Sony लवकरच लॉन्च करेल स्वस्त Xperia Ace II स्मार्टफोन, जाणून घ्या वैशिष्ट्ये

Sony Xperia Ace

Sony लवकरच नवीन स्मार्टफोन Sony Xperia Ace II लॉन्च करण्याची तयारी करत आहे. सोनीच्या या स्मार्टफोनचे रेंडर गेल्या आठवड्यात ऑनलाइन लीक झाले होते. आता Sony चा अपकमिंग स्मार्टफोन Sony Xperia Ace II Google Play Console च्या लिस्टिंगमध्ये स्पॉट केला गेला आहे. गुगल कंसोलच्या लिस्टिंगमध्ये सोनीचा स्मार्टफोन स्पॉट केल्यानंतर अंदाज लावला जात आहे कि हा स्मार्टफोन लवकरच लॉन्च होऊ शकतो. Google Play Console च्या लिस्टिंगनुसार Sony Xperia Ace II स्मार्टफोन एंट्री लेवलचा असेल. सोनीचा हा स्मार्टफोन मीडियाटेकच्या Helio P35 चिपसेटसह 4 GB RAMसह लॉन्च केला जाईल. सोनीचा हा स्मार्टफोन Android 11 OS वर चालेल. (Sony Xperia Ace II smartphone Google Play Console listing check specifications)

Sony Xperia Ace II Google Play Console

गुगल प्ले कंसोलवर लिस्ट झालेल्या Sony Xperia Ace II स्मार्टफोनच्या इमेजनुसार गुगलचा हा स्मार्टफोन वाटरड्रॉप नॉचसह सादर केला जाईल. या स्मार्टफोनच्या डिस्प्लेबाबत जास्त माहिती उपलब्ध झाली नाही परंतु बोलले जात आहे कि या फोनचे रिजोल्यूशन 720 x 1496 पिक्सल HD+ आहे. Google सपोर्टेड डिवाइसेसच्या यादीत सोनीचा हा स्मार्टफोन Sony Xperia Ace II मॉडेल नंबर SO-41B सह सादर केला गेला आहे.

हे देखील वाचा : Amazon Review Scam: सांभाळून करा ऑनलाइन शॉपिंग, सहज विकले जात आहेत दर्जाहीन प्रोडक्ट

यावर्षीच्या सुरुवातीला रिलाइएबल टिपस्टर OnLeaks ने अपकमिंग Sony Xperia Ace II स्मार्टफोनचे CAD रेंडर शेयर केले आहेत. सोनीचा हा स्मार्टफोन कॉम्पॅक्ट साइजचा असेल. सोनीच्या या स्मार्टफोनमध्ये 5.5 इंचाचा डिस्प्ले दिला जाऊ शकतो. त्याचबोरोबर फोनच्या मागच्या पॅनलमध्ये वर्टिकल डुअल कॅमेरा सेटअप आणि LED फ्लॅश दिला जाऊ शकतो. त्याचबरोबर सोनीच्या या स्मार्टफोनमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर, डेडिकेटेड कॅमेरा बटण आणि 3.5mm चा ऑडियो जॅक देण्यात आला आहे.

हे देखील वाचा : सुरु झाली 6G ची तयारी, जग बदलून टाकेल या टेक्नॉलॉजीची ताकद

Sony Xperia Ace II स्मार्टफोनबद्दल अंदाज लावला जात आहे कि हा फोन एक्सक्लूसिवली जापानमध्ये उपलब्ध होईल. सोनीचा हा स्मार्टफोन साल 2019 मध्ये लॉन्च केल्या गेलेल्या Xperia Ace ची जागा घेईल. जापानची टेलीकॉम कंपनी DoCoMo 19 मेला आपल्या लॉन्च इवेंटमध्ये नवीन स्मार्टफोन लॉन्च करेल. बोलले जात आहे कि कंपनी यादिवशी Sony Xperia Ace II स्मार्टफोनसह Snapdragon 888 प्रोसेसर असलेला Sharp AQUOS R6 फ्लॅगशिप स्मार्टफोन लॉन्च करू शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here