Bharti Airtel - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 07 May 2021 15:45:38 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Airtel च्या सिस्टममध्ये झाला बिघाड, आपोआप पाठवले जात आहेत SMS, मोठ्या Data Scam ची आहे भीती https://www.91mobiles.com/marathi/airtel-users-privacy-data-security-risk-in-india-due-to-system-error/ https://www.91mobiles.com/marathi/airtel-users-privacy-data-security-risk-in-india-due-to-system-error/#respond Fri, 07 May 2021 15:45:38 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=10856 Airtel सिस्टममध्ये झालेला हा बिघाड तेव्हा प्रकाशात आला जेव्हा देशात एयरटेल मोबाईल युजर्सना त्यांच्या नंबरवर एक एसएमएस मिळाला.

The post Airtel च्या सिस्टममध्ये झाला बिघाड, आपोआप पाठवले जात आहेत SMS, मोठ्या Data Scam ची आहे भीती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
इंटरनेट मार्केट आणि टेक्नोलॉजीने गेल्या काही वर्षांमध्ये खूप प्रगती केली आहे. डिजिटल होत असलेल्या दुनियेत अनेकजण काम घर बसल्या मोबाईलवरून करतात. इंटरनेटच्या वाढत्या महत्वासोबत सामान्य लोकांची गोपनीयता आणि खाजगी माहिती धोक्यात येऊ लागली आहे. गेल्या काही दिवसांत पण डेटा चोरीची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. यात आता भारतीय टेलीकॉम कंपनी Airtel च्या नावाचा पण समावेश झाल्याचे दिसत आहे. भारती एयरटेल कंपनीच्या सिस्टममध्ये एक मोठा बिघाड समोर आला आहे त्यामुळे एयरटेल युजर्सच्या डेटावर पण चोरीचा धोका संभवताना दिसत आहे. (Airtel users privacy data security risk in India due to system error)

कंपनीच्या नियंत्रणात राहिले नाहीत SMS

Airtel सिस्टममध्ये झालेला हा बिघाड तेव्हा प्रकाशात आला जेव्हा देशात एयरटेल मोबाईल युजर्सना त्यांच्या नंबरवर एक एसएमएस मिळाला. हा एसएमएस एयरटेलद्वारे AD-TEST1 हेडरसह आला होता, ज्यात ‘रिचार्ज’ संबंधित काही गोष्टी सांगण्यात आल्या होत्या, जे तुम्ही खाली दिलेल्या फोटोमध्ये पण बघू शकता. या एसएमएसमध्ये एयरटेल युजर्सचा खाजगी मोबाईल नंबर पण लिहिण्यात आला होता. मेसेज कंटेंटपेक्षा जास्त मेसेजच्या पत्त्याने ग्राहकांच्या मनात संशय निर्माण केला होता, कारण हा एक टेस्टिंग मेसेज होता.

एअरटेलच्या एररमुळे आलेला एसएमएस

वाचकांना सांगू इच्छितो कि सामान्यतः जेव्हा एखादा टेस्टिंग मेल किंवा मेसेज पाठवला जातो तेव्हा त्याचे शीर्षक TEST1, TEST2, TEST3 या क्रमात येते. हा मेसेज मिळाल्यावर अशी समजूत झाली कि कदाचित एयरटेल कंपनी एखाद्या सेवेची टेस्टिंग करत आहे आणि यासाठी काही निवडक युजर्सना हा टेस्ट एसएमएस पाठवत आहे. पण पुहे जे घडले त्यामुळे घटनेला वेगळेच वळण मिळाले.

एयरटेलने सिस्टममधील बिघाड मान्य केला

TEST1 च्या एसएमएसनंतर जवळपास 3 तासांनी Airtel कडून अजून एक मेसेज युजर्सना मिळाला जो AD-Airtel हेडरसह आला होता. या एसएमएसमध्ये एयरटेलने आधीच्या मेसेजचा उल्लेख करता म्हटले होते कि, ‘आज अनेक ग्राहकांना टेस्ट1 कडून एखादा मेसेज मिळाला असेल, तो एसएमएस सिस्टम एररमुळे पाठवण्यात आला आहे.’ या नवीन एसएमएसमध्ये एयरटेलने System Error ची कबुली देत ग्राहकांना आवाहन केले कि त्यांनी जुना एसएमएस इग्नोर करावा.

