Apple iPhone 13 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 06 Jul 2023 08:28:08 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 iPhone 13 Pro आणि iPhone 13 Pro Max मध्ये दिला जाऊ शकतो 120Hz रिफ्रेश रेट डिस्प्ले https://www.91mobiles.com/marathi/apple-iphone-13-pro-and-iphone-13-pro-max-may-be-comes-with-120hz-refresh-rate-display/ https://www.91mobiles.com/marathi/apple-iphone-13-pro-and-iphone-13-pro-max-may-be-comes-with-120hz-refresh-rate-display/#respond Tue, 04 May 2021 14:31:38 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=10818 अ‍ॅप्पल iPhone 13 Pro आणि iPhone 13 Pro Max स्मार्टफोनमध्ये नवीन LTPO AMOLED स्क्रीन मिळू शकते जिचा रिफ्रेश रेट 120 Hz आहे.

The post iPhone 13 Pro आणि iPhone 13 Pro Max मध्ये दिला जाऊ शकतो 120Hz रिफ्रेश रेट डिस्प्ले first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Apple च्या आगामी iPhone 13 सीरीजच्या लॉन्चला जरी खूप वेळ अजून बाकी असला तरी यासंबंधित लीक रिपोर्ट समोर येऊ लागले आहेत. iPhone 13 सीरीजबद्दल बातम्या येत आहेत कि अ‍ॅप्पल यात 120Hz रिफ्रेश रेट असलेला डिस्प्ले देऊ शकते. हाय रिफ्रेश रेट डिस्प्लेसाठी अ‍ॅप्पल साउथ कोरिया टेक कंपनी सॅमसंगची मदत घेऊ शकते. लीक रिपोर्ट्समध्ये दावा केला जात आहे कि अ‍ॅप्पल iPhone 13 Pro आणि iPhone 13 Pro Max स्मार्टफोनमध्ये नवीन LTPO AMOLED स्क्रीन मिळू शकते जिचा रिफ्रेश रेट 120 Hz आहे. हा डिस्प्ले एक्सक्लूसिवली सॅमसंग तयार करते. इतकेच नव्हे तर सॅमसंग अ‍ॅप्पलला Samsung Electro-Mechanics रिग्ड फ्लॅसिबल प्रिंटेट सर्किट बोर्ड्स (RFPCB) पण पुरवत आहे. (Apple iPhone 13 Pro and iPhone 13 Pro Max may be come with 120hz refresh rate display)

RFPCB चा वापर मेन बोर्डशी OLED पॅनल जोडण्यासाठी केला जातो. RFPCB सर्किट बोर्ड मजबूत (rigid) असण्यासोबतच फोल्ड करता येतात. हे सर्किट बोर्ड खूप सोयीस्कर प्रोडक्ट डिजाइनसह इलेक्ट्रॉनिक सिंग्नलचे वेगवान ट्रांसमिशन करतात. RFPCB सर्किट बोर्ड पारंपरिक सर्किट बोर्ट FPCB च्या तुलनेत महाग आहेत.

हे देखील वाचा : 5,000mAh बॅटरी असलेले टॉप 5 स्मार्टफोन, किंमत 8 हजारांपेक्षा पण कमी

Samsung Electro-Mechanics ने गेल्यावर्षी RFPCB च्या बिजनेसमधून बाहेर पडण्याचा विचार केला होता. गेल्या काही वर्षांत नफा न झाल्यामुळे सॅमसंगने हि घोषणा केली होती. कंपनीने हे सर्किट बोर्ड याआधी iPhone 12साठी पुरवले होते. iPhone 13 सीरीजसाठी RFPCB सर्किट बोर्ड बनवल्यानंतर कंपनी हा बिजनेस बंद करू शकते.

