Electric Cycle - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 10 Mar 2023 05:05:33 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 वॉटर प्रूफ बॅटरीसह आल्या हिरोच्या 2 नव्या इलेक्ट्रिक सायकल; किंमत देखील परवडणारी https://www.91mobiles.com/marathi/hero-lectro-launches-new-h3-and-h5-electric-cycles-with-30km-range-price-sale-detail/ https://www.91mobiles.com/marathi/hero-lectro-launches-new-h3-and-h5-electric-cycles-with-30km-range-price-sale-detail/#respond Mon, 07 Nov 2022 07:33:15 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=14653 Hero Electric Cycle Launch: भारतीय बाजारात इलेक्ट्रिक स्कूटर, बाइक आणि कार सोबतच सायकलची मागणी वाढत आहे. हे पाहून भारतात इलेक्ट्रिक सायकल सेगमेंट मधील सर्वात मोठी कंपनी हीरो लेक्ट्रो (Hero Lectro) वेळावेळी ई-सायकलचे नवनवीन मॉडेल लाँच करत असते. आता कंपनीनं दोन नवीन ई-सायकल H3 आणि H5 भारतीय बाजारात लाँच केल्या आहेत. या दोन्ही ई-सायकलची खासियत म्हणजे […]

The post वॉटर प्रूफ बॅटरीसह आल्या हिरोच्या 2 नव्या इलेक्ट्रिक सायकल; किंमत देखील परवडणारी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Hero Electric Cycle Launch: भारतीय बाजारात इलेक्ट्रिक स्कूटर, बाइक आणि कार सोबतच सायकलची मागणी वाढत आहे. हे पाहून भारतात इलेक्ट्रिक सायकल सेगमेंट मधील सर्वात मोठी कंपनी हीरो लेक्ट्रो (Hero Lectro) वेळावेळी ई-सायकलचे नवनवीन मॉडेल लाँच करत असते. आता कंपनीनं दोन नवीन ई-सायकल H3 आणि H5 भारतीय बाजारात लाँच केल्या आहेत. या दोन्ही ई-सायकलची खासियत म्हणजे या GEMTEC पावर्ड आहेत. चला जाणून घेऊया या इलेक्ट्रिक सायकलची किंमत, रेंज आणि स्पेसिफिकेशन्सची संपूर्ण माहिती.

Hero H3 and H5 Electric Cycle Price

प्राइस पाहता कंपनीनं H3 इलेक्ट्रिक सायकल 27,499 रुपये आणि H5 ई-सायकल 28,499 रुपयांमध्ये सादर केली आहे. तसेच, कलर ऑप्शन पाहता H3 दोन कलर ऑप्शन ब्लिसफुल ब्लॅक-ग्रीन आणि ब्लेजिंग ब्लॅक-रेड मध्ये सादर करण्यात आल्या आहेत. तसेच H5 सायकल ग्रूवी ग्रीन आणि ग्लोरियस ग्रे कलरमध्ये विकत घेता येईल. हे देखील वाचा: BSNL बंद करणार आहे 75 दिवस वॅलिडिटी असलेला प्लॅन; लवकरच घ्या फायदा

Hero H3 आणि H5 Electric Cycle ची वैशिष्ट्ये

वर सांगितल्याप्रमाणे दोन्ही ई-सायकल GEMTEC पावर्ड आहेत. GEMTEC मटेरियलपासून बनवण्यात आल्या आहेत, त्यामुळे या इलेक्ट्रिक सायकल मजबूत तर होतातच परंतु यांचं वजन वाढत नाही, त्या हलक्या असतात. या GEMTEC ई-सायकल्स कंपनीच्या D2C वेबसाइटसह हीरो लेक्ट्रोच्या 600 पेक्षा डीलर्सच्या नेटवर्क, ई-कॉमर्स साइट्सवर विकल्या जात आहेत. इतकेच नव्हे तर देशातील सर्वात मोठ्या शहरामधील कंपनीच्या स्पेशल एक्सपीरियंस सेंटरवरून देखील या विकत घेता येतील. हीरो लेक्टरोचे एक्सपीरियंस सेंटर दिल्ली, कोलकाता आणि चेन्नईमध्ये आहेत. हे देखील वाचा: 200MP कॅमेऱ्यासह येईल Samsung Galaxy S23 Ultra; संपूर्ण Galaxy S23 सीरीजच्या लाँच डेटचा खुलासा

