Samsung ने मोठ्या प्रतीक्षेनंतर आज अखेरीस आपला सर्वात मोठी बॅटरी असलेला स्मार्टफोन Samsung Galaxy M51 सादर केला आहे. अनेक दिवस लीक्स आणि बातम्यांमध्ये राहिल्यानंतर सॅमसंगच्या या पावरफुल स्मार्टफोनने बाजारात पदार्पण केले आहे. सॅमसंगने ऑनलाईन ईवेंट द्वारे आज गॅलेक्सी एम51 भारतात लॉन्च केला आहे. हा फोन 24,999 रुपयांच्या बेस किंमतीत लॉन्च झाला आहे जो येत्या 18 सप्टेंबर पासून देशात विक्रीसाठी उपलब्ध होईल. चला जाणून घेऊया सॅमसंगच्या या बहुप्रतीक्षित स्मार्टफोन मध्ये काय खास आहे?
दमदार बॅटरी
Samsung Galaxy M51 लॉन्च होण्याआधीच प्रसिद्ध होण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे फोन मधील 7,000एमएएच ची दमदार बॅटरी. हा सॅमसंगचा पहिला असा स्मार्टफोन आहे जो इतक्या मोठ्या बॅटरी सह लॉन्च झाला आहे. सॅमसंग गॅलेक्सी एम51 कंपनीने 25वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी सह बाजारात आणला आहे जी फोन वेगाने चार्ज करते. चार्जिंगसाठी फोन मध्ये यूएसबी टाईप-सी पोर्ट देण्यात आला आहे. Galaxy M51 रिवर्स चार्जिंगला पण सपोर्ट करतो.
आर्कषक डिस्प्ले
मोठ्या बॅटरी प्रमाणे Samsung Galaxy M51 स्मार्टफोन मोठ्या डिस्प्लेला पण सपोर्ट करतो. कंपनीने हा फोन पंच-होल डिस्प्ले वर लॉन्च केला आहे. स्क्रीनच्या तीन कडा बेजल लेस आहेत तर खालच्या बाजूला बारीक चिन पार्ट देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन 6.7 इंचाच्या मोठ्या सुपर एमोलेड प्लस इनफिनिटी ‘ओ’ डिस्प्लेला सपोर्ट करतो जो 60 हर्ट्ज रिफ्रेश रेट वर चालतो. स्क्रीनच्या वरच्या बाजूला मध्यभागी पंच-होल देण्यात आला आहे.
64 मेगापिक्सल क्वॉड रियर कॅमेरा
Samsung Galaxy M51 क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. या सेटअप मध्ये एलईडी फ्लॅश सह एफ/1.8 अपर्चर असलेला 64 मेगापिक्सलचा प्राइमरी Sony IMX682 सेंसर देण्यात आला आहे ज्या सोबत एफ/2.2 अपर्चर असलेली 12 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेंस, एफ/2.4 अपर्चर असलेली 5 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आणि एफ/2.4 अपर्चर असलेला 5 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आहे.
शानदार सेल्फी
चांगल्या रियर कॅमेरा सेटअप प्रमाणे Samsung Galaxy M51 चा सेल्फी कॅमेरा पण शानदार आहे. सॅमसंगचा हा फोन 32 मेगापिक्सलच्या Sony IMX616 फ्रंट कॅमेरा सेंसरला सपोर्ट करतो जो डिस्प्लेच्या वरच्या बाजूला पंच-होल मध्ये आहे. सॅमसंग गॅलेक्सी एम51 चा फ्रंट कॅमेरा आर्टिफिशियल इंटेलिजेंस टेक्नॉलॉजी सह येतो.
हे देखील वाचा: 5,000एमएएच बॅटरी आणि 5 कॅमेऱ्यांसह लॉन्च झाला Samsung चा पावरफुल फोन Galaxy A42 5G
पावरफुल प्रोसेसिंग
Samsung Galaxy M51 कंपनीने एंडरॉयड 10 ओएस वर सादर केला आहे जो सॅमसंगच्या वनयूआई 2.0 सह चालतो. तसेच प्रोसेसिंगसाठी या फोन मध्ये 2.2गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसर सह 8नॅनोमीटर फॅब्रिकेशन टेक्नॉलॉजी वर क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगॉन 730जी चिपसेट देण्यात आला आहे. तसेच ग्राफिक्ससाठी हा फोन एड्रेनो 618 जीपीयू ला सपोर्ट करतो.
रॅम व स्टोरेज
सॅमसंग गॅलेक्सी एम51 ने इंडियन मार्केट मध्ये दोन वेरिएंट्स सह एंट्री केली आहे. फोनचा बेस वेरिएंट 6 जीबी रॅम सह 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो तर दुसऱ्या मध्ये 8 जीबी रॅम सह 128 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. Samsung Galaxy M51 च्या या दोन्ही वेरिएंट्स मध्ये स्टोरेज माइक्रोएसडी कार्डने 512जीबी पर्यंत वाढवता येते.
हे देखील वाचा: Samsung Galaxy S20 चा स्वस्त वेरिएंट कंपनीच्या साइट वर झाला लिस्ट, येईल लवकरच
किंमत व सेल
Samsung Galaxy M51 च्या किंमतीबाबत बोलायचे तर फोनचा 6 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वेरिएंट 24,999 रुपयांमध्ये लॉन्च झाला आहे तर गॅलेक्सी एम51 च्या 8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वेरिएंटने 26,999 रुपयांमध्ये बाजारात एंट्री केली आहे. सॅमसंग गॅलेक्सी एम51 येत्या 18 सप्टेंबर पासून शॉपिंग साइट अमेझॉन इंडिया वर Celestial Black आणि Electric Blue कलर मध्ये विक्रीसाठी उपलब्ध होईल.
सॅमसंग गॅलेक्सी एम51 वीडियो


















