20 हजारांच्या आत होऊ शकते Lava Agni 2 5G ची एंट्री; 50MP Camera आणि 16GB RAM सह येऊ शकतो बाजारात

Highlights

  • फोनची किंमत 19,999 रुपये असू शकते.
  • प्रोसेसिंगसाठी Dimensity 7050 मिळू शकतो.
  • हा फोन 8GB Virtual RAM ला सपोर्ट करू शकतो.

इंडियन मोबाइल ब्रँड लावा भारतीय बाजारात आपला अजून एक नवीन स्मार्टफोन Lava Agni 2 5G घेऊन येत आहे. कंपनीनं हा फोन वेबसाइट आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर टीज करण्यास सुरुवात केली आहे जो या आठवड्यात सेलसाठी उपलब्ध होऊ शकतो. ब्रँडनं अधिकृत घोषणा करण्यापूर्वीच अशी माहिती समोर आ आली आहे की लावा अग्नी 2 5जी ची भारतीय किंमत 19,999 रुपये असू शकते.

लावा अग्नी 2 5जी फोनची किंमत (लीक)

Lava Agni 2 5G फोनच्या किंमतीची माहिती कंपनीनं थेट दिली नाही परंतु गुगल सर्चमध्ये या फोनचं बॅकएन्ड प्रोडक्ट पेज समोर येत आहे. हे पेज सर्वप्रथम टिपस्टर अभिषेक यादवनं स्पॉट केलं होतं, ह्या पेजवरून समजलं आहे की हा लावा मोबाइल 19,999 रुपयांमध्ये भारतात सेलसाठी उपलब्ध होईल. ही स्मार्टफोनच्या 8जीबी रॅम + 256जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत असेल. हे देखील वाचा: भारतीय लाँचपूर्वीच लीक झाली OPPO F23 5G ची माहिती; किंमत आणि रेंडर्सही लीक

लावा अग्नी 2 5जी फोनचे स्पेसिफिकेशन्स

  • Android 13
  • MediaTek Dimensity 7050

कंपनीनं फोन टीज करण्यास सुरुवात केली आहे परंतु अजूनही ह्याचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स समोर आणले नाहीत. लावा काही गोष्टींचा खुलासा करत आहे. तसेच गुगल सर्चमध्ये अनेक पॉईंट्सचा खुलासा झाला आहे. हे स्पष्ट झालं आहे की Lava Agni 2 5G मीडियाटेक डायमेन्सिटी 7050 ऑक्टाकोर प्रोसेसरसह लाँच होईल आणि ह्यात अँड्रॉइड 13 ओएस मिळू शकतो.

  • 8GB Virtual RAM
  • 8GB RAM + 256GB Storage

Lava Agni 2 5G बद्दल सांगण्यात आलं आहे की ह्या मोबाइल फोनमध्ये 8जीबी वचुर्अल रॅम दिला जाईल. तसेच ह्या फोनमध्ये 8जीबी इंटरनल रॅम देखील असेल जो वचुर्अल रॅमसह मिळून 16जीबी रॅमची पावर देईल. तसेच लावा अग्नी 2 5जी फोन 256जीबी स्टोरेजसह येईल जी कार्डच्या माध्यमातून वाढवता येईल. हे देखील वाचा: भारतीय सर्टिफिकेशन साइटवर दिसला Realme 11 Pro+ 5G; बॅटरी आणि फास्ट चार्जिंगचा खुलासा

  • 50MP Quad Camera
  • Curved AMOLED Display
  • In-Display Fingerprint Scanner

लावा अग्नी 2 5जी फोनमध्ये कर्व्ड डिस्प्ले मिळेल जो अ‍ॅमोलेड पॅनलवर बनला असेल. ह्या फोनमध्ये इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देखील दिला जाईल. तसेच फोटोग्राफी सेग्मेंटबद्दल समोर आलं आहे की Lava Agni 2 5G फोनमध्ये क्वॉड रियर कॅमेरा सेटअप दिला जाईल ज्यात प्रायमरी सेन्सर 50 मेगापिक्सलचा असेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here