मिळेल 30km ची रेंज

हीरो लेक्ट्रो H3 आणि H5 इलेक्ट्रिक सायकल एकदा चार्ज केल्यावर 30km अंतर पार करू शकतात. म्हणजे कमी अंतरावरील कामे पूर्ण करण्यासाठी ही एक शानदार सायकल म्हणता येईल. ऑफिस ट्रॅव्हल, शॉपिंग किंवा व्यायामासाठी देखील या सायकल्सचा वापर करता येईल. या दोन्ही सायकलमध्ये एक LED डिस्प्ले आहे, ज्यात स्पीड, बॅटरी आणि अन्य इंडिटेक्टर दिसतात. सायकलमध्ये 250W बीएलडीसी रियर हब मोटर आहे, जी मॅक्सिमम ताशी 25 किमीचा टॉप स्पीड गाठू शकते. तसेच, यात IP67 ली-आयन 5.8Ah इंट्यूब बॅटरी आहे, जी 4 तासांत पूर्णपणे चार्ज होते आणि वॉटरप्रूफ आहे.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

The post वॉटर प्रूफ बॅटरीसह आल्या हिरोच्या 2 नव्या इलेक्ट्रिक सायकल; किंमत देखील परवडणारी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/hero-lectro-launches-new-h3-and-h5-electric-cycles-with-30km-range-price-sale-detail/feed/ 0
पेडल न मारताच ही सायकल चालेल 115km; Decathlon ची दमदार इलेक्ट्रिक सायकल लाँच https://www.91mobiles.com/marathi/decathlon-electric-cycle-launch-price-range-sale-photos/ https://www.91mobiles.com/marathi/decathlon-electric-cycle-launch-price-range-sale-photos/#respond Fri, 14 Oct 2022 07:28:37 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=13990 Decathlon Electric Cycle: महागड्या पेट्रोलच्या किंमतींमुळे इलेक्ट्रिक सायकल (Electric Cycle) च्या मागणी वाढू लागली आहे. त्यामुळे आता लोकप्रिय स्पोर्ट्स ब्रँड Decathlon नं आपली इलेक्ट्रिक सायकल बाजारात सादर केली आहे. डेकाथलॉननं युरोपमध्ये ही नवीन इलेक्ट्रिक सायकल सादर केली आहे, जिला Decathlon Elops LD500E e-bicycle असं नाव देण्यात आलं आहे. ही ई-बाइक सध्या युरोपात फ्रांस आणि जर्मनीमध्ये […]

The post पेडल न मारताच ही सायकल चालेल 115km; Decathlon ची दमदार इलेक्ट्रिक सायकल लाँच first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Decathlon Electric Cycle: महागड्या पेट्रोलच्या किंमतींमुळे इलेक्ट्रिक सायकल (Electric Cycle) च्या मागणी वाढू लागली आहे. त्यामुळे आता लोकप्रिय स्पोर्ट्स ब्रँड Decathlon नं आपली इलेक्ट्रिक सायकल बाजारात सादर केली आहे. डेकाथलॉननं युरोपमध्ये ही नवीन इलेक्ट्रिक सायकल सादर केली आहे, जिला Decathlon Elops LD500E e-bicycle असं नाव देण्यात आलं आहे. ही ई-बाइक सध्या युरोपात फ्रांस आणि जर्मनीमध्ये उपलब्ध आहे. भारतात ही सायकल कधी लाँच होईल याची अधिकृत माहिती मात्र कंपनीनं दिली नाही. पुढे आम्ही तुम्हाला या ई-सायकलच्या किंमत, रेंज आणि फीचर्सची माहिती दिली आहे.

Decathlon Elops LD500E electric bicycle

Decathlon Elops LD500E electric bicycle ची फ्रेम 6061 अ‍ॅल्युमीनियमपासून बनवण्यात आली आहे आणि हिचे वजन 23 किलो आहे. या सायकलच्या हँडलबारवर एक एलसीडी डिस्प्ले पॅनल देण्यात आला आहे, ज्यात बॅटरी चार्ज लेव्हल दाखवली जाते. तसेच डिस्प्लेचा वापर तीन पावर लेव्हल किंवा वॉक असिस्टंट मोड पैकी एक निवडण्यासाठी करता येईल. हे देखील वाचा: सर्वांना परवडेल अशा किंमतीत येतोय Moto E22s; तारीख ठरली, जाणून घ्या किंमत

Decathlon electric cycle launch price range sale photos

Decathlon electric bicycle चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

इलेक्ट्रिक बाइकची 504 Wh बॅटरी 115 किमी (71 माइल्स) पर्यंतची सिंगल चार्ज रेंज देऊ शकते आणि ही जवळपास 7 तासांमध्ये पूर्णपणे चार्ज करता येते. यात 1×8 स्पीड ट्रांसमिशन आणि बॉटम ब्रॅकेटमध्ये एका टॉर्क सेन्सरचा समावेश करण्यात आला आहे, 250 वॉट मोटर 45 एनएम पर्यंत पावर मिळते.