एअरटेलकडून आलेले उत्तर

कंपनीचे उत्तर

Airtel च्या सिस्टममध्ये आलेला बिघाड आणि याचे कारण युजर्सच्या खाजगी मोबाईल नंबरवर रिसीव झालेल्या एसएमएसबाबत जेव्हा कंपनीच्या कस्टमर केयर विभागात विचारणा करण्यात आली तेव्हा सांगण्यात आले कि हा एसएमएस एखाद्या सर्कलमध्ये नाही तर संपूर्ण भारतातील एयरटेल युजर्सच्या नंबरवर गेला आहे. कंपनीने मान्य केले कि त्यांच्या सिस्टममध्ये काही बिघाड झाला आहे आणि यामुळे Airtel Postpaid आणि Airtel Prepaid दोन्ही युजर्सना असा मेसेज मिळाला आहे.

हे देखील वाचा : Xiaomi लवकरच लॉन्च करेल Mi Pad 5 आणि Pad 5 Pro, समोर आले स्पेसिफिकेशन्स

डेटा लीकची भीती

एयरटेलच्या सिस्टममध्ये काय गडबड झाली आहे हे कंपनीने सार्वजनिक केले नाही. बातमी लिहिस्तोवर Airtel ने आपल्या कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म किंवा प्रेस रिलीजच्या माध्यमातून याबाबत कोणतीही माहिती दिली नाही. सिस्टममध्ये आलेल्या बिघाडामुळे मोबाईल ग्राहकांच्या व एयरटेल युजर्सच्या डेटावर कोणता प्रभाव झाला आहे आणि त्यांची खाजगी माहिती Airtel कंपनीकडे किती सुरक्षित आहे, या गोष्टी अजूनही पडद्यामागे आहेत.

सामान्य नागरिकांमध्ये भीती याची आहे कि सिस्टम एररमुळे जर त्यांचा खाजगी मोबाईल नंबर कंपनीद्वारे विनाकारण वापरला जाऊ शकतो. आजच्या काळात जेव्हा मोठमोठे बॅंक ट्रांजेक्शन, KYC, Aadhaar Card आणि PAN Card सर्व एका मोबाईल नंबरच्या माध्यमातून सुरु असतात, त्यामुळे टेलीकॉम कंपनीद्वारे खाजगी मोबाईल नंबरचा असा वापर चुकीचा ठरतो.

हे देखील वाचा : 20,000 रुपयांच्या बजेटमधील टॉप 10 फास्ट चार्जिंग असलेले स्मार्टफोन्स, क्षणात होतील फुल चार्ज

BSNL ने पण केला होता अलर्ट जारी

अलीकडेच सरकारी टेलीकॉम कंपनी बीएसएनएलने पण अलर्ट जारी करून काही एसएमएसचे हेडर्स आणि पत्ते पण शेयर केले होते. कंपनीच्या एसएमएसमध्ये CP-SMSFST, AD-VIRINF, CP-BLMKND आणि BP-ITLINN चा समावेश होता, ज्यांच्यावर फसवणुकीचा शिक्का मारण्यात आला होता. भारत संचार निगम लिमिटेडने स्पष्ट सांगितले होते कि या हेडर्ससह येणारे एसएमएस कंपनीचे नाहीत, त्यामुळे या मेसेजमधील कोणतीही लिंक क्लिक करू नये आणि याला उत्तर देऊ नये.

