सुरु झाली 6G ची तयारी, जग बदलून टाकेल या टेक्नॉलॉजीची ताकद

6G

5Gसाठी हे वर्ष खूप चांगले जाणार आहे. मार्केटमध्ये 5जी नेटवर्कला सपोर्ट करणाऱ्या स्मार्टफोन्सचा खच पडला आहे जे प्रत्येक बजेटमध्ये उपलब्ध होत आहेत. भारतात पण 5जी ट्रायल्सला मंजूरी मिळाली आहे आणि टेलीकॉम कंपन्या काही टेक ब्रँड्ससह मिळून येत्या काही आठवड्यांमध्ये देशात यशस्वी 5जी परीक्षण पण करतील. पण तुम्हाला माहित आहे का भारतात 5Gच्या स्वागतासाठी तयार होत असताना जगातील अनेक देश 5जी वापरल्यानंतर आता 6Gकडे पण वळले आहेत. 6G इतका जास्त शक्तिशाली असल्याचे बोलले जात आहे कि हि टेक्नॉलॉजी मिळवण्यासाठी जगातील शक्तिशाली राष्ट्रांमध्ये चढाओढ सुरु झाली आहे जणू हि इंटरनेट टेक्नॉलॉजी नसून नवीन हत्यार आहे. (6g technology coming soon)

6G ची तयारी

5G भारतात आपला मार्ग शोधत असली तरी जगातील अनेक देशांमध्ये या टेक्नॉलॉजीने आपला जम बसवला आहे. चीन, जापान, कोरिया, अमेरिका व आस्ट्रेलियासमवेत अनेक यूरोपियन देशांमध्ये लोक 5जी वापरात आहेत. 21व्या शतकाचे दुसरे दशक 5जीच्या नावावर गेले तर तिसरे दशक 6G डेवलेपमेंटसाठी ओळखले जाईल. अनेक देशांनी 6जी निर्मितीच्या दिशेने काम सुरु केले आहे ज्यात जापान, चीन, साउथ कोरिया, अमेरिका व फिनलँड सारख्या देशांची नावे समोर येत आहेत. रिसर्च अँड डेवलेमेंट सेंटरवरून नवीन इक्विप्मेंट तसेच इंजीनियर्सवर या देशांनी गुंतवणूक करण्यास सुरुवात केली आहे.

6G

विशेष म्हणजे हे सर्व राष्ट्र दुसऱ्या देशांच्या आधी आपल्याकडे 6G टेक्नॉलॉजी आणू पाहत आहेत. या देशांमध्ये सर्वप्रथम 6G मिळवण्यासाठी चढाओढ सुरु झाली आहे आणि यासाठी फक्त जमिनीवर नव्हे तर अवकाशात पण काम सुरु केले गेले आहे. रिपोर्ट्सनुसार, काही देशांनी 6G कनेक्टिविटीसाठी आपल्या उपग्रहांमध्ये तांत्रिक बदल केले आहेत आणि आवश्यकता भासल्यास नवीन सॅटेलाईट पण अवकाशात सोडले जाऊ शकतात. 6जी च्या ताकदीचा अंदाज यावरून लावला जाऊ शकतो कि जगातील सर्वात शक्तीशाली देशांना हि टेक्नॉलॉजी सर्वात आधी हवी आहे.

हे ब्रँड्स घेऊन येतील 6G

मागे अशी बातमी आली होती कि दिग्गज अमेरिकन कंपनी Apple ने जॉब लिस्टिंग पोस्ट केली आहे ज्यात कंपनीने ‘नेक्स्ट जेनरेशन रेडियो’ वर काम करण्यासाठी इंजीनियर्सची भरती सुरु केली आहे. नेक्स्ट जेनरेशन रेडियो 6G असल्याचे बोलले जात आहे. तत्पूर्वी साउथ कोरियन कंपनी Samsung ने पण आपल्या देशात 6जीवर काम करण्यासाठी आर अँड डी सेंटरची सुरुवात केली होती. दुसरी कोरियन कंपनी LG पण 6जीच्या क्षेत्रात खूप सक्रिय दिसत आहे. चीनी कंपनी Huaweiला जरी माजी ट्रंप सरकारमुळे अडचणी आल्या असल्यातरी हुआवई कंपनी 6जी टेक्नोलॉजीमध्ये खूप यशस्वी झाल्याचे सिद्ध झाले आहे.

हे देखील वाचा : Amazon Review Scam: सांभाळून करा ऑनलाइन शॉपिंग, सहज विकले जात आहेत दर्जाहीन प्रोडक्ट

6G

6G ची ताकद काय असेल

6G मध्ये इंटरनेटचा स्पीड खूप जास्त असेल आणि मोठमोठे व्हिडीओज पापणी लवताच डाउनलोड होतील. हे असेलच पण 6जी फक्त जलद इंटरनेट नव्हे तर त्याहून जास्त व्यापक टेक्नॉलॉजी घेऊन येईल. 6G फक्त मोबाईल फोन्स नव्हे तर रोजचे जीवन प्रगत आणि वेगवान करेल. 6जी मध्ये virtual reality (VR) आणि augmented reality (AR) चे नवीन रूप दिसेल जे रोजच्या आयुष्याचा भाग होतील.

कम्यूनिकेशन सोबतच इंटेलिजेंस आणि IOT म्हणजे इंटरनेट ऑफ थिंग्सच्या क्षेत्रात मोठी क्रांती घेऊन येईल 6जी. असे पण बोलले जात आहे कि 6G आल्यानंतर रोबोट्सचा वापर पण वाढू शकतो. ज्याप्रमाणे आता स्मार्टफोन आणि स्मार्ट टीव्ही व्यतिरिक्त स्मार्ट होम अप्लायंस जसे कि फ्रिज, लाईट, फॅन्स, सीसीटीव्ही, स्पीकर इत्यादी घरात आढळतात, त्याप्रमाणे 6G टेक्नॉलॉजी रोबोट्सचा वापर पण सामान्य होईल.

या क्षेत्रात काम करणाऱ्या तज्ज्ञांच्या मते, साल 2030 पर्यंत 6G टेक्नॉलॉजी संपूर्ण जगावर राज्य करेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here