हे देखील वाचा : 5,000mAh बॅटरी असलेला स्वस्त फोन Realme C20A लॉन्चसाठी तयार, जाणून घ्या खासियत

Apple च्या iPhone साठी Samsung Display यावर्षी 110 मिलियन पॅनल पुरवू शकते. त्यानंतर LG Display साठी हा आकडा 50 मिलियन आणि BOE चा 9 मिलियन होण्याची शक्यता आहे.

2023 मध्ये येऊ शकतो फोल्डेबल iPhone

Apple अनॅलिस्ट Ming-Chi Kuo यांनी दावा केला आहे कि अ‍ॅप्पल 2023 मध्ये पहिला फोल्डेबल iPhone लॉन्च करू शकते. त्यांनी दावा केला आहे कि अ‍ॅप्पल 15 ते 20 मिलियन फोल्डेबल आयफोन मार्केटमध्ये आणू शकते. बातम्यांनुसार अ‍ॅप्पलला फोल्डेबल डिस्प्लेचा पुरवठा सॅमसंग करू शकते.

The post iPhone 13 Pro आणि iPhone 13 Pro Max मध्ये दिला जाऊ शकतो 120Hz रिफ्रेश रेट डिस्प्ले first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/apple-iphone-13-pro-and-iphone-13-pro-max-may-be-comes-with-120hz-refresh-rate-display/feed/ 0
या खास फीचरसह येऊ शकतो Apple चा पावरफुल iPhone 13 Pro, नवीन लीक मध्ये झाला खुलासा https://www.91mobiles.com/marathi/iphone-13-pro-come-with-always-on-display-120hz-refresh-rate/ https://www.91mobiles.com/marathi/iphone-13-pro-come-with-always-on-display-120hz-refresh-rate/#respond Tue, 16 Feb 2021 09:34:51 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=10043 व्हिडीओ मध्ये सांगण्यात आले आहे कि ऍप्पल आयफोन 13 च्या प्रो मॉडेल्स मध्ये LTPO टेक्नोलॉजीचा वापर केला जाईल.

The post या खास फीचरसह येऊ शकतो Apple चा पावरफुल iPhone 13 Pro, नवीन लीक मध्ये झाला खुलासा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Apple iPhone 13 सीरीज लॉन्च होण्यास अजून खूप वेळ आहे. पण, या सीरीजमध्ये सादर केल्या जाणाऱ्या फोन्स बद्दल माहिती येण्यास सुरुवात झाली आहे. आता या सीरीज मध्ये येणाऱ्या पावरफुल फोन iPhone 13 Pro बद्दल एका टिप्स्टरने नवीन माहिती दिली आहे. बातमीनुसार आयफोन 13 प्रो मॉडेल्स ऑलवेज-ऑन डिस्प्ले आणि ग्रिपसाठी रिफाइन्ड मॅट बॅक पॅनलसह सादर केला जाऊ शकतो.

EverythingApplePro आणि prolific tipster Max Weinbach ने दिलेल्या रिपोर्ट मध्ये अशी माहिती समोर आली आहे. नवीन लीकनुसार नवीन iPhone मॉडेल्स मध्ये iPad Pro प्रमाणे 120 हर्ट्ज प्रोमोशन डिस्प्ले असू शकतो. EverythingApplePro यूट्यूब चॅनेलने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे ज्यात आगामी iPhone 13 सीरीजची हि नवीन माहिती टिप्स्टर Max Weinbach च्या हवाल्याने शेयर करण्यात आली आहे.

डिजाइन बाबत व्हिडीओ मध्ये सांगण्यात आले आहे कि Apple यावर्षी कमी बदल करेल. व्हिडीओ मध्ये सर्वात मोठी खासियत सांगण्यात आली आहे ती आहे ऑलवेज-ऑन डिस्प्ले आहे. डिटेल्सनुसार, ऑलवेज-ऑन डिस्प्ले फीचर स्क्रीन वर टाइम आणि बॅटरी आयकॉन दिसेल.