The post Airtel च्या सिस्टममध्ये झाला बिघाड, आपोआप पाठवले जात आहेत SMS, मोठ्या Data Scam ची आहे भीती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/airtel-users-privacy-data-security-risk-in-india-due-to-system-error/feed/ 0
Jio 555 प्लान vs Airtel 558 प्लान, जाणून घ्या कोणती कंपनी देत आहे जास्त बेनिफिट https://www.91mobiles.com/marathi/reliance-jio-rs-555-plan-bharti-airtel-rs-558-plan-comparison-benefits-data-voice-calling-free-iuc-offer/ https://www.91mobiles.com/marathi/reliance-jio-rs-555-plan-bharti-airtel-rs-558-plan-comparison-benefits-data-voice-calling-free-iuc-offer/#respond Mon, 04 Nov 2019 13:19:47 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5667 Jio चा 555 रुपयांचा प्लान 84 दिवसांच्या वॅलिडिटी सह येतो तर Airtel ने आपला प्लान 82 दिवसांच्या वॅलिडिटी सह सादर केला आहे.

The post Jio 555 प्लान vs Airtel 558 प्लान, जाणून घ्या कोणती कंपनी देत आहे जास्त बेनिफिट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
इंडियन टेलीकॉम कंपन्यांमधील स्पर्धा काही लपून राहिलेली नाही. अधिकाधिक ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी या कंपन्या स्वस्तात जास्त बेनिफिट मिळणारे प्लान्स देतात तसेच स्वतःला इतरांपेक्षा चांगला बनवण्याची संधी सोडता नाहीत. देशातील दोन मोठ्या टेलीकॉम कंपन्या Reliance Jio आणि Bharti Airtel सुरवातीपासूनच स्पर्धेत पुढे आहेत. जेव्हा नेटवर्क निवडण्याची वेळ येते तेव्हा सामान्य माणूस गोंधळात पडतो कि Jio निवडावी कि Airtel. तसे पाहता या दोन्ही कंपन्यांकडे चांगले प्लान्स आहेत, पण Reliance Jio च्या 555 रुपये आणि Bharti Airtel च्या 558 रुपयांचा प्लान सध्या खूप चर्चेत आहे. जर तुम्ही पण दोन्ही नेटवर्कचे हे प्लान्स निवडणार असाल तर पुढे आम्ही दोन्ही कंपन्यांच्या प्लॅन्सची तुलना केली आहे कि कोणत्या नेटवर्क वर जास्त बेनिफिट मिळत आहे.

किंमत

सर्वात आधी प्लान्सची किंमत पाहता हे दोन्ही प्लान 500 रुपयांपेक्षा जास्तीच्या बजेट मध्ये येतात. Reliance Jio च्या प्लानची किंमत 555 रुपये आहे तर Bharti Airtel ने आपला प्लान 558 रुपयांमध्ये सादर केला आहे. म्हणजे Airtel च्या प्लानची किंमत Jio च्या प्लान पेक्षा 3 रुपये जास्त आहे.

वॅलिडिटी

Reliance Jio आणि Bharti Airtel दोन्ही कंपन्यांचे प्लान दीर्घ वैधतेसह येतात, म्हणजे यूजर एका रिचार्ज नंतर पुढील अडीच महिन्यांपेक्षा पण जास्त वेळ कोणत्याही अडचणीविना हे प्लान्स वापरू शकतात. Jio चा 555 रुपयांचा प्लान 84 दिवसांच्या वॅलिडिटी सह येतो तर Airtel ने आपला प्लान 82 दिवसांच्या वॅलिडिटी सह सादर केला आहे.

हे देखील वाचा: Jio चे 8 प्लान ज्यात गरज लागत नाही वेगळ्या कॉलिंग रिचार्जची, जाणून घ्या सविस्तर

इंटरनेट डेटा

आजकाल एखादा प्लान निवडण्यासाठी सर्वात आधी इंटरनेट डेटा बघितला जातो. Reliance Jio आपल्या 555 रुपयांच्या प्लान मध्ये रोज 2 जीबी 4G इंटरनेट डेटा देत आहे. म्हणजे संपूर्ण प्लानच्या वॅलिडिटी मध्ये यूजर्सना एकूण 168 जीबी (84 x 2 = 168) इंटरनेट डेटा मिळेल. तर Airtel आपल्या यूजर्सना 558 रुपयांच्या प्लान मध्ये Jio पेक्षा जास्त रोज 3 जीबी 4G डेटा देत आहे. एयरटेलच्या प्लान मध्ये संपूर्ण वॅलिडिटी साठी एकूण जीबी (82 x 3 = 246) 4जी इंटरनेट डेटा मिळेल.

