Sony Xperia 8 Lite लॉन्च, बघा या स्टाईलिश फोनचे स्पेसिफिकेशन्स आणि किंमत

Sony कंपनीने फेब्रुवारी मध्ये अंर्तराष्ट्रीय बाजारात दोन नवीन फोन लॉन्च केले होते जे Sony Xperia 1 II आणि Sony Xperia 10 II नावाने आले होते. हे दोन्ही डिवायस सोनीचे पहिले 5G स्मार्टफोन होते ज्यात Xperia 1 II हाईएंड स्पेसिफिकेशन्स असलेला एक फ्लॅगशिप फोन होता तर Xperia 10 II मिडबजेट सेग्मेंट मध्ये आला होता. आज सोनीने आपला प्रोडक्ट पोर्टफोलियो वाढवत अजून एक नवीन मिड रेंड स्मार्टफोन Sony Xperia 8 Lite टेक मंचावर सादर केला आहे.

Sony Xperia 8 Lite

सोनी एक्सपीरिया 8 लाइटचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन 20:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला गेला आहे जो 6 इंचाच्या एफएचडी+ Triluminous LCD डिस्प्लेला सपोर्ट करतो. या फोन मध्ये कोणतीही नॉच नाही. फ्रंट पॅनल वर दोन्ही बाजूंना आणि खालच्या बाजूला नॅरो बेजल्स आहेत तर वरच्या बाजूला रुंद बॉडी पार्ट देण्यात आला आहे जिथे सेल्फी कॅमेरा व इतर सेंसर तसेच स्पीकर आहे.

Sony Xperia 8 Lite कंपनीने जुन्या एंडरॉयड 9 पाई वर लॉन्च केला आहे जो आक्टाकोर प्रोसेसर सह क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 630 चिपसेट वर चालतो. सोनीने आपला फोन फक्त एकाच वेरिएंट मध्ये लॉन्च केला आहे जो 4 जीबी रॅम सह 64 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. फोन मेमरी माइक्रोएसडी कार्डने 512 जीबी पर्यंत वाढवता येते.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता सोनी एक्सपीरिया 8 लाईट डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो जो बॅक पॅनलच्या मधोमध हॉरिजॉन्टल शेप मध्ये आहे. या कॅमेरा सेटअप मध्ये एफ/1.8 अपर्चर असलेला 12 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर आणि एफ/2.4 अपर्चर असलेला 8 मेगापिक्सलचा सेकेंडरी सेंसर देण्यात आला आहे. तसेच सेल्फी व वीडियो कॉलिंगसाठी हा नवीन सोनी फोन एफ/2.0 अपर्चर असलेल्या 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

Sony Xperia 8 Lite च्या उजव्या पॅनल वर वॉल्यूम रॉकर आणि फिंगरप्रिंट सेंसर इम्बडेड पावर बटन देण्यात आला आहे तसेच डाव्या पॅनल वर सिम स्लॉट आहे. तर वरच्या बाजूला 3.5एमएम जॅक आणि खालच्या बाजूला यूएसबी टाईप-सी पोर्ट आहे. सोनीने आपला फोन IPX5/IPX8 सर्टिफाइड करून लॉन्च केला आहे ज्यामुळे हा वॉटरप्रूफ बनतो. तसेच पावर बॅकअपसाठी या फोन मध्ये 2,870एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

सोनी एक्सपीरिया 8 लाईट सध्या जपानच्या मार्केट मध्ये लॉन्च केला गेला आहे जिथे फोनची किंमत 29,800 येन म्हणजे जवळपास 20,800 रुपये आहे. Sony Xperia 8 Lite ब्लॅक आणि व्हाईट कलर मध्ये सादर केला गेला आहे जो येत्या काही दिवसांत जगभरात येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here