हे देखील वाचा : Exclusive: 12,999 रुपयांमध्ये लॉन्च होईल Samsung चा नवीन Galaxy A12, जाणून घ्या खासियत

व्हिडीओ मध्ये सांगण्यात आले आहे कि ऍप्पल आयफोन 13 च्या प्रो मॉडेल्स मध्ये LTPO टेक्नोलॉजीचा वापर केला जाईल. अश्याप्रकारची टेक्नोलॉजी कंपनीसाठी नवीन नाही कारण कंपनीने याआधी Apple Watch हि टेक्नॉलॉजी वापरली आहे.

iPhone 13 सीरीज मध्ये असतील 4 मॉडेल

तुम्हाला सांगू इच्छितो कि काही दिवसांपूर्वी टेक अनॅलिस्ट Ming-Chi Kuo यांनी माहिती दिली होती कि यावर्षी आयफोन 13 सीरीज मध्ये iPhone 13 Mini, iPhone 13, iPhone 13 Pro आणि iPhone 13 Pro Max सारखे स्मार्टफोन्स लॉन्च होतील, ज्यांची डिजाइन्स आणि स्पेसिफिकेशन्स खास असतील.

हे देखील वाचा : 19 फेब्रुवारीला लॉन्च होईल Moto चा हा लो बजेट फोन

फोल्डेबल आयफोन

सॅमसंग, मोटोरोला आणि हुवावे प्रमाणेच ऍप्पल पण आपल्या फोल्डेबल आयफोनसाठी तयारी करत आहे. काही दिवसांपूर्वी रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले होते कि कंपनी भविष्यात आगामी आयफोनसाठी फोल्डेबल आणि फ्लेक्सिबल स्क्रीनचा शोध घेत आहे. Bloomberg नुसार, कंपनीची हि योजना सुरुवातीच्या टप्प्यात आहे आणि 2021 मध्ये येणाऱ्या आयफोनसाठी नाही.

The post या खास फीचरसह येऊ शकतो Apple चा पावरफुल iPhone 13 Pro, नवीन लीक मध्ये झाला खुलासा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/iphone-13-pro-come-with-always-on-display-120hz-refresh-rate/feed/ 0
DSLR सारख्या कॅमेऱ्यासह यावर्षी लॉन्च होईल iPhone 13, समोर आली महत्वाची माहिती https://www.91mobiles.com/marathi/iphone-13-with-dslr-like-camera-laucnh-soon/ https://www.91mobiles.com/marathi/iphone-13-with-dslr-like-camera-laucnh-soon/#respond Fri, 29 Jan 2021 13:55:42 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9817 iPhone 13 सीरीजसाठी कंपनीने Cupertino च्या एका टेक एक्सपर्टशी हात मिळवणी केली आहे

The post DSLR सारख्या कॅमेऱ्यासह यावर्षी लॉन्च होईल iPhone 13, समोर आली महत्वाची माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
गेल्या वर्षी ऍप्पलने सादर केलेल्या iPhone 12 सीरीजचे स्मार्टफोन्स जगभरात चमक दाखवत आहेत आणि त्यामुळे कंपनी नवीन रेकॉर्ड बनवत आहे. तर दुसरीकडे दरवर्षी प्रमाणेच Apple यावर्षी आपले नवीन आणि ऍडव्हान्स iPhone लॉन्च करण्याची तयारी करत आहे. यावर्षी ऍप्पलद्वारे सादर केल्या जाणाऱ्या iPhone 13 Series च्या स्मार्टफोन्सच्या स्पेसिफिकेशन्सबाबत आतापासून चर्चा सुरु होऊ लागली आहे. बातमी येत आहे कि आयफोन 13 सीरीजच्या मोबाईल्स मध्ये काही मोठे बदल दिसू शकतात. सध्या iPhone 13 संबंधित जास्त माहिती समोर आली नाही, पण काही लीक्सनुसार हा फोन सप्टेंबर 2021 मध्ये लॉन्च केला जाऊ शकतो.

