2021 मध्ये हे Samsung फोन करतील धमाल, बघा संपूर्ण यादी

Pic Credit : TheStatesman

Samsung ला साल 2020 चांगले गेले आहे. या कोरियन कंपनीने एकीकडे भारतीय बाजारात युजर्सची गरजा समजून प्रत्येक प्राइस सेग्मेंट आणि बजेट मध्ये आपले स्मार्टफोन लाॅन्च केले तर दुसरीकडे गॅलेक्सी ‘ए’ सीरीज, गॅलेक्सी ‘एम’ सीरीज आणि गॅलेक्सी ‘एफ’ सीरीज सह ऑनलाईन तसेच ऑफलाईन बाजारातील ग्राहकांना पण आपल्याकडे आर्कषित केले आहे. चायनीज कंपन्यांच्या गर्दीत नॉन-चीनी असणे पण सॅमसंगसाठी खूप लाभदायी ठरले. यावर्षी इंडियन स्मार्टफोन मार्केट मध्ये हिट झाल्यानंतर फक्त सॅमसंग फॅन्सच नाही तर इतर मोबाईल युजर्स तसेच टेक विश्वाच्या नजरा पण सॅमसंगच्या साल 2021 च्या प्लान वर आहेत. या आगामी वर्षात सॅमसंग अनेक नवीन स्मार्टफोन्स सह टेक्नॉलॉजीचे प्रदर्शन करणार आहे. पुढल्या वर्षी म्हणजे 2021 मध्ये लाॅन्च होणाऱ्या अश्याच Samsung स्मार्टफोन्सची यादी आम्ही पुढे शेयर केली आहे.

Samsung Galaxy S21 Ultra

लीकनुसार सॅमसंग गॅलेक्सी एस21 अल्ट्रा मध्ये 6.8-इंचाचा Dynamic AMOLED 2X डिस्प्ले मिळू शकते जो 144 हर्ट्ज रिफ्रेश रेट सह बाजारात येऊ शकतो. लीकनुसार हा फोन अँड्रॉइड 11 वर लाॅन्च होईल तसेच सॅमसंगच्या वनयुआय 3.0 वर काम करेल. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता फोनच्या बॅक पॅनल वरील रियर कॅमेरा सेटअप मध्ये 108 मेगापिक्सलचा प्राइमरी रियर कॅमेरा सेंसर मिळू शकतो. गॅलेक्सी एस21 अल्ट्रा मध्ये सेल्फी आणि व्हिडीओ काॅलिंगसाठी 40 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा सेंसर दिला जाऊ शकतो.

लीक झालेले रेंडर्स पाहता कि फोनच्या सर्व कडांना स्लिम बेजल्स देण्यात आले आहेत, तसेच फोन मध्ये सेल्फी कॅमेऱ्यासाठी होल-पंच कटआउट देण्यात आली आहे जी स्क्रीनच्या टॉप सेंटर मध्ये आहे. वॉल्यूम रॉकर आणि पावर बटन स्क्रीनच्या उजव्या कडेवर जागा देण्यात आली आहे. चर्चा अशी आहे कि या फोनचे डायमेंशन 161.5×75.6×7.85mm असेल. तसेच फोन मध्ये एस पेन सपोर्ट मिळू शकतो, पण या पेनसाठी फोन मध्ये कोणताही विशेष स्लॉट दिला गेला. येत्या काळात लवकरच फोन बद्दल अजून माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

Samsung Galaxy S21 Plus

सॅमसंग गॅलेक्सी एस21 प्लस गीकबेंच वर 8 जीबी रॅम सह दाखवण्यात आला आहे. वेबसाइट वर हा फोन अँड्रॉइडच्या सर्वात नवीन ओएस अँड्रॉइड 11 सह सर्टिफाइड केला गेला आहे. फोन आक्टाकोर प्रोसेसर सह दाखवण्यात आला आहे जो दोन मॉडेल्स मध्ये लाॅन्च होईल. फोनचा एक मॉडेल क्वाॅलकाॅमच्या स्नॅपड्रॅगॉन 875 चिपसेटला सपोर्ट करेल. चर्चा अशी आहे कि फोनचा दुसरा मॉडेल एक्सनॉस 2100 चिपसेट सह लॉन्च होईल.

