एंडरॉयड 10 सह समोर आला Samsung Galaxy M31, लवकरच होईल लॉन्च

91मोबाईल्सने वर्षाच्या सुरवातीला आपल्या एक्सक्लूसिव बातमीत Samsung Galaxy M31 ची माहिती दिली होती. आम्ही सॅमसंग गॅलेक्सी एम31 के कॅमेरा मॉड्यूलचा फोटो शेयर केला होता जो फॅक्टरी मध्ये असेंबल केला जात होता. हा फोटो समोर आल्यामुळे खुलासा झाला होता कि Galaxy M31 स्मार्टफोन क्वॉड रियर कॅमेरा सेटअप वर लॉन्च केला जाईल जो ‘L-शेप’ सह येईल. तर आज या स्मार्टफोन संबंधित अजून एक आणि मोठी बातमी समोर आली आहे कि गॅलेक्सी एम31 वाई-फाई सर्टिफिकेशन्स साइट वर लिस्ट केला गेला आहे. या लिस्टिंगने स्पष्ट केले आहे कि Samsung Galaxy M31 आता लवकरच टेक बाजारात एंट्री घेणार आहे.

Samsung Galaxy M31 वाई-फाई अलायंस वर लिस्ट केला गेला आहे. हि लिस्टिंग 22 जानेवारीची आहे तसेच वेबसाइट वर फोन SM-31S5/DS मॉडेल नंबर सह समोर आला आहे. सर्टिफिकेशन्स मध्ये फोनचे जास्त स्पेसिफिकेशन्स तर समोर आले नाहीत पण असे समजले आहे कि सॅमसंग गॅलेक्सी एम31 एंडरॉयडच्या नवीन ओएस एंडरॉयड 10 वर लॉन्च होईल. तसेच लिस्टिंग मध्ये फोन 2.4GHz आणि 5GHz वाई-फाई फ्रिक्वेंसी बॅंड सह दाखवण्यात आला आहे. वाई-फाई सर्टिफाइड झाल्यानंतर आशा आहे कि येत्या काही दिवसात सॅमसंग Galaxy M31 टेक मंचावर सादर करू शकते.

Samsung Galaxy M31

सॅमसंग गॅलेक्सी एम31 बद्दल बोलायचे तर हा फोन Galaxy M30 आणि Galaxy M30s चा अपग्रेडेड वर्जन असेल. आतापर्यंत समोर आलेल्या लीक्सनुसार हा स्मार्टफोन एंडरॉयड 10 सह क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 665 चिपसेट वर चालेल. तसेच हा फोन बाजारात 6 जीबी रॅम सह लॉन्च केला जाऊ शकतो. फोटोग्राफीसाठी या फोन मध्ये 48 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर असल्याचे लीक मध्ये समोर आले आहे. त्याचबरोबर Galaxy M31 मध्ये 12 मेगापिक्सलची वाइड अँगल लेंस आणि 5 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर मिळू शकतो. Samsung Galaxy M31 गीकबेंच वर SM-M315F मॉडेल नंबर सह लिस्ट झाला आहे जिथे फोन मध्ये 1.74गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेला आक्टाकोर प्रोसेसर असल्याचे समोर आले होते.

Samsung Galaxy M11

विशेष म्हणजे सॅमसंग गॅलेक्सी एम सीरीजचा लो बजेट स्मार्टफोन गॅलेक्सी एम11 पण वाई-फाई अलायंस वर लिस्ट झाला आहे. या वेबसाइट वर फोन SM-M115F मॉडेल नंबर सह लिस्ट केला गेला आहे. लिस्टिंग मध्ये समजले आहे कि सॅमसंग गॅलेक्सी एम11 कंपनीच्या यूजर इंटरफेस यूआई 2.0 आधारित एंडरॉयड 10 वर सादर केला जाईल. तसेच फोन मध्ये 2.4GHz फ्रिक्वेंसी असलेला वाई-फाई बॅंड दिला जाईल. बोलले जात आहे कि हा स्मार्टफोन 128 जीबी इंटरनल स्टोरेज सह लॉन्च होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here