Samsung नं गॅलेक्सी ‘एम’ सीरीजच्या दोन स्मार्टफोन्सच्या किंमती केल्या कमी

सॅमसंग कंपनी भारतातील जुना आणि विश्वासू मोबाइल ब्रँड आहे. अनेक मोबाइल युजर्स नवीन स्मार्टफोन खरेदी करताना चीनी ब्रँडच्या तुलनेत सॅमसंगवर जास्त विश्वास दाखवतात. आपल्या अशाच चाहत्यांना भेट देत सॅमसंग इंडियानं गॅलेक्सी ‘एम’ सीरीजच्या दोन स्मार्टफोन्सवर डिस्कांउट ऑफर सादर केली आहे. Samsung Galaxy M32 आणि Samsung Galaxy M52 5G स्मार्टफोन डिस्काउंटसह विकले जात आहेत तसेच हे Samsung Smartphone 5 हजार रुपयांनी स्वस्तात विकत घेता येतील.

Samsung Galaxy M52 5G Offer

सॅमसंग इंडियानं आपल्या मिडबजेट 5जी मोबाइल फोन गॅलेक्सी एम52 वर 5,000 रुपयांचा डिस्काउंट घोषित केला आहे. सॅमसंग ऑफर अंतगर्त Samsung Galaxy M52 5G स्मार्टफोन 5,000 रुपयांनी स्वस्तात विकत घेता येईल. ही सूट फोनच्या सर्व व्हेरिएंट्सवर लागू असेल ज्यात 6GB RAM + 128 GB Storage तसेच 8GB RAM + 128 GB Storage चा समावेश असेल. स्कीम अंतगर्त हे दोन्ही व्हेरिएंट्स आपल्या ऑरिजनल प्राइसपेक्षा 5 हजार रुपयांनी स्वस्तात विकत घेता येतील. हे देखील वाचा: तब्बल 512GB मेमरीसह येतोय iQOO Neo 7 SE; Xiaomi आणि OnePlus च्या अडचणी वाढणार

Samsung Galaxy M52 5G 6 जीबी रॅम व्हेरिएंटची किंमत 26,999 रुपये आहे परंतु ऑफर अंतगर्त हा 21,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तर 28,999 रुपयांचा गॅलेक्सी ए52 5जी 8 जीबी रॅम व्हेरिएंट 23,999 रुपयांमध्ये सेलसाठी उपलब्ध झाला आहे. परंतु ही Samsung Offer कंपनीनं 5 दिवसांसाठी लागू केली आहे जी 24 नोव्हेंबरपर्यंत चालेल.

Samsung Galaxy M32 Offer

सॅमसंग गॅलेक्सी एम32 स्मार्टफोनच्या खरेदीवर कंपनी 2,500 रुपयांची सूट देत आहे. या मोबाइल फोनचा 4GB RAM + 64 GB Storage व्हेरिएंट 10,999 रुपयांच्या ऐवजी 8,499 रुपयांमध्ये सेलसाठी उपलब्ध होत आहे तसेच 12,999 रुपयांचा 6GB RAM + 128 GB Storage व्हेरिएंट ऑफर अंतगर्त 10,499 रुपयांमध्ये विकत घेता येईल. ही सॅमसंग स्कीम देखील 24 नोव्हेंबर पर्यंत वैध असेल.

Samsung Galaxy M52 5G Specification

फोनमध्ये 6.7 इंचाचा फुल-एचडी+ एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. ज्यात 120Hz रिफ्रेश रेट, 1080 x 2400 पिक्सल रिजॉल्यूशन आणि डिस्प्लेच्या सुरक्षेसाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 प्रोटेक्शन मिळतं. प्रोसेसर बद्दल बोलायचं तर, यात Qualcomm SDM 778G Octa Core 2.4GHz चिपसेटचा वापर केला गेला आहे. Galaxy M52 5G स्मार्टफोन अँड्रॉइड 11 आधारित OneUI वर चालतो. जोडीला 8GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. हे देखील वाचा: सॅमसंगचा नवा budget 5G Smartphone! सिम कार्ड न टाकताच मिळणार रेंज, स्वस्तात वॉटरप्रूफ फोन

सॅमसंग गॅलेक्सी एम52 5जी डिवाइसमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. ज्यात 64MP ची प्रायमरी कॅमेरा लेन्स, 12MP ची अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 5MP ची मॅक्रो लेन्स देण्यात आली आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 32MP ची फ्रंट कॅमेरा लेन्स मिळतो. बॅटरीच्या बाबतीत फोन 5,000mAh च्या बॅटरीसह येतो, जी 25W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here