Samsung घेऊन येत आहे 50MP Selfie Camera असलेला Galaxy M55 5G फोन, भारतात एप्रिलमध्ये होईल लाँच

Samsung Galaxy M55 5G जागतिक बाजारात लाँच झाला आहे आणि आता भारतीय बाजाराची वेळ आहे. कंपनीने कंफर्म केले आहे की गॅलेक्सी एम55 5जी फोन भारतात लाँच करणार आहे. शॉपिंग साईट Amazon वर या सॅमसंग फोनचे प्रोडक्ट पेज पण लाईव्ह करण्यात आले आहे जिथे मोबाईलचा फोटो, फिचर्स व स्पेसिफिकेशन समोर आले आहेत.

Samsung Galaxy M55 5G भारतातील लाँचची माहिती

सॅमसंग गॅलेक्सी एम55 5जी फोन एप्रिल मध्ये भारतात लाँच होईल. कंपनीने घोषणा केली आहे की हा स्मार्टफोन Snapdragon 7 Gen 1 चिपसेटवर काम करेल. सध्या लाँचची तारिख ब्रँडकडून सांगण्यात आलेली नाही, परंतु सॅमसंगने याला #MustBeAMonster हॅशटॅग सह टिझ केले आहे. Galaxy M55 5G फोन लाँचनंतर रिटेल स्टोर्स व अ‍ॅमेझॉन वेबसाईटवरून विकत घेता येईल.

Samsung Galaxy M55 5G भारतातील किंमत (लीक)

8GB RAM + 128GB Storage = ₹26,999
8GB RAM + 256GB Storage = ₹29,999
12GB RAM + 256GB Storage = ₹32,999

टिपस्टर सुधांशूनुसार गॅलेक्सी ए55 5जी फोन भारतात तीन व्हेरिएंट्समध्ये विकला जाईल. याच्या 8 जीबी रॅमसह येत्या 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 26,999 रुपये तसेच 256 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 29,999 रुपये असू शकते. तसेच सर्वात मोठा 12 जीबी रॅम व 256 जीबी मेमरी व्हेरिएंट 32,999 रुपयांमध्ये लाँच होऊ शकतो.

Samsung Galaxy M55 5G स्पेसिफिकेशन (जागतिक)

  • 6.7″ 120Hz AMOLED Display
  • Qualcomm Snapdragon 7 Gen 1
  • 8GB RAM + 256GB Storage
  • 50MP Rear Camera
  • 50MP Selfie Camera
  • 25W 5,000mAh Battery

डिस्प्ले: सॅमसंग गॅलेक्सी एम55 5जी फोन 6.7 इंचाच्या फुलएचडी+ स्क्रीनवर लाँच झाला आहे. पंच-होल स्टाईल असणारी ही स्क्रीन अ‍ॅमोलेड पॅनलवर बनली आहे जी 120 हर्ट्झ रिफ्रेश रेट व 1000 निट्स ब्राईटनेसला सपोर्ट करते. हा फोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरला पण सपोर्ट करतो.

परफॉर्मन्स: Galaxy M55 5G अँड्रॉइड 14 वर सादर करण्यात आला आहे जो वनयुआय 6.1 वर चालतो. तसेच प्रोसेसिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 7 जेन 1 चिपसेट देण्यात आला आहे. हा प्रोसेसर भारतीय मॉडेलमध्ये मिळेल. जागतिक बाजारात हा फोन 8 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेजवर लाँच झाला आहे.

कॅमेरा: सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी M55 च्या समोर 50 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. डिव्हाईसच्या बॅक पॅनलमध्ये OIS-सक्षम 50-मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा, अल्ट्रा-वाईड शॉट्ससाठी 8-मेगापिक्सलचा कॅमेरा आणि 2-मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा आहे.

बॅटरी: पावर बॅकअपसाठी या सॅमसंग फोनमध्ये 5,000एमएएच बॅटरी दिली आहे. अपेक्षा केली जात आहे की, हा फोन भारतीय बाजारात 6,000 एमएएच बॅटरीवर लाँच केला जाईल. तसेच मोबाईलचे जागतिक मॉडेल 25वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीला पण सपोर्ट करते.

इतर: डिव्हाईसमध्ये ऑडियोफाईल्ससाठी ड्युअल स्पिकर आहेत. यात धूळ आणि पाणी प्रतिरोधसाठी IP67 रेटिंगसह पॉलीकार्बोनेट बिल्ड आहे. M55 ची जाडी 7.8mm आहे आणि याचे वजन 180 ग्रॅम आहे. फोनवर One UI 6.1 स्किन आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here