11 ऑक्टोबरला लॉन्च होईल आॅनर 8सी, 4जीबी रॅम, नॉच डिस्प्ले व डुअल कॅमेरा सह असेल मोठी पावरफुल बॅटरी

टेक कंपनी आॅनर ने मी महिन्यात भारतात आपलं याकामी बजेट वाला शानदार स्मार्टफोन आॅनर 7सी लॉन्च केला होता. हा स्मार्टफोन आपल्या स्पेसफिकेशन्स सह आपल्या लुक मुले अनेकांना आवडला. आता आॅनर आपल्या या शानदार स्मार्टफोनचा अजून एक नवीन मॉडेल घेऊन येणार आहे. आॅनर ने आॅफिशियल घोषणा केली आहे कि कंपनी येत्या 11 ऑक्टोबरला आॅनर 7सी चा अपग्रेडेड वर्जन आॅनर 8सी लॉन्च करणार आहे.

आॅनर ने आपल्या नवीन स्मार्टफोन साठी मीडिया इन्वाईट पाठवायला सुरवात केली आहे. कंपनी ने सांगितले आहे कि येत्या 11 ऑक्टोबरला आॅनर 8सी अंर्तराष्ट्रीय मंचावर सादर केला जाईल. हा फोन सध्या चीनी बाजारातच लॉन्च होईल आणि येत्या काही महिन्यात हा फोन भारतात आणला जाईल. आॅनर 8सी च्या लॉन्च डेट व्यतिरिक्त कंपनी ने अजूनतरी इतर कोणत्याही स्पेसिफिकेशन्स व फीचरची माहिती दिली नाही.

आॅनर 8सी च्या मीडिया इन्वाईट मध्ये फोन बॅटरी दाखवण्यात आली आहे सोबत ‘चार्जिंग अप’ लिहिण्यात आले आहे. या ईमेज टीजर वरून स्पष्ट झाले आहे कि आॅनर 8सी कंपनी मोठ्या व पावरफुल बॅटरी सह बाजारात आणेल. तसेच फोन बद्दल समोर आलेल्या लीक्स नुसार फोन 19:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या डिस्प्ले सह सादर केला जाईल ज्यात नॉच असेल. हा फोन 1,520 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 6.26-इंचाच्या स्क्रीनला सपोर्ट करेल.

लीक नुसार कंपनी हा फोन 2 वेरिएंट मध्ये लॉन्च करू शकते ज्यात 3जीबी रॅम सह 32जीबी मेमरी आणि 4जीबी रॅम सह 64जीबी मेमरी असेल. हा फोन लेटेस्ट एंडरॉयड सह 1.8गीगाहर्ट्ज आॅक्टा-कोर प्रोसेसर वर चालेल. तसेच फोटोग्राफी साठी आॅनर 8सी मध्ये 13-मेगापिक्सल 2-मेगापिक्सलचा रियर कॅमेरा तसेच 8-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला जाऊ शकतो. पण फोनच्या ठोस स्पेसिफिकेशन्स आणि किंमतीसाठी 11 ऑक्टोबरच्या वाट पाहावी लागेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here