Pathaan Trailer Released: चार वर्षानंतर शाहरुख प्रमुख भूमिकेत; ‘पठाण’ चा ट्रेलर रिलीज

Shah Rukh Khan चा बहुचर्चित आणि बहुप्रक्षित चित्रपट Pathaan चा ऑफिशियल ट्रेलर आज रिलीज करण्यात आला आहे. Yash Raj Films प्रोडक्शन अंतर्गत बनेलला हा चित्रपट 25 जानेवारीला देशात मोठ्या पडद्यावर रिलीज केला जाईल. विशेष म्हणजे हा चित्रपट रिलीज होणयापूर्वीच चित्रपटाचे डिजिटल स्ट्रीमिंग राइट्स 100 कोटींना विकले गेले आहेत. लोकप्रिय ओटीटी प्लॅटफॉर्म Amazon Prime Video नं हे अधिकार खरेदी केले आहेत, त्यामुळे हा चित्रपट थिएटरमध्ये आल्यानंतर एक किंवा दोन महिन्यांनी प्राइम व्हिडीओवर ऑनलाइन रिलीज केली जाईल.

इथे पाहा पठाणचा ट्रेलर

Pathaan official trailer रिलीज होताच काही तासांतच युट्युबवर या ट्रेलरला साडे तीन लाखांपेक्षा जास्त व्यूज मिळाल्या आहेत. या चित्रपटात बॉलिवुडचा बादशाह Shah Rukh Khan आणि Deepika Padukone सह John Abraham महत्वाच्या भूमिकेत दिसले. जॉननं यात व्हिलनची भूमिका साकारल्याचं ट्रेलरवरून समजते.

या ओटीटीवर रिलीज होईल Pathaan

‘पठाण’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज होण्याआधीपासूनच शाहरुखचे चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. पठाण हिंदी व्यतिरिक्त तेलुगु आणि तामिळमध्ये देखील रिलीज केला जाईल. चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद यांनी केलं आहे आणि चित्रपटाची निर्मिती आदित्य चोपडा यांनी केली आहे.

याआधी बातमी आली होती की हा चित्रपट थिएटर रिलीज नंतर काही महिन्यांनी Amazon Prime Video ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज केला जाईल. अ‍ॅमेझॉननं कोट्यवधी रुपयांमध्ये या चित्रपटाचे डिजिटल अधिकार खरेदी केल्याची बातमी आली आहे, परंतु निर्मात्यांकडून किंवा प्राइम व्हिडीओकडून याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे थिएटरमधील प्रेक्षकांचा प्रतिसाद पहिल्यांनंतर कदाचित ओटीटी रिलीजची अधिकृत घोषणा केली जाईल, असा अंदाज लावला जात आहे.

वादग्रस्त चित्रपट

4 वर्षानंतर मोठ्या पडद्यावर किंग खान प्रमुख भूमिकेत दिसणार आहे, काही महिन्यांपूर्वी शाहरुख रॉकेटरी चित्रपटात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसला होता. इतक्या वर्षांनंतर पुनरागमन करत असलेल्या किंग खानचा चित्रपट पठाणमधील गाणं ‘बेशर्म रंग’ वादाच्या भोवऱ्यात अडकलं होतं. या गाण्यातील दीपिका पादुकोणच्या भगव्या रंगाच्या बिकिनीबद्दल खूप मोठा वादंग निर्माण झाला होता.

सोशल मीडियावर अशी प्रतिक्रिया

सोशल मीडियावर पठाण चित्रपटाच्या ट्रेलरला संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. काही युजर्स चित्रपटाच्या ट्रेलरचं कौतुक करत आहेत. तर, काही युजर्स डायलॉग्सवर ट्रोल करण्याचा प्रयत्न करत आहेत. वाचा लोकांच्या रिअ‍ॅक्शन…

ट्रेलर रिलीज झाल्यानंतर सोशल मीडियावर विविध चर्चाना उधाण आलं आहे. कदाचित तुम्हाला माहित नसेल की हा चित्रपट यशराज बॅनरच्या स्पाय स्पाई यूनिवर्सचा भाग आहे. तुम्ही पठाण चित्रपट पाहणार आहात का?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here