Samsung Galaxy F54 5G ची किंमत आली समोर; 108MP कॅमेरा आणि 6,000mAh बॅटरीसह होऊ शकतो लाँच

Highlights

  • फोनची किंमत 26,499 रुपये असू शकते.
  • हा 22 मेच्या आसपास लाँच होऊ शकतो.
  • यात Samsung Exynos चिपसेट 1380 मिळू शकतो.

सॅमसंगबद्दल काही दिवसांपूर्वी बातमी आली होती की कंपनी आपल्या ‘एफ’ सीरीजच्या नवीन मोबाइल फोन Samsung Galaxy F54 5G वर काम करत आहे जो लवकरच भारतात लाँच केला जाईल. आज या फोनची भारतीय किंमत लीकच्या माध्यमातून समोर आली आहे. गॅलेक्सी एफ54 5जीची अंदाजे किंमत व स्पेसिफिकेशन्सची माहिती तुम्ही पुढे वाचू शकता.

सॅमसंग गॅलेक्सी एफ54 5जीची किंमत (लीक)

Samsung Galaxy F54 5G फोन संबंधित नवीन लीक टिपस्टर डेबयॉन रॉयनं शेयर केलं आहे. टिपस्टरनं दावा केला आहे की सॅमसंग कंपनी आपला हा आगामी स्मार्टफोन भारतात अपर-मिड बजेटमध्ये सादर करेल. या फोनची किंमत 26 ते 27 हजार रुपयांदरम्यान असू शकते. आम्हाला आशा आहे की गॅलेक्सी एफ54 5जी ची भारतीय किंम 26,499 रुपये असू शकतो.

सॅमसंग गॅलेक्सी एफ54 5जी फोन लाँच डेट

लीकमधून फोनची कोणतीही ठोस लाँच डेट समोर आली नाही परंतु टिपस्टरनुसार, amsung Galaxy F54 5G पुढील 2 किंवा 3 आठवड्यात भारतात लाँच केला जाईल. लीकनुसार, या फोनची लाँच डेट 22 मेच्या आसपास असू शकते. हे देखील वाचा: 16GB RAM आणि 32MP Selfie कॅमेऱ्यासह लाँच होऊ शकतो OPPO A98 5G फोन; माहिती लीक

सॅमसंग गॅलेक्सी एफ54 5जी चे स्पेसिफिकेशन्स

  • Samsung Exynos 1380
  • Android 13

Samsung Galaxy F54 5G फोनबद्दल सांगण्यात आलं आहे की हा मोबाइल कंपनीच्या एक्सनॉस 1380 चिपसेटवर लाँच केला जाईल. फोनमध्ये आक्टा-कोर प्रोसेसर मिळू शकतो. हा सॅमसंग फोन अँड्रॉइड 13 ओएसवर सादर केला जाऊ शकतो जोडीला वनयुआय मिळू शकतो.

  • AMOLED Panel
  • 6.7″ FHD+ Display
  • 120Hz Refresh Rate

सॅमसंग गॅलेक्सी एफ54 5जी 6.7 इंचाच्या मोठ्या स्क्रीनसह लाँच केला जाऊ शकतो जी फुलएचडी+ रिजोल्यूशनसह येईल. लीकनुसार, या फोनमध्ये अ‍ॅमोलेड पॅनल दिला जाईल तसेच गॅलेक्सी एफ54 5जी फोन 120हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करेल.

  • 108MP Rear Camera
  • 32MP Front Camera

फोटोग्राफीसाठी Samsung Galaxy F54 5G ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल. समोर आलेल्या डिटेल्सनुसार बॅक पॅनलवर ओआयएस टेक्नॉलॉजीसह 108 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर मिळेल, जो 8 मेगापिक्सल व 2 मेगापिक्सल लेन्ससह चालेल. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळू शकतो. हे देखील वाचा: 20 हजारांच्या आत होऊ शकते Lava Agni 2 5G ची एंट्री; 50MP Camera आणि 16GB RAM सह येऊ शकतो बाजारात

  • 6,000mAh Battery
  • 25W Fast Charging

पावर बॅकअपसाठी सॅमसंग गॅलेक्सी एफ54 5जी 6,000एमएएचच्या मोठ्या बॅटरीसह लाँच केला जाऊ शकतो जोडीला ह्या मोबाइलमध्ये 25वॉट फास्ट चार्जिंग मिळू शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here