Jio चे 8 प्लान ज्यात गरज लागत नाही वेगळ्या कॉलिंग रिचार्जची, जाणून घ्या सविस्तर

रिलायंस Jio ने अलीकडेच घोषणा केली होती कि इतर ऑपरेटर्स त्यांच्याकडून आईयूसी चार्ज घेत आहेत ज्यामुळे त्यांना आपली फ्री कॉलिंग बंद करावी लागत आहे आहे आणि जर Jio यूजर्स दुसऱ्या नेटवर्क वर कॉल करत असतील तर त्यांना 6 पैसे प्रति मिनिटच्या दराने शुल्क द्यावे लागेल. त्यानंतर कंपनीने सांगितले कि ते वेगळे काही प्लान लॉन्च करतील ज्यात इतर नेटवर्क वर कॉलिंग फ्री असेल आणि कंपनीने ऑल इन वन नावाने 8 प्लान सादर केले आहेत. यातील 4 प्लान त्या जियो यूजर्स साठी आहेत जे आपला रिलायंस Jio 4G सिम एखाद्या स्मार्टफोन वर वापरत आहेत तर चार प्लान Jio Phone यूजर्स साठी आहेत. चला जाणून घेऊया या प्लान्स बद्दल सविस्तर.

Jio Phone ऑल इन वन प्लान

Jio Phone 75 रुपयांचा प्लान: आधी Jio Phone यूजर्स साठी बेस प्लान 49 रुपयांचा होता. आता ऑल इन वन प्लानची किंमत 75 रुपयांपासून सुरु होत आहे. तुम्हाला हे थोडे जास्त वाटत असतील पण या प्लान अंतर्गत तुम्हाला 3जीबी 4जी डेटा मिळतो. आधीच्या प्लान मध्ये 1 जीबी डेटा होता. जियो टू जियो कॉलिंग पूर्णपणे फ्री आहे आणि जर दुसऱ्या नेटवर्क वर तुम्ही कॉल केला तर 500 मिनिटांची कॉलिंग मिळेल. सोबत जियो ऍप सर्विस मोफत आहेच. हा प्लान 28 दिवसांसाठी वैध आहे.

Jio Phone 125 रुपयांचा प्लान: Jio Phone यूजर्स साठी ऑल इन वन अंतर्गत हा दुसरा प्लान आहे आणि यात तुम्हाला 14जीबी डेटा मिळेल. अर्थात रोज तुम्ही अर्धा जीबी 4जी डेटा वापरू शकाल. जियो टू जियो अनलिमिटेड कॉलिंग फ्री आहे आणि दुसऱ्या नेटवर्क वर 500 मिनिटांची कॉलिंग दिली जात आहे. सोबतच जियो ऍप सर्विस मोफत मिळेल. या प्लानची वैधता पण 28 दिवस आहे.

Jio Phone 155 रुपयांचा प्लान: हा प्लान पण 28 दिवसांसाठी वैध आहे आणि यात पण 500 मिनिटे दुसऱ्या नेटवर्क वर कॉलिंगसाठी मिळतात. जियो टू जियो अनलिमिटेड कॉलिंग फ्री आहे. याचे वेगळेपण असे कि तुम्ही रोज 1 जीबी डेटा वापरू शकता. 28 दिवसांत तुम्हाला 28 जीबी डेटा मिळेल.

Jio Phone 185 रुपयांचा प्लान: जर जियो फोन मध्ये तुम्हाला भरपूर डेटा हवा असेल तर हा प्लान तुमच्यासाठी आहे. यात तुम्हाला रोज 2जीबी डेटा दिला जातो. हा प्लान 28 दिवसांसाठी वैध आहे आणि यात 56जीबी डेटा मिळतो. जियो टू जियो अनलिमिटेड कॉलिंग फ्री आहे आणि दुसऱ्या नेटवर्क साठी 500 मिनिटांची कॉलिंग दिली जाते. त्याचबरोबर जियो ऍप सर्विस फ्री आहे.

Jio ऑल इन वन प्लान 4जी स्मार्टफोन के लिए

Jio 222 रुपयांचा प्लान: जर तुम्हाला जियोने ठरवलेला आईयूसी चार्ज द्यायचा नसेल तर कंपनीने तुमच्यासाठी हा ऑल इन वन प्लान सादर केला आहे. यात बेस प्लान 222 रुपयांचा आहे. यात तुम्हाला 2 जीबी डेटा रोज मिळेल आणि याची वैधता 28 दिवस आहे. अर्थात तुम्ही 56 जीबी डेटा वापरू शकता. जियो टू जियो कॉलिंग अनलिमिटेड फ्री आहे आणि दुसऱ्या नेटवर्क साठी तुम्हाला 1,000 मिनटे मिळतील.

Jio 333 रुपयांचा प्लान: दुसरा प्लान 56 दिवसांसाठी आहे. यात पण तुम्हाला 2 जीबी डेटा रोज मिळेल. 56 दिवसांत 112जीबी 4जी डेटा तुम्ही वापरू शकता. त्याचबरोबर दुसऱ्या नेटवर्क वर तुम्हाला 1,000 मिनिटांची कॉलिंग फ्री मिळेल. तसेच जियो टू जियो अनलिमिटेड कॉलिंग फ्री असेल.

Jio 444 रुपयांचा प्लान: कंपनीने 4जी स्मार्टफोन साठी ऑल इन वन अंतर्गत चौथा प्लान 444 रुपयांचा सादर केला आहे. या प्लानची वैधता 84 दिवसांची म्हणजे जवळपास तीन महिन्यांची आहे आणि यात पण तुम्हाला 2 जीबी डेटा रोज दिला जाईल. तुम्ही 84 दिवसांत 168 जीबी 4जी डेटा वापरू शकता. राहिला प्रश्न कॉलिंगचा तर यात पण दुसऱ्या नेटवर्क वर 1,000 मिनिटे फ्री कॉलिंग मिळेल आणि जियो टू जियो अनलिमिटेड कॉलिंग फ्री आहे.

Jio 555 रुपयांचा प्लान: जर तुम्हाला जास्त डेटा सह दुसऱ्या नेटवर्क वर जास्त कॉलिंग हवी असेल तर तुमच्यासाठी 555 रुपयांचा प्लान आहे. यात तुम्हाला रोज 2जीबी डेटा सह 3,000 मिनिटांची कॉलिंग मिळते. हा प्लान 84 दिवसांसाठी वैध आहे.

अतिरिक्त कॉलिंग साठी कोणते प्लान आहेत

जर दुसऱ्या नेटवर्क वर कॉलिंग तुम्ही जास्त करत असाल तर अतिरिक्त कॉलिंग साठी पण प्लान देण्यात आले आहेत. यासाठी कंपनीने 10 रुपयांपासून 100 रुपयांपर्यंतचे टॉप अप वाउचर दिले आहेत. 10 रुपयांच्या प्लान मध्ये दुसऱ्या नंबर वर 124 मिनिटे कॉलिंग देण्यात आली आहे. तर 20 रुपयांच्या प्लान मध्ये 249 मिनिटे, 50 रुपयांच्या प्लान मध्ये 656 मिनिटे आणि 100 रुपयांच्या प्लान मध्ये 1,362 मिनिटे कॉलिंग उपलब्ध आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here