Samsung Galaxy M30s चे रेंडर्स आले समोर, ट्रिपल रियर कॅमेरा आणि 3.5mm ऑडियो जॅक येईल हा फोन

Samsung Galaxy M30s बद्दल अनेक दिवसांपासून माहिती समोर येत आहे. अलीकडेच बातमी आली होती कि गॅलेक्सी एम सीरीजचा हा स्मार्टफोन 15 सप्टेंबरला सादर केला जाईल. या फोनची किंमत 15,000 रुपये ते 20,000 रुपयांमध्ये असेल. आता 91मोबाईल्सला इंडस्ट्री सोर्स कडून Galaxy M30s ची रेंडर इमेज मिळाली आहे.

रेंडर इमेजेस वरून स्पष्ट झाले आहे कि आगामी अफोर्डेबल हँडसेट कर्व्ड एज आणि ग्रेडिएंट फिनिशन व ब्लू टिंट बॅक सह येईल. फोन मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा टॉप राइटला एलईडी फ्लॅश सह दिला जाईल. तसेच मधोमध फिंगरप्रिंट स्कॅनर असेल. त्याचबरोबर फोनच्या उजव्या बाजूला हार्डवेयर पावर आणि वॉल्यूय बटण दिले जातील. त्याबरोबर खाली 3.5mm ऑडियो जॅक व फ्रंटला इनफिनिटी-यू डिस्प्ले असेल.

स्पेसिफिकेशन्स

Samsung Galaxy M30s चे स्पेसिफिकेशन्स पाहता समोर आलेल्या रिपोर्ट नुसार हा डिवाईस पण वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले वर सादर केला जाईल. या फोन मध्ये 2400 × 1080 पिक्सल रेज्ल्यूशन वाला 6.4-इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले मिळू शकते. बोलले जात आहे कि सॅमसंग हा फोन एंडरॉयड 9 पाई वर सादर करेल ज्या सोबत प्रोसेसिंग साठी Galaxy M30s मध्ये कंपनीचा एक्सनॉस 9610 चिपसेट दिला जाईल.

भारतात Samsung Galaxy M30s दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला जाऊ शकतो. रिपोर्ट नुसार फोनचा एक वेरिएंट 4जीबी रॅम सह 64जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करेल तर दुसऱ्या वेरिएंट मध्ये 6जीबी रॅम मेमरी सह 128जीबी ची इंटरनल मेमरी दिली जाईल. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Galaxy M30s ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल. रिपोर्ट नुसार फोनच्या बॅक पॅनल वर 48-मेगापिक्सलचा प्राइमरी रियर कॅमेरा सेंसर मिळेल जो एफ/2.0 अपर्चरला सपोर्ट करेल.

Samsung Galaxy M30s च्या बॅक पॅनल वर एफ/2.2 अपर्चर वाला 5-मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आणि एफ/2.2 अपर्चर वाला 8-मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड सेंसर मिळेल. त्याचप्रमाणे सेल्फी व वीडियो कॉलिंग साठी या फोन मध्ये एफ/2.0 अपर्चर वाला 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळू शकतो. Galaxy M30s चा रियर कॅमेरा सेटअप एलईडी फ्लॅश सह येईल.

Galaxy M30s च्या बॅक पॅनल वर सिक्योरिटी साठी रियर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे. तसेच पावर बॅकअप साठी या फोन मध्ये 6,000एमएएच ची बॅटरी मिळेल जी 25वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल

सॅमसंग गॅलेक्सी एम30 128जीबी वीडियो

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here