SID 2021 मध्ये सॅमसंग आणि LG चे असेल हवा, Samsung मल्टी फोल्ड डिस्प्ले पॅनल S-Foldable येईल समोर

Samsung S Foldable

जगात डिस्प्ले पॅनल बनवण्याच्या बाबतीत दोन मोठ्या कंपन्या Samsung Display आणि LG Display आहेत. दोन्ही कंपन्यांनी घोषणा केली आहे कि त्या Society for Information Display (SID) 2021 मध्ये आपले लेटेस्ट इनोवेशन जगासमोर ठेवतील. SID जगातील सर्वात मोठे डिस्प्ले एक्सबिशन (प्रदर्शन) आहे, जे पुढल्या आठवड्यापासून ऑनलाइन आयोजित होणार आहे. या प्रदर्शनात कंपन्या जे इनोवेटिव डिस्प्ले पॅनल दाखवतील त्या भविष्यात त्यांच्या नेक्स्ट जेरेरेशन फोल्डेबल स्मार्टफोनमध्ये दिसतील. कंपन्यां सांगत आहेत कि त्या S-Foldable म्हणजे मल्टी-फोल्ड डिस्प्ले पॅलन जगासमोर ठेवणार आहेत. (Samsung to unveil multi fold display panels foldable at SID 2021 next week)

Samsung Display जे फोल्डेबल डिस्प्ले कॅटेगरीमध्ये बाजाराचे नेतृत्व करतात. यावेळी 7.2 इंचाचा डिस्प्ले पॅनल दाखवतील जो मल्टी फोल्ड पॅनलला सपोर्ट करेल. हा डिवाइस दुमडल्यावर स्मार्टफोन प्रमाणे वापरता येईल आणि अनफोल्ड झाल्यावर हा टॅबलेटप्रमाणे वापरता येईल. या डिस्प्लेला सध्या “S-Foldable” बोलले जात आहे, जो कंपनी आपल्या आगामी फ्लॅगशिप स्मार्टफोनमध्ये वापरू शकते. कंपनीने या डिस्प्लेसाठी सॅमसंगने यूरोपियन यूनियन इंटेलेक्चुल प्रॉपर्टी ऑफिस (EUIPO) आणि कोरियन इंटलेक्चुअल प्रॉपर्टी ऑफिस (KIPO) मध्ये गेल्या महिन्यात ट्रेडमार्क फाइल केले आहे.

हे देखील वाचा : सुरु झाली 6G ची तयारी, जग बदलून टाकेल या टेक्नॉलॉजीची ताकद

तसेच साउथ कोरियन कंपनी सॅमसंग या प्रदर्शनात 17 इंचाचा फोल्डेबल पॅनल ज्याचा आस्पॅक्ट रेश्यो 4:3 आहे पण दाखवू शकते. हा डिस्प्ले “Carry Small, See Big” कॉन्सेप्टसह सादर केला गेला आहे, जो टॅबलेट प्रमाणे वापरता येईल पण अनफोल्ड केल्यावर हा कंप्यूटरसारखा होतो.

हे देखील वाचा : Sony लवकरच लॉन्च करेल स्वस्त Xperia Ace II स्मार्टफोन, जाणून घ्या वैशिष्ट्ये

दुसरीकडे, LG Display या प्रदर्शनात 83-इंचाचा OLED TV डिस्प्ले पॅनल सादर करेल जो लूमिनस इफिसीएंसी ईन्हान्ससह येईल. त्याचबरोबर कंपनी 48 इंचाचा बॅंडेबल सिनेमेटिक साउंड OLED डिस्प्ले पण दाखवेल ज्यात स्पीकर न वापरता वाइब्रेशन आणि आवाज निर्माण होईल. सोबतच LG या प्रदर्शनात रोलेबल आणि ट्रांसपेरेंट डिस्प्ले पॅनल पण दाखवेल, त्यासोबत कंपनी ऑटोमोटिव प्लास्टिक OLED डिस्प्ले दाखवेल. असा अंदाज लावला जात आहे कि कंपनी Samsung या दरम्यान अंडर पॅनल कॅमेरा टेक्नोलॉजी पण दाखवू शकते.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here