Samsung चा सर्वात स्वस्त पंच-होल डिस्प्ले असलेला फोन असेल Galaxy M11, एंडरॉयड 10 सह मिळेल 3जीबी रॅम

Samsung कंपनी येत्या 16 मार्चला भारतात आपल्या ‘गॅलेक्सी एम’ सीरीज अंतर्गत नवीन फोन Galaxy M21 लॉन्च करणार आहे. बोलले जात आहे कि हा फोन सॅमसंगच्या गॅलैक्सी एम30एस सारखा असेल आणि 6000एमएएच बॅटरी व ट्रिपल रियर कॅमेऱ्यासह येईल. गॅलेक्सी एम21 च्या लॉन्चच्या आधी आता या सीरीजच्या अजून एका नवीन फोन Samsung Galaxy M11 ची माहिती समोर आली आहे. गॅलेक्सी एम11 गूगल प्ले कंसोल वर लिस्ट केला गेला आहे ज्यामुळे फोनचे संपूर्ण स्पेसिफिकेशन्स इंटरनेट वर लीक झाले आहेत.

सर्वात आधी सांगू इच्छितो कि Samsung Galaxy M11 गेल्या महिन्यात थाईलँडच्या एनबीटीसी वेबसाइट वर SM-M115F/DS मॉडेल नंबर सह लिस्ट झाला होता. तसेच आता गूगल प्ले कंसोल वर हा फोन m11q कोडनेम सह लिस्ट झाला आहे जिथे फोनचे नाव Galaxy M11 लिहिण्यात आले आहे. या लिस्टिंग मध्ये फोनच्या फ्रंट पॅनलचा फोटो दाखवण्यात आला आहे ज्यामुळे फोनच्या डिजाईनचा खुलासा झाला आहे. तसेच लिस्टिंग मध्ये फोनचे स्पेसिफिकेशन्स पण समोर आले आहेत.

Samsung Galaxy M11

सॅमसंग गॅलेक्सी एम11 चा लुक आणि डिजाईन पाहता लिस्टिंग मध्ये हा फोन पंच-होल डिस्प्ले वर बनलेला दाखवण्यात आला आहे. Galaxy M11 नॅरो बेजल्स डिजाईन वर बनला आहे ज्याच्या वरच्या बाजूला डावीकडे पंच-होल देण्यात आला आहे. फोन डिस्प्लेच्या चारही बाजूला बारीक बेजल्स देण्यात आले आहेत तसेच खालच्या बाजूला रुंद चिन पार्ट आहे. गॅलेक्सी एम11 कधी लॉन्च होईल हि माहिती अजूनही समोर आली नाही पण असे म्हणता येईल कि Samsung Galaxy M11 ब्रँडचा सर्वात स्वस्त पंच-होल डिस्प्ले असलेला फोन असू शकतो.

फोनचे स्पेसिफिकेशन्स पाहता गूगल कंसोल वर हा फोन 1560 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या डिस्प्ले वर बनलेला असल्याचे सांगण्यात आले आहे जो 280dpi स्क्रीन डेनसिटीला सपोर्ट करेल. लिस्टिंगनुसार Samsung Galaxy M11 एंडरॉयडच्या लेटेस्ट ओएस एंडरॉयड 10 वर लॉन्च केला जाईल तसेच प्रोसेसिंगसाठी या फोन मध्ये क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगॉन 450 चिपसेट मिळेल. या लिस्टिंग मध्ये गॅलेक्सी एम11 3 जीबी रॅम सह दाखवण्यात आला आहे.

Samsung Galaxy M21

16 मार्चला लॉन्च होणाऱ्या गॅलेक्सी एम21 बद्दल बोलले जात आहे कि या फोनचे स्पेसिफिकेशन्स सॅमसंगच्या गॅलेक्सी एम30एस स्मार्टफोन सारखे असतील. गॅलेक्सी एम30एस बद्दल बोलायचे तर यात 6.4-इंचाचा सुपर ऐमोलेड फुल एचडी+ डिस्प्ले वॉटरड्रॉप नॉच सह फोन मध्ये सॅमसंग Exynos 9611 चिपसेट आहे. तसेच फोन मध्ये 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज देण्यात आली आहे. स्टोेरेज माइक्रोएसडी कार्डच्या मदतीने वाढवता येईल. तसेच फोन एंडरॉयड 9.0 पाई सह कस्टम वन UI 2.0 स्किन वर चालेल.

फोटोग्राफीसाठी Samsung Galaxy M30s मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा असेल, ज्यात 48MP चा प्राइमरी सेंसर, 8MP अल्ट्रा-वाइड-अँगल लेंस आणि 5MP डेप्थ सेंसर आहे. तसेच फोन मध्ये 16MP चा सेल्फी कॅमेरा वीडियो कॉलिंगसाठी पण आहे. कनेक्टिविटी फीचर्स पाहता फोन मध्ये डुअल 4G VoLTE, डुअल-बॅंड वाई-फाई, ब्लूटूथ 5.0, GPS + GLONASS, आणि यूएसबी टाइप-सी सह 6,000mAh ची बॅटरी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here