iPhone 14 च्या लाँचच्या आधी Apple ला धक्का बसला आहे. ब्राजील सरकारनं देशात Apple iPhone च्या विक्रीवर बंदी घातली आहे. The Verge च्या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे की ब्राजील सरकारनं iPhone च्या बॉक्समध्ये चार्जर नसल्यामुळे देशात याच्या विक्रीवर बंदी घातली आहे. सरकारनुसार अॅप्पलचा हा प्रोडक्ट ग्राहकांसाठी अपूर्ण आहे. याच कारणामुळे सरकारनं ब्राजीलमध्ये याच्या विक्रीवर बंदी घातली आहे.
ब्राजील सरकारचा Apple ला धक्का
ब्राजीलच्या न्याय मंत्र्यालयानं Apple ला 12.275 मिलियन रियास (सुमारे 2.38 मिलियन डॉलर) चा दंड देखील ठोठावला आहे. तसेच देशात iPhone 12 सह कंपनीनं नवीन मॉडेलच्या विक्रीवर बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत. मंत्रालयनं जारी केलेल्या आदेशात सांगण्यात आलं आहे की देशात अशा iPhone मॉडेलच्या विक्रीवर बंदी घातली जात आहे, ज्याच्यासोबत पावर चार्जर दिला जात नाही. सरकारी आदेशात मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे की मुद्दामहून ग्राहकांना त्रास दिला जात आहे. हा प्रोडक्ट चार्जरविना अपूर्ण आहे. हे देखील वाचा: Apple iPhone 14 येण्याआधी iPhone 13 आणि iPhone 12 वर मोठा डिस्काउंट, संधी गमावू नका
Apple च्या युक्तिवाद फेटाळला
ब्राजीलच्या न्याय मंत्रालयानं अॅप्पलचे सर्व युक्तिवाद फेटाळले. कंपनीनं म्हटलं होतं की फोनसोबत चार्जर न देण्यामागे कंपनीचा उद्देश्य कार्बन उत्सर्जन कमी करणे आहे. यावर मंत्रालयानं म्हटलं की कोणत्याही स्मार्टफोन सोबत चार्जर न देता त्याची विक्री केल्यास पर्यावरण संरक्षण होत आहे हे सिद्ध करणारे कोणतेही ठोस पुरावे कंपनीनं दिले नाहीत. iPhone 14 च्या लाँचपूर्वी ब्राजील सरकारचा हा निर्णय कंपनीसाठी एक मोठा धक्का आहे. अॅप्पलनं याबाबत कोणतंही स्पष्टीकरण दिलं नाही. हे देखील वाचा: जुन्या आयफोन्सपेक्षा स्वस्तात लाँच होणार का iPhone 14; जाणून घ्या किंमत, फीचर्स आणि मॉडेल्सची सविस्तर माहिती
युरोपियन युनियनचा निर्णय देखील वाढवणार डोकेदुखी
येत्या काळात सर्वच मोबाईल फोन, टॅबलेट आणि हेडफोन सोबत USB-C चार्जर दिला जाऊ शकतो. अगदी अॅप्पलचे आयफोन देखील टाईप सी पोर्टसह बाजारात येऊ शकतात. यामागचे कारण म्हणजे युरोपियन कमिशननं मोबाईल फोन, टॅबलेट आणि हेडफोन्ससाठी एकच स्टँडर्ड चार्जर देणे बंधनकारक करण्याचा कायदा केला आहे. 2024 पर्यंत युरोपियन युनियनमध्ये विकल्या जाणाऱ्या सर्व मोबाईल फोनमध्ये USB-C चार्जिंग पोर्ट दिसेल. विशेष म्हणजे अँड्रॉइड स्मार्टफोन्स सध्या USB-C पोर्टचा वापर करत आहेत फक्त टेक दिग्गज Apple आपल्या iPhones मध्ये लायटनींग केबलचा वापर करत आहे.
iPhone 14 सीरीज लाँच
Apple च्या लेटेस्ट iPhone 14 सीरीजचे मॉडेल आज 7 सप्टेंबरला लाँच होणार आहेत. यासाठी कंपनीनं एका मोठ्या इव्हेंटचे आयोजन केलं आहे. यंदा आयफोनच्या डिजाईनमध्ये मोठा बदल दिसेल असं सांगण्यात आलं आहे. आयकॉनिक नॉचच्या ऐवजी कंपनी अँड्रॉइड स्मार्टफोन्समधील पंचहोल डिस्प्लेचा वापर करू शकते. iPhone 14 सीरीज अंतगर्त कंपनी चार मॉडेल iPhone 14, iPhone 14 Max, iPhone 14 Pro, iPhone 14 Pro Max लाँच करू शकते. मीडिया रिपोर्ट्सनुसार यावर्षी iPhone Mini लाँच केला जाणार नाही, कारण गेल्यावर्षीच्या मिनी मॉडेलला जास्त चांगला प्रतिसाद मिळालेला नाही.