कॉलिंग

Reliance Jio आणि Bharti Airtel ने आपल्या यूजर्सना फ्री अनलिमिटेड वॉयस कॉलिंग देण्याचा शब्द दिला आहे. पण Jio च्या प्लान मध्ये ऑननेटवर्क कॉलिंग तर पूर्णपणे फ्री आहे परंतु ऑफनेटवर्क कॉल करण्यासाठी कंपनी कडून फक्त 3000 मिनिटे देण्यात आली आहेत. तर Airtel ने आपल्या यूजर्ससाठी हे वॉयस कॉल पूर्णपणे मोफत ठेवले आहेत. ऑननेटवर्क व ऑफनेटवर्क दोन्हीवर अनलिमिटेड वॉयस कॉल करता येतील.

हे देखील वाचा: Jio ची दिवाळी अजूनही चालू, 699 रुपयांमध्ये JioPhone विकत घेण्याची ऑफर एक महीना अजून सुरु राहणार

कोणाचा प्लान आहे चांगला

Reliance Jio चा प्लान जरी Bharti Airtel च्या प्लानच्या तुलनेत 3 रुपयांनी स्वस्त असला तरी बेनिफिट्सच्या बाबतीती Airtel चा 558 रुपयांचा प्लान Jio च्या 555 रुपयांच्या प्लान पेक्षा कितीतरी जास्त फायदे देत आहे. प्रतिदिन डेटाच्या बाबतीती Airtel यूजर्सना Jio च्या पेक्षा रोज 1 जीबी 4G डेटा जास्त मिळेल. तर संपूर्ण प्लान मध्ये Airtel नेटवर्क वर Jio च्या तुलनेत 78 जीबी डेटा जास्त मिळत आहे.

त्याचप्रमाणे Jio नंबर वरून IUC द्वारे जास्त कॉलिंग करता येईल तर Airtel यूजर्स पूर्णपणे मोफत अनलिमिटेड कॉल करू शकतील. विशेष म्हणजे Jio यूजर्सना PayTm वरून रिचार्ज केल्यास 555 रुपयांच्या प्लान मध्ये 50 रुपयांचा कॅशबॅक पण मिळत आहे.

The post Jio 555 प्लान vs Airtel 558 प्लान, जाणून घ्या कोणती कंपनी देत आहे जास्त बेनिफिट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/reliance-jio-rs-555-plan-bharti-airtel-rs-558-plan-comparison-benefits-data-voice-calling-free-iuc-offer/feed/ 0
1 महिन्यात 120 लाख यूजर जोडून जियो ने घडवला इतिहास https://www.91mobiles.com/marathi/reliance-jio-adds-12-million-user-in-july-became-second-largest-indian-telecom-operator-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/reliance-jio-adds-12-million-user-in-july-became-second-largest-indian-telecom-operator-in-marathi/#respond Thu, 20 Sep 2018 11:42:31 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=2195 जियो ने एक महिन्यात 12 मिलियन यूजर जोडण्या मागचे मुख्य कारण जियोफोन चा सेल असू शकतो.

The post 1 महिन्यात 120 लाख यूजर जोडून जियो ने घडवला इतिहास first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
रिलायंस जियो आता पर्यंत देशातील सर्वात वेगाने वाढणारी टेलीकॉम कंपनी म्हणून ओळखली जाते. फक्त 4जी नेटवर्क देणार्‍या या कंपनी ने आपली ही ओळख सिद्ध केली आहे. काही काळापूर्वी रिलायंस जियो भारतात टेलीकॉम कंपन्यांच्या लिस्ट मध्ये चौथ्या नंबर वर होती. पण आता आपल्या प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकत कंपनी देशातील दुसरी सर्वात मोठी टेलीकॉम कंपनी बनली आहे. रिलायंस जियो ने फक्त आपल्या टेलीकॉम सर्विसे ने लोकांना आपले फॅन बनवले नाही तर 4जी फीचर फोन जियोफोन ने पण कंपनीला भारतात यश मिळवून दिले आहे.

