जे अ‍ॅप्पलला झेपलं नाही ते Samsung करणार; फोल्डेबल फोन्सची चौथी पिढी येतेय ग्राहकांच्या भेटीला

आयफोन अँड्रॉइडच्या युद्धात बऱ्याचदा आयफोनला वरचढ मानलं जातं. परंतु फोल्डेबल फोन्सच्या इनोव्हेशनच्या बाबतीत प्रिमीयम स्मार्टफोन निर्माता कंपनी Apple अजूनही मागे आहे. तर दुसरीकडे अँड्रॉइड स्मार्टफोन निर्माता Samsung फोल्डेबल स्मार्टफोन्सची चौथी पिढी सादर करण्याची तयारी करत आहे. कंपनीनं आपल्या आगामी Galaxy Unpacked इव्हेंटची घोषणा केली आहे. सॅमसंगचा हा ग्रँड इव्हेंट 10 ऑगस्ट 2022 रोजी आयोजित केला जाईल.

पुढील महिन्यात 10 तारखेला होणारा हा इव्हेंट ऑनलाइन आयोजित करण्यात येईल. याचं एक पोस्टर देखील कंपनीनं रिलीज केलं आहे. यातून आगामी डिवाइसेसच्या लाँचची माहिती ऑफिशियल करण्यात आली आहे. सॅमसंगचा हा इव्हेंट कंपनीच्या ऑफिशियल वेबसाईट Samsung.com वर 9am E.T. वाजता बघता येईल.

सॅमसंगनं एक व्हिडीओ शेयर करून सांगतील आहे की, या इव्हेंटमध्ये कंपनीचे अपकमिंग फोल्डेबल स्मार्टफोन लाँच केले जातील. त्यामुळे अंदाज लावला जात आहे की सॅमसंगचे बहुप्रतीक्षित Samsung Galaxy Z Fold 4 आणि Samsung Galaxy Z Flip 4 सह Samsung Galaxy Watch 5 सीरीज (Galaxy Watch 5 आणि Galaxy Watch 5 Pro), आणि Samsung Galaxy Buds 2 Pro इयरबड्स देखील लाँच केले जातील. Samsung Galaxy Z Flip 4 स्मार्टफोन Lilac कलर ऑप्शनमध्ये सादर केला जाऊ शकतो. सॅमसंगचे आगामी फोन अनेक कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध होतील. हे देखील वाचा: रेडमी-रियलमीची झोप उडणार! 10 हजारांच्या आत देखील 5G; स्वस्त Samsung Galaxy A04s मध्ये 5G नेटवर्क

Samsung Galaxy Z Fold 4 चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स

कंपनी या फोल्डेबलच्या डिजाईनमध्ये जास्त बदल करणार नाही. जुना जेनरेशनप्रमाणे या फोनमध्ये एक इनर डिस्प्ले आणि एक आऊटर डिस्प्ले मिळेल. Samsung Galaxy Z Fold 4 स्मार्टफोनमध्ये 7.6-इंचाचा AMOLED डिस्प्ले दिला जाईल, ज्याचे रिजोल्यूशन 2K आणि रिफ्रेश रेट 120Hz आहे. या फोल्डेबल फोनच्या कव्हरमध्ये 6.2-इंचाचा HD+ कव्हर डिस्प्ले दिला जाऊ शकतो. सॅमसंगच्या या आगामी फोनमध्ये 10MP चा सेल्फी कॅमेरा असण्याची शक्यता आहे. फोनच्या मागे ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळेल, ज्यात 50MP चा प्रायमरी कॅमेरा सेन्सर दिला जाऊ शकतो. सोबतीला 2MP चा अल्ट्रा वाईड कॅमेरा आणि 12MP चा टेलीफोटो कॅमेरा असेल. हे देखील वाचा: 14 हजारांत Samsung चा नवाकोरा 5G फोन; Galaxy M13 4G मॉडेल देखील भारतीयांच्या भेटीला

Samsung Galaxy Z Fold 4 स्मार्टफोनबद्दल दावा केला जात आहे की फोनमध्ये 4,400mAh बॅटरी आणि 45W फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला जाऊ शकतो. हा फोन 15W वायरलेस फास्ट चार्जिंग आणि 10W रिवर्स वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करू शकतो. Galaxy Z Fold 4 स्मार्टफोन Snapdragon 8+ Gen 1 प्रोसेसरसह बाजारात येईल, जो क्वॉलकॉमचा लेटेस्ट आणि सर्वात शक्तिशाली प्रोसेसर आहे. जोडीला 12GB LPDDR5 RAM आणि 512GB पर्यंत स्टोरेज मिळेल. आगामी सॅमसंग फोल्डेबल फोन Android 12 आधारित OneUI 4.0 कस्टम स्किनवर चालेल.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here