सॅमसंगच्या महागड्या फोल्डेबल स्मार्टफोनच्या किंमतीत मोठी कपात; जाणून घ्या नवीन किंमत आणि फीचर्स

Samsung नं काही दिवसांपूर्वी आपल्या पुढील महिन्यात होणाऱ्या Galaxy Unpacked इव्हेंटची घोषणा केली होती. सॅमसंगचा हा आगामी मेगा लाँच इव्हेंट 10 ऑगस्टला आयोजित केला जाणार आहे, ज्यात ज्यात कंपनी आपले नेक्स्ट जेनेरेशन फोल्डेबल स्मार्टफोन लाँच करेल. हे नवीन फोल्डबेल बाजारात येण्याआधी कंपनीनं आपल्यात जुन्या फोल्डेबल स्मार्टफोन्सच्या किंमतीत कपात केली आहे. सॅमसंगच्या सर्वात महागड्या फोल्डेबल स्मार्टफोन Galaxy Z Fold 3 5G ची किंमत कमी झाली आहे. हा फोल्डेबल फोन गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये लाँच करण्यात आला होता. सॅमसंगचा हा फोन दोन व्हेरिएंटमध्ये सादर करण्यात आला होता. कंपनीनं दोन्ही व्हेरिएंटच्या किंमतीत 10,000 रुपयांची कपात केली आहे.

Samsung Galaxy Z Fold 3 5G ची नवीन किंमत

गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये Samsung Galaxy Z Fold 3 5G स्मार्टफोनचे दोन व्हेरिएंट भारतात सादर करण्यात आले होते. यातील 12GB रॅम व 256GB स्टोरेज असलेल्या बेस व्हेरिएंटची किंमत 1,49,999 रुपये ठेवण्यात आली होती. तर 12GB रॅम व 512GB स्टोरेज मॉडेल 1,57,999 रुपयांमध्ये सादर करण्यात आला होता. आता या स्मार्टफोनच्या किंमतीत कपात करण्यात आली आहे. त्यामुळे सॅमसंगच्या या फोल्डेबल फोनचा 256GB व्हेरिएंट 1,39,999 रुपये आणि 512GB व्हेरिएंट 1,47,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. सॅमसंगचा हा फोल्डेबल फोन फँटम ब्लॅक, फँटम ग्रीन आणि फँटम सिल्वर कलरमध्ये सादर करण्यात आला आहे. कंपनीनं या फोनची नवीन किंमत आपल्या अधिकृत वेबसाईटवर अपडेट केली आहे. हे देखील वाचा: जे अ‍ॅप्पलला झेपलं नाही ते Samsung करणार; फोल्डेबल फोन्सची चौथी पिढी येतेय ग्राहकांच्या भेटीला

Samsung Galaxy Z Fold 3 चे स्पेसिफिकेशन्स

Samsung Galaxy Z Fold 3 स्मार्टफोनमध्ये 6.2-इंचाचा HD+ Dynamic AMOLED कव्हर डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. या फोनमध्ये 7.6-इंचाचा QXGA+ Dynamic AMOLED फोल्डेबल डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट देखील 120Hz आहे. सॅमसंगचा हा फोन Snapdragon 888 प्रोसेसरसह येतो. हा Android 11 आधारित सॅमसंगच्या OneUI वर चालतो. फोनमध्ये 4,400mAh ची बॅटरी आणि 25W फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे. हे देखील वाचा: रेडमी-रियलमीची झोप उडणार! 10 हजारांच्या आत देखील 5G; स्वस्त Samsung Galaxy A04s मध्ये 5G नेटवर्क

सॅमसंगच्या या फोल्डेबल फोनमध्ये एकूण पाच कॅमेरा सेन्सर आहेत. फोनच्या बॅक पॅनलवर तीन कॅमेरा, मेन डिस्प्लेमध्ये एक कॅमेरा आणि कव्हर डिस्प्लेमध्ये एक सेल्फी कॅमेरा आहे. या फोनच्या रियर कॅमेरा मॉड्यूलमध्ये 12MP चा अल्ट्रावाईड सेन्सर, OIS सह 12MP ड्युअल पिक्सल ऑटोफोकस प्रायमरी कॅमेरा, OIS असलेला 12MP चा टेलीफोटो कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे. या फोनमध्ये 2X ऑप्टिकल झूम आणि 10X डिजिटल झूम सपोर्ट देखील मिळतो. फोनच्या आउटर डिस्प्लेमध्ये 10MP चा फ्रंट कॅमेरा आणि तर फोल्डिंग डिस्प्लेमध्ये 4MP चा अंडरडिस्प्ले कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here