Samsung Galaxy S21+ संबंधित लीक्स पाहता बोलले जात आहे कि सॅमसंगचा हा फोन एमोलेड पॅनल वर लॉन्च केला जाईल जो 120हर्ट्ज रिफ्रेश रेट वर काम करणाऱ्या स्क्रीनला सपोर्ट करेल. लीकनुसार या फोन मध्ये 6.7 इंचाचा एलटीपीएस फुलएचडी+ पंच-होल डिस्प्ले दिला जाऊ शकतो. गॅलेक्सी एस21+ एक 5G फोन असेल जो Wi-Fi 6 आणि Bluetooth 5.1 सारख्या फीचर्स सह येईल. तसेच पावर बॅकअपसाठी या फोन मध्ये 4,800एमएएचची बॅटरी असल्याचे समोर येत आहे. चर्चा अशी आहे कि सॅमसंग गॅलेक्सी एस21 प्लस स्मार्टफोन Phantom Silver, Phantom Black आणि Phantom Violet कलर मध्ये बाजारात येईल.

Samsung Galaxy S21

सॅमसंग गॅलेक्सी एस21 बद्दल बोलले जात आहे कि भारतात हा सॅमसंगच्या एक्सनाॅस 2100 चिपसेट सह येईल. ग्लोबल लाॅन्च नंतर हि सीरीज भारतात प्री-बुकिंगसाठी उपलब्ध होईल जिची विक्री 29 जानेवारी पासून सुरु होईल. रिपोर्टनुसार सॅमसंग एक्सक्लूसिव स्टोर वर आतापासून 2,000 रुपये देऊन सीरीजचा कोणताही स्मार्टफोन प्री-बुक केला जाऊ शकतो. सीरीजचा लाॅन्च, किंमत आणि बुकिंग संबंधित ठोस माहितीसाठी आम्ही सॅमसंगच्या अधिकृत माहितीची वाट बघत आहोत.

सॅमसंग गॅलेक्सी एस21 ब्यूरो ऑफ इंडियन स्टॅंडर्ड्स (BIS) वर लिस्ट करण्यात आला आहे. गॅलेक्सी एस21 सीरीजचा एंट्री लेवल फोन SM-G991B मॉडेल नंबर सह लिस्ट केला गेला आहे. Samsung Galaxy S21 बद्दल मागे एक रिपोर्ट मध्ये सांगण्यात इले होते कि हा फोन 120हर्ट्ज रिफ्रेश रेट असलेल्या एफएचडी+ डिस्प्ले वर लाॅन्च होऊ शकतो जो एमोलेड पॅनल वर बनलेला असेल. फोन 4,000mAh ची बॅटरी सह कथितरित्या 25W पर्यंत फास्ट चार्जिंगला सपोर्ट सह येईल. पण मागच्या रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले होते कि स्मार्टफोन बॉक्स मध्ये चार्जर नसेल.

Samsung Galaxy A72 5G

सॅमसंग गॅलेक्सी A72 5G बाबत सध्या जास्त माहिती समोर आली नाही. समोर आलेल्या काही रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले आहे कि फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 7xx सीरीज चिपसेट सह शिप केला जाऊ शकतो. फोन मध्ये अँड्रॉइड 11 वन वन युआय कस्टम स्किन आणि एमओएलईडी डिस्प्ले हाई रिफ्रेश रेट सह येईल. सॅमसंग गॅलेक्सी A72 5G लॉन्च 2021 ची पहिल्या सहामाहीत येण्याची शक्यता आहे.

फोन मध्ये सेंटरला पंच-होल कटआउट असेल, ज्यात सेल्फी कॅमेरा दिला जाईल. बॅक पॅनल वर आयताकृती कॅमेरा मॉड्यूल चार सेंसर आणि एक एलईडी फ्लॅश आहे जो सॅमसंगच्या ब्रँडिंग सह येतो. फोन मध्ये वॉल्यूम रॉकर आणि पावर बटन उजवीकडे आहेत. सोबतच डिवाइस मध्ये 3.5mm ऑडियो जॅक, स्पीकर ग्रिल, माइक्रोफोन आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट बॉटमला आहेत. फोनच्या वर सिम ट्रेला जागा देण्यात आली आहे. फोन मध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर मिळेल.

