Samsung ने काही दिवसांपूर्वी टेक मार्केटमध्ये आपला प्रोडक्ट पोर्टफोलियो वाढवत गॅलेक्सी ‘ए’ सीरीजचे दोन नवीन फोन सादर केला आहे. कंपनीने हे दोन्ही स्मार्टफोन Samsung Galaxy A52 आणि Samsung Galaxy A72 नावाने लॉन्च केले आहेत. ग्लोबल ईवेंटच्या माध्यमातून हे ताकदवान मोबाईल फोन सादर केल्यानंतर आज सॅमसंगने हे फोन्स भारतीय बाजारात पण सादर केले आहेत. सॅमसंगने फोन्सचचे भारतीय वेरिएंट्स आणि किंमत पण सांगितली आहे.
वेरिएंट्स व प्राइस
Samsung Galaxy A52
सॅमसंग गॅलेक्सी ए52 बद्दल बोलायचे तर हा मोबाईल फोन दोन वेरिएंट्स मध्ये भारतात लॉन्च झाला आहे. फोनचा पहिला वेरिएंट 6 जीबी रॅमसह 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो तसेच दुसर्या वेरिएंट मध्ये 8 जीबी रॅमसह 128 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. Galaxy A52 चा 6 जीबी + 128 जीबी वेरिएंट 26,499 रुपयांमध्ये तसेच 8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वेरिएंट 29,999 रुपयांमध्ये लॉन्च झाला आहे.
Samsung Galaxy A72
सॅमसंग गॅलेक्सी ए72 पण भारतात दोन वेरिएंट्समध्ये लॉन्च केला गेला आहे. या फोनचा बेस वेरिएंट 8 जीबी रॅमसह 128 जीबी स्टोरेजला सपोर्ट करतो. तसेच दुसर्या वेरिएंट मध्ये 8 जीबी रॅमसह 256 जीबी इंटरनल मेमरी देण्यात आली आहे. किंमत पाहता फोनचा 8 जीबी + 128 जीबी वेरिएंट 34,999 रुपये तर 8 जीबी + 256 जीबी वेरिएंट 37,999 रुपयांमध्ये भारतीय बाजारात आला आहे.
सेल व उपलब्धता
Samsung Galaxy A72 आणि Samsung Galaxy A52 दोन्ही स्मार्टफोन कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर सेलसाठी उपलब्ध झाले आहेत. आनलाईन प्लॅटफॉर्म व शॉपिंग साइट्ससह हे स्मार्टफोन्स आफलाईन प्लॅटफॉर्म तसेच नजीकच्या रिटेल स्टोर्स वरून पण विकत घेता येतील. सॅमसंगचे हे दोन्ही फोन चार रंगात विक्रीसाठी उपलब्ध होतील ज्यात Awesome Violet, Awesome Black, Awesome White आणि Awesome Blue चा समावेश आहे. सॅमसंगने आपले दोन्ही स्मार्टफोन्स भारतात क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगन 720 चिपसेटसह बाजारात येईल.














