Samsung ने मंगळवारी कॅलिफोर्निया मधील सॅन फ्रॅसिस्को मध्ये गॅलेक्सी अनपॅक्ड 2020 इवेंट मध्ये आपली Galaxy S20 सीरीज सादर केली. यात कंपनीने आपला नवीन फोल्डेबल फोन Samsung Galaxy Z Flip पण सादर केला आहे. कंपनीने लॉन्च केलेल्या या नवीन फोल्डेबल फोन बद्दल अनेक दिवसांपासून लीक व बातम्या येत होत्या. सॅमसंग गॅलेक्सी झेड फ्लिप मध्ये ‘फ्लेक्स मोड’ आहे.
हा फोन बनवण्यासाठी कंपनीने Google सोबत काम केले आहे. या मदतीमुळे यूजर्स निवडक ऍप्स स्पिल्ट स्क्रीन मोड मध्ये वापरू शकतात. कंपनीच्या मते फोन कमी प्रमाणात निवडक मार्केटस मध्ये उपलब्ध होईल.
सॅमसंग गॅलेक्सी झेड फ्लिपची किंमत आणि उपलब्धता
सॅमसंग गॅलेक्सी झेड फ्लिप ची किंमत पाहता हा 1,380 डॉलर (जवळपास 98,400 रुपये) आहे. कंपनीने घोषणा केली आहे कि डिवाइसची विक्री मार्केट मध्ये 14 फेब्रुवारी पासून सुरु होईल. हँडसेट मिरर ब्लॅक, मिरर पर्पल कलर ऑप्शन मध्ये सेलसाठी उपलब्ध होईल. तसेच काही दिवसांनी हा डिवाइस मिरर गोल्ड वेरिएंट मध्ये सादर केला जाईल.
सॅमसंग गॅलेक्सी चे स्पेसिफिकेशन्स
Samsung Galanxy Z Flip च्या स्पेसिफिकेशन्स बद्दल बोलायचे तर यात प्राइमरी फोल्डेबल डिस्प्ले 6.7-इंचाची आहे. तसेच या फोन मध्ये इनफिनिटी फ्लेक्स डिस्प्ले देण्यात आला आहे. बाहेरच्या बाजूला 1.1-इंच सुपर एमोलेड डिस्प्ले आहे. डिवाइस मध्ये ऑक्टा-कोर प्रोसेसरचा वापर करण्यात आला आहे जो क्लॉक स्पीड 2.95 गीगाहर्ट्ज सह येतो.
फोन मध्ये 8 जीबी पर्यंतचा रॅम देण्यात आला आहे. झेड फ्लिप ची इंटरनल स्टोरेज 256 जीबी आहे आणि फोन मध्ये माइक्रोएसडी कार्ड सपोर्ट आहे. फोटोग्राफी पाहता सॅमसंग गॅलेक्सी झेड फ्लिप मध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप आहे. यात एक 12 मेगापिक्सलचा वाइड-अँगल कॅमेरा आहे आणि सोबत 12 मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड अँगल कॅमेरा पण मिळतो. फ्रंट पॅनल वर Samsung Galaxy Z Flip मध्ये 10 मेगापिक्सलचा सेल्फी सेंसर आहे.
सॅमसंग गॅलेक्सी झेड फ्लिप अँड्रॉइड 10 ऑपरेटिंग सिस्टम वर चालतो. तर कनेक्टिविटीसाठी फोन मध्ये 4जी एलटीई, वाई-फाई 802.11एसी, ब्लूटूथ 5.0, यूएसबी टाइप-सी, एनएफसी आणि जीपीएस (ए-जीपीएस) चा समावेश आहे. डिवाइस मध्ये पावर बॅकअपसाठी 3,300 एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे जी फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
