Samsung Galaxy A52

सॅमसंग आपला हा फोन 5G आणि 4G दोन्ही मॉडेल्स मध्ये लाॅन्च करेल. Samsung Galaxy A52 स्मार्टफोनचा 4जी मॉडेल गीकबेंच वर लेटेस्ट अँड्रॉइड 11 ओएस सह येणार असल्याचे सांगितले आहे. वेबसाइट वर फोन 8 जीबी रॅम सह लिस्ट केला गेला आहे. आशा आहे कि सॅमसंग आपला मोबाईल फोन एकापेक्षा जास्त वेरिएंट्स मध्ये बाजारात घेऊन येईल. लिस्टिंग मध्ये फोनच्या प्रोसेसर सेक्शन मध्ये क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 720जी चिपसेटचे कोडनेम लिहिण्यात आले आहे.

Galaxy A51

Samsung Galaxy A52 चा 5G मॉडेल पाहता गीकबेंच लिस्टिंग वरून समजले आहे कि स्मार्टफोन 1.80 बेस क्लॉक फ्रिक्वेन्सी आणि ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 750G प्रोसेसर सह येईल. फोन Adreno 619GPU सह 6GB रॅम आणि अँड्रॉइड 11 वर चालेल. एका लीक मध्ये सांगण्यात आले आहे कि हा फोन 64 मेगापिक्सलच्या क्वाॅड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल. इतर तीन सेंसर अल्ट्रा-वाइड, मॅक्रो आणि डेप्थ सेंसर असतील.

Samsung Galaxy A32 5G

सॅमसंग गॅलेक्सी ए32 ब्रँडचा सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन असू शकतो. लीक रेंडर्स मध्ये सांगण्यात आले होते कि हा फोन प्लास्टिक बॉडी वर बनलेला असेल आणि फ्लॅट रियर पॅनल सह येईल. फोनच्या मागे क्वाड कॅमेरा सेटअप असेल. फोन मध्ये तीन कॅमेरा सेंसर वर्टिकल टॉप डावीकडे असेल. सोबतच या तिन्ही कॅमेरा सेंसरच्या मध्यभागी एक चौथा कॅमेरा सेंसर व एक एलईडी फ्लॅश असेल. फोटोजनुसार, फोन मध्ये खालच्या बाजूला 3.5 एमएम हेडफोन जॅक, यूएसबी टाइप-सी पोर्ट आणि एक लाउड स्पीकर ग्रिल असेल. हँडसेट मध्ये वरच्या बाजूला एक सेकंडरी माइक दिला जाईल.

Samsung Galaxy A32 5G संबंधित लीक्स नुसार हा 6.5-इंच फ्लॅट फ्रंट ड्यू-ड्रॉप नॉच सह इनफिनिटी-वी डिस्प्ले वर लाॅन्च होईल. हँडसेट मध्ये डावीकडे एक सिम कार्ड स्लॉट दिला जाईल. डिवाइस मध्ये उजवीकडे वॉल्यूम रॉकर्स आणि एक पावर बटन असेल. पावर बटन मधेच फिंगरप्रिंट सेंसर पण असेल. पण रिपोर्ट वरून गॅलेक्सी ए32 5G हँडसेटच्या कोणत्याही स्पेसिफिकेशन्सचा खुलासा झाला नाही. याआधी आलेल्या लीक मध्ये समजले होते कि हँडसेट मध्ये अल्ट्रा-वाइड सेंसर आणि 2 मेगापिक्सल डेप्थ कॅमेऱ्यासह 48 मेगापिक्सल प्राइमरी कॅमेरा दिला जाईल.

Samsung Galaxy F62

सॅमसंग गॅलेक्सी एफ62 या सीरीजचा दुसरा स्मार्टफोन बनू शकतो. गॅलेक्सी ‘एफ’ सीरीज मध्ये आतापर्यंत फक्त Samsung Galaxy F41 स्मार्टफोनच लाॅन्च केला गेला आहे. 91मोबाईल्सने काही दिवसांपूर्वीच एक्सक्लूसिव बातमी दिली होती कि Samsung Galaxy F62 ची निर्मिती भारतात नोयडा मधील फॅक्ट्री मध्ये सुरु झाली आहे. म्हणजे वर्षात पहली तिमाहीत गॅलेक्सी एफ62 मार्केट मध्ये येऊ शकतो.

Samsung Galaxy F41

Samsung Galaxy F62 बेंचमार्किंग साइट गीकबेंच वर दिसला आहे आणि लिस्टिंग नुसार गॅलेक्सी एफ62 मध्ये Samsung आपला Exynos 9825 चिपसेट देईल. डिवाइस मध्ये 6GB रॅम आणि अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टम दिली जाईल. Samsung Galaxy F62 च्या डिजाइन बद्दल सध्या कोणतीही माहिती समोर आली नाही. आगामी काळात फोनचू अजून माहिती मिळू शकते.

