्पोचं टेन्शन वाढवण्यासाठी आला Vivo चा स्वस्त फोन; स्टायलिश लूकसह Vivo Y02 लाँच

OnePlus 11 Specifications

वनप्लस 11 चे फीचर्स व स्पेसिफिकेशन्स पाहता लीक्सनुसार, हा स्मार्टफोन 6.7 इंचाच्या क्वॉडएचडी+ पंच-होल डिस्प्लेवर लाँच केला जाऊ शकतो हा अ‍ॅमोलेड पॅनल 120हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करू शकतो. हा वनप्लस मोबाइल इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर टेक्नॉलॉजीसह येऊ शकतो आणि मजबूत कोर्निंग गोरिल्ला ग्लासनं प्रोटेक्शनसह येऊ शकतो.

OnePlus 11 क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 जेन 2 चिपसेटवर लाँच होऊ शकतो. रिपोर्टनुसार हा वनप्लस मोबाइल फोन 16जीबी पर्यंतच्या रॅमला सपोर्ट करू शकतो तसेच यात 256 जीबी पर्यंतची इंटरनल स्टोरेज मिळू शकते. आशा आहे की वनप्लस 11 स्मार्टफोन दोन पेक्षा जास्त व्हेरिएंट्समध्ये मार्केटमध्ये एंट्री घेऊ शकतो. हे देखील वाचा: 20 पेक्षा जास्त ओप्पो मोबाइल्स आणि गॅजेट्सवर दणकट डिस्काउंट! OPPO winter season sale झाला सुरु

फोटोग्राफीसाठी वनप्लस 11 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा दिला जाऊ शकतो. लीकनुसार फोनच्या बॅक पॅनलवर 50MP Sony IMX890 प्रायमरी सेन्सर, 48MP IMX581 अल्ट्रा वाइड लेन्स आणि 32MP IMX709 2x झूम कॅमेरा दिली जाऊ शकते, या सर्व Hasselblad लेन्स असू शकतात. तसेच पावर बॅकअपसाठी OnePlus 11 मध्ये 100वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेली 5,000एमएएच बॅटरी मिळू शकते.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here