Jio 555 प्लान vs Airtel 558 प्लान, जाणून घ्या कोणती कंपनी देत आहे जास्त बेनिफिट

इंडियन टेलीकॉम कंपन्यांमधील स्पर्धा काही लपून राहिलेली नाही. अधिकाधिक ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी या कंपन्या स्वस्तात जास्त बेनिफिट मिळणारे प्लान्स देतात तसेच स्वतःला इतरांपेक्षा चांगला बनवण्याची संधी सोडता नाहीत. देशातील दोन मोठ्या टेलीकॉम कंपन्या Reliance Jio आणि Bharti Airtel सुरवातीपासूनच स्पर्धेत पुढे आहेत. जेव्हा नेटवर्क निवडण्याची वेळ येते तेव्हा सामान्य माणूस गोंधळात पडतो कि Jio निवडावी कि Airtel. तसे पाहता या दोन्ही कंपन्यांकडे चांगले प्लान्स आहेत, पण Reliance Jio च्या 555 रुपये आणि Bharti Airtel च्या 558 रुपयांचा प्लान सध्या खूप चर्चेत आहे. जर तुम्ही पण दोन्ही नेटवर्कचे हे प्लान्स निवडणार असाल तर पुढे आम्ही दोन्ही कंपन्यांच्या प्लॅन्सची तुलना केली आहे कि कोणत्या नेटवर्क वर जास्त बेनिफिट मिळत आहे.

किंमत

सर्वात आधी प्लान्सची किंमत पाहता हे दोन्ही प्लान 500 रुपयांपेक्षा जास्तीच्या बजेट मध्ये येतात. Reliance Jio च्या प्लानची किंमत 555 रुपये आहे तर Bharti Airtel ने आपला प्लान 558 रुपयांमध्ये सादर केला आहे. म्हणजे Airtel च्या प्लानची किंमत Jio च्या प्लान पेक्षा 3 रुपये जास्त आहे.

वॅलिडिटी

Reliance Jio आणि Bharti Airtel दोन्ही कंपन्यांचे प्लान दीर्घ वैधतेसह येतात, म्हणजे यूजर एका रिचार्ज नंतर पुढील अडीच महिन्यांपेक्षा पण जास्त वेळ कोणत्याही अडचणीविना हे प्लान्स वापरू शकतात. Jio चा 555 रुपयांचा प्लान 84 दिवसांच्या वॅलिडिटी सह येतो तर Airtel ने आपला प्लान 82 दिवसांच्या वॅलिडिटी सह सादर केला आहे.

हे देखील वाचा: Jio चे 8 प्लान ज्यात गरज लागत नाही वेगळ्या कॉलिंग रिचार्जची, जाणून घ्या सविस्तर

इंटरनेट डेटा

आजकाल एखादा प्लान निवडण्यासाठी सर्वात आधी इंटरनेट डेटा बघितला जातो. Reliance Jio आपल्या 555 रुपयांच्या प्लान मध्ये रोज 2 जीबी 4G इंटरनेट डेटा देत आहे. म्हणजे संपूर्ण प्लानच्या वॅलिडिटी मध्ये यूजर्सना एकूण 168 जीबी (84 x 2 = 168) इंटरनेट डेटा मिळेल. तर Airtel आपल्या यूजर्सना 558 रुपयांच्या प्लान मध्ये Jio पेक्षा जास्त रोज 3 जीबी 4G डेटा देत आहे. एयरटेलच्या प्लान मध्ये संपूर्ण वॅलिडिटी साठी एकूण जीबी (82 x 3 = 246) 4जी इंटरनेट डेटा मिळेल.

कॉलिंग

Reliance Jio आणि Bharti Airtel ने आपल्या यूजर्सना फ्री अनलिमिटेड वॉयस कॉलिंग देण्याचा शब्द दिला आहे. पण Jio च्या प्लान मध्ये ऑननेटवर्क कॉलिंग तर पूर्णपणे फ्री आहे परंतु ऑफनेटवर्क कॉल करण्यासाठी कंपनी कडून फक्त 3000 मिनिटे देण्यात आली आहेत. तर Airtel ने आपल्या यूजर्ससाठी हे वॉयस कॉल पूर्णपणे मोफत ठेवले आहेत. ऑननेटवर्क व ऑफनेटवर्क दोन्हीवर अनलिमिटेड वॉयस कॉल करता येतील.

हे देखील वाचा: Jio ची दिवाळी अजूनही चालू, 699 रुपयांमध्ये JioPhone विकत घेण्याची ऑफर एक महीना अजून सुरु राहणार

कोणाचा प्लान आहे चांगला

Reliance Jio चा प्लान जरी Bharti Airtel च्या प्लानच्या तुलनेत 3 रुपयांनी स्वस्त असला तरी बेनिफिट्सच्या बाबतीती Airtel चा 558 रुपयांचा प्लान Jio च्या 555 रुपयांच्या प्लान पेक्षा कितीतरी जास्त फायदे देत आहे. प्रतिदिन डेटाच्या बाबतीती Airtel यूजर्सना Jio च्या पेक्षा रोज 1 जीबी 4G डेटा जास्त मिळेल. तर संपूर्ण प्लान मध्ये Airtel नेटवर्क वर Jio च्या तुलनेत 78 जीबी डेटा जास्त मिळत आहे.

त्याचप्रमाणे Jio नंबर वरून IUC द्वारे जास्त कॉलिंग करता येईल तर Airtel यूजर्स पूर्णपणे मोफत अनलिमिटेड कॉल करू शकतील. विशेष म्हणजे Jio यूजर्सना PayTm वरून रिचार्ज केल्यास 555 रुपयांच्या प्लान मध्ये 50 रुपयांचा कॅशबॅक पण मिळत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here