Amazon Review Scam: सांभाळून करा ऑनलाइन शॉपिंग, सहज विकले जात आहेत दर्जाहीन प्रोडक्ट

Amazon Fake review

ऑनलाइन खरेदीचा ट्रेंड गेल्या वर्षांमध्ये खूप वाढला आहे. आज आपण घर बसल्या ऑनलाइन घरच्या किराणा सामनापासून आपल्या कपड्यांपर्यंत सर्वकाही मागवू शकता. खूप वेगाने वाढत असलेल्या या ई-कॉमर्स साइटच्या दिग्गज कंपनीबद्दल एक बातमी समोर आली आहे, ती ऐकून तुम्ही पण हैराण व्हाल. एका रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे कि अमेझॉन सारख्या ई-कॉमर्स साइटवर खोट्या रिव्यूच्या माध्यमातून दर्जाहीन वस्तूला नंबर-1 बनवण्याचे काम सुरु आहे. ऑनलाइन शॉपिंगमध्ये कोणत्याही प्रोडक्टच्या क्वालिटीबाबत जाणून घेण्यासाठी लोक त्या प्रोडक्टचे रिव्यू बघतात, पण आता हि बातमी समोर आल्यानंतर भीती वाटू लागली आहे कि जे सामान आपण ऑनलाइन मागवत आहोत त्याची गुणवत्ता कशी आहे. इतकेच नव्हे तर अमेझॉनच्या एका फेक रिव्यू स्कॅमबद्दल बोलले जात आहे कि आतापर्यंत या स्कॅमला दोन लाखांपेक्षा जास्त लोक बळी पडले आहेत.

अमेझॉन रिव्यू स्कॅम

सिक्योरिटी रिसर्चर सेफ्टी डिटेक्टिव्सने या स्कॅमचा खुलासा करून माहिती चीन-बेस्ड सर्वरवरून दिली आहे. या स्कॅममुळे Amazon च्या रिव्यू सेक्शनवर परिणाम झाला आहे. रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे कि या स्कॅमचा परिणाम आतापर्यंत 200,000 युजर्सवर झाला आहे.

हे देखील वाचा : 15,000 रुपयांच्या बजेटमध्ये 5 Redmi Smartphone जे आहेत खूप दमदार

Online Shop

अमेझॉन फेक रिव्यू स्कॅम म्हणजे काय

या स्कॅमअंतगर्त, कोणत्याही प्रोडक्टची विजिबिलिटी वाढवण्यासाठी फेक रिव्यू आणि स्टार दिले जातात. असे केल्याने युजर्सचे लक्ष त्या प्रोडक्टवर जाते आणि त्यांची विक्री वाढते. इतकेच नव्हे तर या फेक रिव्यूमुळे प्रोडक्टची रेटिंग वाढते आणि प्रोडक्ट टॉप सजेशनमध्ये येऊ लागतो.

कोण देतो अमेझॉनवर रिव्यू

यासाठी Amazon वेंडर रिव्यूवर्सना प्रोडक्टची एक यादी पाठवतात. त्यानंतर रिव्यूअर्स या प्रोडक्टना 5 रेटिंग देतात. असे केल्याने हे प्रोडक्ट्स सजेशन लिस्टमध्ये टॉपवर येतात.

या स्कॅममध्ये पासवर्ड प्रोटेक्शनविना 1.3 कोटी रेकॉर्ड्स मिळाले आहेत ज्यात अमेझॉन रिव्यू स्कॅमचा भाग असलेल्या वेंडर्सचा ईमेलपासून व्हाट्सअ‍ॅप आणि टेलीग्राम नंबरचा पण समावेश आहे. तसेच पेपाल अकाउंट डीटेल्स आणि युजर नेमसह जवळपास 75,000 अमेझॉन अकाउंट्सची लिंक पण मिळाल्या आहेत.

हे देखील वाचा : OnePlus ने केली की नवीन 5G फोन आणण्याची तयारी, मिड रेंज बजेटमध्ये लॉन्च होईल वनप्लस Nord CE

अमेझॉनवर कशाप्रकारे ओळखावे फेक रिव्यू

अमेझॉनसह कोणत्याही ई-कॉमर्स साइटवर खरे आणि खोटे प्रोडक्ट रिव्यू ओळखणे सोप्पे नाही, कारण हे रिव्यूअर दोन्ही प्रकारचे प्रोडक्ट रिव्यू देतात. फिल्टर वापरून तुम्ही प्रमाणात नकली रिव्यूपासून वाचू शकता, पण पूर्णपणे यापासून वाचण्याचा कोणताही उपाय नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here