नवीन रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले आहे कि आयफोन 13 सीरीजच्या फोन्सचा कॅमेरा डीएसएलआर कॅमेऱ्याप्रमाणे असेल. रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले आहे कि iPhone 13 सीरीजसाठी कंपनीने Cupertino च्या एका टेक एक्सपर्टशी हात मिळवणी केली आहे आणि त्याच्याकडे आयफोन 13 साठी कॅमेरा तयार करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

हे देखील वाचा : कमी किंमतीत येत आहे नवीन iPhone!, येईल अनेक नवीन फीचर्ससह

बोलले जात आहे कि यात सेंसर-शिफ्ट आणि ऑप्टिकल इमेज स्टेबलाइजेशन सारखे फीचर्स असतील. तसेच कंपनीची योजना आहे कि आयफोन 13 सीरीज मध्ये डायरेक्ट टाइम-ऑफ-फ्लाइट (D-ToF) टेक्नॉलॉजी पण दिली जाईल. हे सेंसर US-आधारित कंपनीद्वारे दिले जातील.

iPhone 13 सीरीज मध्ये असतील 4 मॉडेल

काही दिवसांपूर्वी टेक अनॅलिस्ट Ming-Chi Kuo ने माहिती दिली होती कि यावर्षी आयफोन 13 सीरीज मध्ये iPhone 13 Mini, iPhone 13, iPhone 13 Pro आणि iPhone 13 Pro Max सारखे स्मार्टफोन्स लॉन्च होतील, ज्यांची डिजाइन्स आणि स्पेसिफिकेशन्स खूप खास असतील.

हे देखील वाचा : Apple iPhone 12 ची खरी किंमत फक्त 30,300 रुपये! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

स्पेसिफिकेशन्स

आतापर्यंत समोर आलेल्या लीक्सनुसार नवीन आयफोन्स मध्ये OLED पॅनलचा वापर केला जाईल. फोन्सच्या टॉप दोन मॉडेल मध्ये LTOP OLED चा वापर केला जाऊ शकतो जो 120Hz रिफ्रेश रेट सपोर्ट सह येईल. या लाइनअपच्या iPhone 13 Mini मध्ये 5.4 इंचाचा डिस्प्ले, iPhone 13 मध्ये 6.1 इंचाचा डिस्प्ले, iPhone 13 Pro मध्ये 6.1 इंचाचा डिस्प्ले आणि iPhone 13 Pro मध्ये 6.7 इंचाचा डिस्प्ले असू शकतो.

फोल्डेबल आयफोन

सॅमसंग, मोटोरोला आणि हुवावे प्रमाणेच ऍप्पल पण आपल्या फोल्डेबल आयफोनची तयारी करत आहे. काही दिवसांपूर्वी रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले होते कि कंपनी आयफोनसाठी फोल्डेबल आणि फ्लेक्सिबल स्क्रीनचा शोध घेत आहे. Bloomberg नुसार, सध्या कंपनीचा हा प्लान आपल्या सुरवातीच्या टप्प्यात आहे आणि हा 2021 मध्ये येणाऱ्या आयफोनसाठी नसेल.

The post DSLR सारख्या कॅमेऱ्यासह यावर्षी लॉन्च होईल iPhone 13, समोर आली महत्वाची माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/iphone-13-with-dslr-like-camera-laucnh-soon/feed/ 0
स्वस्त iPhone SE 3 मध्ये असेल मोठा 6-इंचाचा डिस्प्ले, समोर आली महत्वाची माहिती https://www.91mobiles.com/marathi/iphone-se-3-launch-with-big-display-launch-next-year/ https://www.91mobiles.com/marathi/iphone-se-3-launch-with-big-display-launch-next-year/#respond Thu, 12 Nov 2020 13:04:48 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8923 रिपोर्ट मध्ये असे पण सांगण्यात आले होते कि iPhone 13 मॉडेलची विक्री पण चांगली होईल कारण 5जी के प्रसार सोबतच चांगल्या 5जी स्मार्टफोनची विक्री वाढेल.

