सॅमसंगनं गॅलेक्सी अनपॅक्ड इव्हेंटमधून कंपनीचा बहुचर्चित फोल्डेबल फोन Galaxy Z Fold5 लाँच करण्यात आला आहे. हा इव्हेंट साउथ कोरियामधील सियोलमध्ये करण्यात आला आहे. ह्यात Galaxy Z Flip 5, टॅबलेटसह अन्य स्मार्ट गॅजेट देखील आले आहेत. ह्या पोस्टमध्ये आपण गॅलेक्सी Z फोल्ड5 ची किंमत, फीचर्स, स्पेसिफिकेशन्स आणि डिजाइन जाणून घेऊया.
Galaxy Z Fold5 डिजाइन
नवीन Z Fold5 च्या बॅक पॅनलवर एक छोटा एलईडी फ्लॅश आणि ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. तर आतील डिस्प्लेवर एक अंडर डिस्पले कॅमेरा आणि एक सेल्फी कॅमेरा आहे. डिवाइस आयसी ब्लू, फँटम ब्लॅक, क्रीम, ग्रे आणि ब्लू जैसे कलर ऑप्शनमध्ये आला आहे.
Galaxy Z Fold5 चे स्पेसिफिकेशन्स
- प्रायमरी डिस्प्ले : सॅमसंगच्या नवीन फोल्डेबल फोनमध्ये 7.6 इंचाचा QXGA+ डायनॅमिक अॅमोलेड 2X इंफिनिटी फ्लेक्स प्रायमरी डिस्पले देण्यात आला आहे. ज्यात 120Hz अॅडाप्टिव रिफ्रेश रेट, 2176 x 1812 पिक्सल रिजॉल्यूशन आणि 374 पीपीआयला सपोर्ट मिळतो.
- कव्हर डिस्प्ले : कव्हरला 6.2 इंचाचा एचडी प्लस डायनॅमिक अॅमोलेड डिस्प्ले आहे. जो 2316 x 904 पिक्सल रिजॉल्यूशन, 402 पीपीआय आणि 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो.
- प्रोसेसर : हा फोन दमदार क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 जेन 2 प्लॅटफॉर्मसह आला आहे.
- मेमोरी : डिवाइसमध्ये 12 जीबी पर्यंत रॅम +512जीबी पर्यंत इंटरनल स्टोरेज मिळते.
- कॅमेरा : कव्हर कॅमेरा 10 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. अंडर डिस्पले मध्ये 4 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. तर मागे रियर ड्युअल कॅमेरा मध्ये 12 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड कॅमेरा आणि 12 मेगापिक्सलची आणखी एक लेन्स आहे. डिवाइसच्या रियर पॅनलवर ट्रिपल कॅमेरा सेटअपमध्ये 50 मेगापिक्सलचा वाइड अँगल कॅमेरा ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायजेशनसह देण्यात आला आहे. जोडीला 12 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड कॅमेरा आणि 10 मेगापिक्सलचा टेली फोटो कॅमेरा 3एक्स ऑप्टिकल झूमसह मिळतो.
- बॅटरी : ह्या सॅमसंग फोनमध्ये 4400एमएएचची ड्युअल बॅटरी देण्यात आली आहे जी 25W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते तसेच वायरलेस चार्जिंग सपोर्ट देखील आहे.
- सुरक्षाf: सुरक्षेसाठी डिवाइसमध्ये IPX8 रेटिंग देण्यात आली आहे. त्यामुळे फोन काही प्रमाणात वॉटर रजीस्टंट बनतो. जोडीला फिंगरप्रिंट सेन्सर देखील आहे.
- कनेक्टिव्हिटी : कनेक्टिव्हिटीसाठी ड्युअल नॅनो सिम 5G, वायफाय 6, ब्लूटूथवी 5.3 सारखे पर्याय आहेत.