Samsung Galaxy Z Fold5 5G फोन आणि Samsung Galaxy Z Flip5 5G स्मार्टफोन भारतात लाँच झाले आहेत. हे सॅमसंगचे आतापर्यंतचे सर्वात अॅडवांस, स्टाईलिश आणि पावरफुल मोबाइल फोन्स पैकी एक आहे. अत्यंत शक्तिशाली स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्सनी पुरेपूर भरलेले ह्या फोल्डेबल सॅमसंग फोनची भारतीय किंमत आणि त्यावरील ऑफर्सची माहिती पुढे देण्यात आली आहे.
Samsung Galaxy Z Fold 5 इंडिया प्राइस
- 12GB RAM + 256GB Storage = 1,54,999
- 12GB RAM + 512GB Storage = 1,64,999
- 12GB RAM + 1TB Storage = 1,84,999
सॅमसंग गॅलेक्सी झेड फोल्ड5 5जी फोन भारतात 12जीबी रॅमसह लाँच झाला आहे जो तीन स्टोरेज ऑप्शनमध्ये विकत घेता येईल. ह्यात 256जीबी स्टोरेज, 512जीबी स्टोरेज आणि 1टीबी स्टोरेजचा समावेश आहे. नवीन सॅमसंग फोल्ड फोन Icy Blue, Cream आणि Phantom Black मध्ये सेलसाठी उपलब्ध होईल.
ह्या फोनच्या फीचर्स व स्पेसिफिकेशन्सची माहिती जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
Samsung Galaxy Z Flip 5 ची भारतीय किंमत
- 8GB RAM + 256GB Storage = 99,999
- 8GB RAM + 512GB Storage = 1,09,999
सॅमसंग गॅलेक्सी झेड फ्लिप5 5जी स्मार्टफोन भारतात दोन मेमरी व्हेरिएंट्समध्ये लाँच झाला आहे. ह्यात 8जीबी रॅमसह 256जीबी इंटरनल स्टोरेज तसेच 8जीबी रॅमसह 512जीबी इंटरनल मेमरी देण्यात आली आहे. लेटेस्ट गॅलेक्सी फ्लिप फोन तीन मॉडेल्समध्ये विकत घेता येईल ज्यात Mint, Cream, Graphite आणि Lavender कलरचा समावेश आहे.
ह्या फोल्डेबल फोनचे स्पेसिफिकेशन्स वाचण्यासाठी इथे क्लिक करा
सॅमसंग फोल्डेबल फोन्सवरील ऑफर्स
दोन्ही सॅमसंग फोल्डेबल स्मार्टफोन्स भारतात प्री-बुकिंगसाठी उपलब्ध झाले आहेत. Samsung Galaxy Z Flip5 ची प्री-बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना 20,000 रुपयांचे बेनिफिट्स मिळतील तर Galaxy Z Fold5 प्री-बुक करणाऱ्या युजर्सना 23,000 रुपयांचा फायदा मिळेल.
फक्त इतकेच नव्हे तर जे लोक 27 जुलै दुपारी 12 वाजता सुरु होणाऱ्या “Samsung Live” इव्हेंटमध्ये ह्या मोबाइल्सची प्री-बुकिंग केल्यास Galaxy Z Fold5 सोबत 6,299 रुपयांच्या Standing Case + Strap तसेच Flip5 सोबत 4,199 रुपयांची Silicone Case + Ring मोफत मिळेल.