Samsung Galaxy M12

सॅमसंग गॅलेक्सी एम12 पण साल 2021 च्या सुरवातीला मार्केट मध्ये येऊ शकतो. फोनचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता आतापर्यंत समोर आलेल्या लीक्स नुसार हा स्मार्टफोन 6.7 इंचाच्या मोठ्या डिस्प्ले वर लाॅन्च केला जाऊ शकतो जो पंच होल डिजाईन वर बनला असेल. तसेच पावर बॅकअपसाठी या फोन मध्ये 7,000एमएएच ची मोठी बॅटरी असल्याचे लीक मध्ये समोर आले आहे. आशा उम्मीद आहे कि मोठ्या बॅटरीमुळे फोन मध्ये फास्ट चार्जिंग सपोर्ट पण मिळेल.

Samsung Galaxy M11

लीकनुसार फोटोग्राफीसाठी Samsung Galaxy M12 स्मार्टफोन क्वाॅड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल. फोनच्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह 13 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर दिला जाऊ शकतो त्यासोबतच 5 मेगापिक्सलची सेकेंडरी लेंस आणि 2 मेगापिक्सलचे इतर दोन सेंसर्स मिळू शकतात. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ काॅलिंगसाठी या फोन मध्ये 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा असल्याचे लीक मध्ये समोर आले आहे. फोनच्या ठोस स्पेसिफिकेशन्ससाठी लाॅन्चची वाट बघितली जात आहे.

Samsung Galaxy Tab M62

91मोबाईल्सने काही दिवसांपूर्वीच एक्सक्लूसिव बातमी देत सांगितले होते कि सॅमसंग गॅलेक्सी टॅब एम62 चे प्रोडक्शन पण भारतात सुरु झाले आहे. या टॅबलेट डिवायसची निर्मिती नोयडा मधील सॅमसंग फॅक्ट्री मध्ये होत आहे आणि येत्या काही दिवसांत Galaxy Tab M62 चा स्टॉक बनून तयार होईल. आशा आहे कि आता काही दिवसांमध्ये सॅमसंग आपला हा आगामी डिवायस सादर करून याच्या लॉन्च डेटची घोषणा करेल.

Samsung Galaxy Tab S7

सॅमसंगने आतापर्यंत आपल्या ‘गॅलेक्सी एम’ सीरीज मध्ये फक्त स्मार्टफोन्सच लॉन्च केले आहेत पण पहिल्यांदा कंपनी या सीरीज मध्ये टॅबलेट डिवायस जोडणार आहे. या सीरीज मध्ये लो बजेट पासून मिडरेंज सेग्मेंट पर्यंतच्या मोबाईलचा समावेश आहे, त्यामुळे आशा आहे कि गॅलेक्सी टॅब एम62 पण मिडबजेट मधेच लॉन्च केला जाईल. सध्या या टॅबलेटच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती मिळाली नाही.

Samsung Galaxy A22

सॅमसंग गॅलेक्सी ए22 या लिस्ट मधील सर्वात नवीन फोन आहे. या डिवायस बद्दल बोलले जात आहे कि Samsung Galaxy A22 कंपनीचा सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन असेल. हा फोन सॅमसंग गॅलेक्सी ए21 चा नेक्स्ट वर्जन असल्याचे बोलले जात आहे. या फोनचे स्पेसिफिकेशन्स तर समोर आले नाहीत पण लीक मध्ये फोनची किंमत शेयर केली गेली आहे.

Samsung Galaxy A21s

Samsung Galaxy A22 5G बद्दल सांगण्यात आले आहे कि हा स्मार्टफोन साल 2021 च्या तिसऱ्या तिमाहीत बाजारात एंट्री करेल. म्हणजे या फोनच्या लॉन्चसाठी खूप वाट बघावी लागणार आहे. लीकनुसार सॅमसंग गॅलेक्सी ए22 5जी ची किंमत KRW 200,000 असेल. हि किंमत भारतीय करंसीनुसार 13,500 रुपयांच्या आसपास आहे. तुम्हाला पण या बजेट मध्ये 5G फोनचा विचार करणे अशक्य वाटत असेल. पण येणाऱ्या काळात टेक मार्केट मध्ये अश्याच अश्यक्यप्राय बदल दिसतील.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here