इंडियन टेलीकॉम इंडस्ट्री संबंधीत एका ताजा रिपोर्ट देशातील टेलीकॉम रेग्यूलेटरी अथॉरिटी ट्राई ने सादर केला आहे आणि या रिपोर्ट ने सर्वांनाच धक्का दिला आहे. जियो ने एकाच महिन्यात 120 लाख म्हणजे 1 करोड 20 लाख यूजर्स जोडून नवीन रेकॉर्ड बनवला आहे. ट्राई ने आपल्या रिपोर्ट मध्ये सांगितले आहे की रिलायंस जियो आधी चौथ्या नंबर वर होती पण आता वोडाफोन व आइडियाला मागे टाकत देशातील दुसरी सर्वात मोठी दूरसंचार कंपनी बनली आहे. या शर्यतीत आता वोडाफोन तिसर्‍या तसेच आइडिया चौथ्या नंबर वर सरकली आहे. तसेच भारती एयरटेल अजूनही भारतातल्या सर्वात मोठ्या टेलीकॉम कंपनीच्या जागी कायम आहे.

ट्राई चा हा रिपोर्ट जुलै महिन्यातील आहे. रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले आहे की जून च्या शेवट पर्यंत रिलायंस जियो कडे एकूण 215 मिलियन चा यूजर बेस होता. म्हणजे संपूर्ण देशातील 215 मिलियन लोक जियो चा सिम वापरतात. तसेच जुलै महिन्यात जियो ने 12 मिलियन अजून नवीन ग्राहक आपल्या नेटवर्कशी जोडले आहेत. जुलै संपता संपता रिलायंस जियो कडे एकूण 227 मिलियन यूजर झाले होते आणि या युजर्सच्या जोरावर कपंनी दुसरी सर्वात मोठी इंडियन टेलीकॉम कंपनी बनली आहे.

रिलायंस जियो कडे जुलै महिन्यात एकूण 227 मिलियन ग्राहक होते. तसेच जुलै महिन्यात वोडाफोन चा एकूण यूजर बेस 223.3 मिलियन होता आणि आइडिया च्या सर्व यूसर्जची संख्या 220.6 मिलियन होती. या यादीत एयरटेल कडे सर्वात जास्त 345 मिलियन यूजर्स आहेत. ट्राई च्या यादीत एयरटेल नंबर एक वर कायम आहे तसेच जियो दुसर्‍या, वोडाफोन तिसर्‍या व आइडिया चौथ्या नंबर वर आहे.

जियो ने एक महिन्यात 12 मिलियन यूजर जोडण्या मागचे मुख्य कारण जियोफोन चा सेल असू शकतो. जुलै महिन्यात कंपनी ने जियोफोन नवीन आॅफर्स व प्लान्स सह सेल साठी उपलब्ध केला होता. कंपनी जियोफोन एक्सचेंज आॅफर अंतर्गत फक्त 501 रुपयांमध्ये विकला होता आणि त्याचमुळे जियो नेटवर्क शी मोठ्या संख्येने मोबाईल यूजर जोडले गेले आहेत.

लक्षात असू दे ट्राई चा हा रिपोर्ट जुलै महिन्याचा आहे. आणि काही दिवसांपूर्वी वोडाफोन आणि आइडिया या दोन कंपन्या एकत्र आल्या आहेत. त्यामुळे या दोन्ही कंपन्यांचे मिळून यूजर बेस 450 मिलियन च्या वर जाईल. म्हणजे वोडाफोन-आइडिया देशातील सर्वात मोठी टेलीकॉम कपंनी होईल.

The post 1 महिन्यात 120 लाख यूजर जोडून जियो ने घडवला इतिहास first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/reliance-jio-adds-12-million-user-in-july-became-second-largest-indian-telecom-operator-in-marathi/feed/ 0
जियो ने परत मारली बाजी, मार्च महिन्यात कमावले 94 लाख यूजर्स, एयरटेल-वोडाफोन-आयडिया रेस मध्ये मागे https://www.91mobiles.com/marathi/reliance-jio-vodafone-bharti-airtel-idea-trai-report-march-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/reliance-jio-vodafone-bharti-airtel-idea-trai-report-march-in-marathi/#respond Fri, 25 May 2018 14:47:44 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=642 हा रिपोर्ट बघून हे पण समजते की आपल्या प्लान्स आणि आॅफर्स च्या जोरावर रिलायंस जियो आणि आयडिया सर्वात जास्त कस्टमर्स आकर्षित करण्यास यशस्वी झाले आहेत.