The post स्वस्त iPhone SE 3 मध्ये असेल मोठा 6-इंचाचा डिस्प्ले, समोर आली महत्वाची माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
यावर्षी ऍप्पलने आपला स्वस्त स्मार्टफोन iPhone SE (2020) लॉन्च केला होता. बजेट फ्रेंडली कॅटेगरी मध्ये आलेल्या या आयफोनचा आकार छोटा होता था. पण आता बातमी समोर येत आहे कि कंपनी या सीरीजच्या अपकमिंग स्मार्टफोन iPhone SE 3 वर काम करत आहे, ज्याबाबत बातम्या येऊ लागल्या आहेत. समोर आलेल्या नवीन रिपोर्ट मध्ये फोनच्या डिस्प्ले आणि इतर स्पेसिफिकेशन्सची माहिती समोर आली आहे. आयफोन एसई 3 साठी आता ग्राहकांना खूप प्रतीक्षा करावी लागू शकते. सध्या डिवाइसच्या लॉन्च टाइमलाइन बद्दल कोणतीही माहिती आली नाही.

फेमस ऍप्पल अनॅलिस्ट Ming-Chi Kuo ने याबाबत दावा केला आहे कि कंपनी हा मॉडेल पुढल्या वर्षीच्या पहिल्या क्वार्टर पर्यंत सादर करणार नाही. तसेच रिपोर्ट मध्ये अशी पण माहिती देण्यात आली आहे कि iPhone 12 सीरीज प्रमाणेच पुढल्या वर्षी पण iPhone 13 सीरीज मध्ये चार मॉडेल्स सादर केले जातील.

iPhone SE 3 चे स्पेसिफिकेशन

रिपोर्टनुसार आयफोन एसई 3 स्मार्टफोन मध्ये 6.06-इंचाचा मोठा डिस्प्ले असू शकतो. तसेच फोन 5जी नेटवर्क सपोर्ट सह येईल. इतकेच नव्हे तर या फोन मध्ये ड्यूल रियर कॅमेरा आणि टच आयडी फिंगरप्रिंट स्कॅनर पण दिला जाऊ शकतो. पण टच आयडीच्या प्लेसमेंट बद्दल कोणतीही माहिती देण्यात आली नाही.

iPhone 13 सीरीज

काही दिवसांपूर्वीच माहिती समोर आली होती कि साल 2021 मध्ये लॉन्च होणारी ऍप्पलची नवीन आयफोन सीरीज iPhone 13 च्या नावाने सादर केली जाईल. या सीरीज अंतगर्त iPhone 13 Pro, iPhone 13 Pro Max फोन सह अपग्रेडेड अल्ट्रा वाइड अँगल कॅमेरा दिला जाऊ शकतो.

रिपोर्ट मध्ये असे पण सांगण्यात आले होते कि iPhone 13 मॉडेलची विक्री पण चांगली होईल कारण 5जी के प्रसार सोबतच चांगल्या 5जी स्मार्टफोनची विक्री वाढेल. असे पण बोलले जात आहे कि आयफोन 12 सीरीज प्रमाणे आयफोन 13 सीरीज मध्ये पण आयफोन 13 मिनी लॉन्च केला जाईल. टिप्स्टर आईस यूनिवर्सच्या एका ट्वीटनुसार आयफोन 13 मध्ये छोटी नॉच मिळेल.

सोर्स

ऍप्पल आयफोन एसई 2020 256जीबी व्हिडीओ

The post स्वस्त iPhone SE 3 मध्ये असेल मोठा 6-इंचाचा डिस्प्ले, समोर आली महत्वाची माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/iphone-se-3-launch-with-big-display-launch-next-year/feed/ 0