The post जियो ने परत मारली बाजी, मार्च महिन्यात कमावले 94 लाख यूजर्स, एयरटेल-वोडाफोन-आयडिया रेस मध्ये मागे first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
भारतात वेगाने वाढणार्‍या टेलीकॉम ग्राहकांचा भारतीय दूरसंचार विनियामक प्राधिकरण (ट्राई) ने काल आपला रिपोर्ट सादर केला आहे. या रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले आहे की मार्च महिन्यात देशात 120.6 कोटी पेक्षा जास्त टेलीकॉम यूजर्स​ मोजले गेले. भारतीय टेलीकॉम यूजर्स संबंधी आकडे तुम्ही इथे क्लिक करून वाचू शकता. यूजर्स संबधी आकडेवारी सह ट्राई ने टेलीकॉम कंपन्यांन बाबतीत रोचक खुलासे केले आहेत, ज्यात सांगण्यात आले आहे की जियो ने अन्य कंपन्यांपेक्षा देशात सर्वात जास्त यूजर्स जोडले आहेत.

ट्राई ने आपल्या रिपोर्ट मध्ये देशातील टेलीफोन यूजर्स ची आकडेवारी शेयर केली आहे. ट्राई चे हे आकडे फेब्रुवारी आणि मार्च महिन्याच्या स्टडी च्या आधार वर सादर केले आहेत. या रिपोर्ट नुसार मार्च महिन्यात रिलायंस जियो ने 94 लाख पेक्षा जास्त नवीन ग्राहक आपल्या नेटवर्क शी जोडले आहेत. या यादीत जियो नंतर आयडिया चे नाव आहे जीने 91 लाख नवीन यूजर्स मिळवले आहेत. तिसर्‍या नंबर वरील एयरटेल ने 84 लाख आणि चौथ्या नंबर वरील वोडाफोन ने 56 लाख च्या आसपास नवीन यूजर्स आपल्या नेटवर्क शी जोडले आहेत.

हा रिपोर्ट बघून हे पण समजते की आपल्या प्लान्स आणि आॅफर्स च्या जोरावर रिलायंस जियो आणि आयडिया सर्वात जास्त कस्टमर्स आकर्षित करण्यास यशस्वी झाले आहेत. असे बोलले जात आहे की जियो च्या या लिस्ट मध्ये टॉप वर येण्यामागे एक मोठे कारण कंपनी चा 4जी फीचर फोन जियोफोन पण आहे. विशेष म्हणजे जियोफोन हा देशातील सर्वात जास्त विकला गेलेला फीचर फोन आहे आणि त्यामुळे देशातील फीचर फोन बाजारात जियो जवळपास 35.8 टक्के भागावर राज्य करते.

मार्केट शेयर्स पाहत जियो कडून सर्वाधिक कस्टमर्स जोडले गेले असूनही मार्च 2018 पर्यंत एयरटेल सर्वात जास्त 25.7 टक्के शेयर वर कब्जा करून आहे. 18.82 टक्के शेयर्स सह वोडाफोन दुसर्‍या आणि 17.85 टक्के शेयर्स सह आयडिया तिसर्‍या नंबर वर आहे. रिलायंस जियो शेयर्स च्या लिस्ट मध्ये 15.76 टक्क्यां सह चौथ्या नंबर वर आली आहे आणि 9.44 टक्के मार्केट शेयर सह सरकारी कंपनी बीएसएनएल पाचव्या नंबर वर आहे.

The post जियो ने परत मारली बाजी, मार्च महिन्यात कमावले 94 लाख यूजर्स, एयरटेल-वोडाफोन-आयडिया रेस मध्ये मागे first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/reliance-jio-vodafone-bharti-airtel-idea-trai-report-march-in-marathi/feed/ 0