Decathlon electric cycle launch price range sale photos

तसेच यात एक यूएसबी कनेक्टर मिळतो जो तुम्हाला सायकलवर असताना गॅजेट चार्ज करण्यास मदत करतो. BLUELINE AXA TEKTRO TKD32 हाइड्रोलिक डिस्क ब्रेकमुळे कमी अंतरावर सायकल थांबवता येते. या सायकलच्या टायर्सवर लाइट्स आणि रिफ्लेक्टर स्ट्रिप्स देखील आहेत त्यामुळे हिची व्हिजिबलीटी वाढते. अपघात टाळता यावे म्हणून कंपनीनं हे फीचर्स जोडले आहेत. हे देखील वाचा: जबरदस्त iQOO Neo7 ची लाँच डेट समजली; MediaTek Dimensity 9000+ चिपसेटसह मिळेल 120W चार्जिंग

प्राइस

डेकाथलॉन एलोप्स LD500E ई-बाइकची किंमत 1,649 यूरो (जवळपास 1,32,851 रुपये) आहे. कंपनीच्या मते ही 1.55 ते 1.74 मीटर उंच रायडर्ससाठी, एक लो फ्रेम मॉडेल ग्रे-ग्रीन रंगात S ते M पर्यंतच्या आकारात सादर करण्यात आली आहे. तसेच 1.65 ते 1.95 मीटर उंचीच्या रायडर्ससाठी, M आकारमध्ये एन्थ्रेसाइट ग्रे कलर मध्ये एक हाय-फ्रेम व्हेरिएंट उपलब्ध आहे.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

The post पेडल न मारताच ही सायकल चालेल 115km; Decathlon ची दमदार इलेक्ट्रिक सायकल लाँच first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/decathlon-electric-cycle-launch-price-range-sale-photos/feed/ 0
सिंगल चार्जमध्ये 30KM पेक्षा जास्त रेंजसह आली Hero Lectro C4 इलेक्ट्रिक सायकल https://www.91mobiles.com/marathi/hero-cheapest-electric-cycle-with-30km-range-in-just-5g-mobile-price/ https://www.91mobiles.com/marathi/hero-cheapest-electric-cycle-with-30km-range-in-just-5g-mobile-price/#respond Mon, 26 Sep 2022 07:23:24 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=13436 पेट्रोलचे दर गगनाला भिडले आहेत दरम्यान इलेक्ट्रिक सायकल (Electric Bicycle) सारख्या वाहनांच्या मागणीत वाढ होत आहे. त्यामुळे तुम्ही देखील कमी अंतर पार करण्यासाठी एखादी बॅटरी असलेली सायकल शोधत असाल तर आम्ही तुम्हाला Hero Lectro च्या एका शानदार ई-सायकलची माहिती देणार आहोत. Hero Lectro C4 सायकल ताशी 25 किलोमीटरचा टॉप स्पीड आणि 30 किलोमीटर पेक्षा जास्त […]

The post सिंगल चार्जमध्ये 30KM पेक्षा जास्त रेंजसह आली Hero Lectro C4 इलेक्ट्रिक सायकल first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
पेट्रोलचे दर गगनाला भिडले आहेत दरम्यान इलेक्ट्रिक सायकल (Electric Bicycle) सारख्या वाहनांच्या मागणीत वाढ होत आहे. त्यामुळे तुम्ही देखील कमी अंतर पार करण्यासाठी एखादी बॅटरी असलेली सायकल शोधत असाल तर आम्ही तुम्हाला Hero Lectro च्या एका शानदार ई-सायकलची माहिती देणार आहोत. Hero Lectro C4 सायकल ताशी 25 किलोमीटरचा टॉप स्पीड आणि 30 किलोमीटर पेक्षा जास्त रेंज देते.

Hero ची सर्वात स्वस्त बॅटरी असलेली सायकल

जर तुम्ही रोज 30 किलोमीटर पर्यंतचा प्रवास करत असाल तर पेट्रोल वाहनांपेक्षा इलेक्ट्रिक सायकल एक चांगला ऑप्शन ठरू शकतो. तुम्ही तुमची दैनंदिन कामे पूर्ण करण्यासाठी 1-2 लीटर पर्यंत पेट्रोल खर्च करत असाल तर अशा इलेक्ट्रिक वाहनांमुळे तुमचा पेट्रोलचा खर्च अर्ध्यापेक्षा कमी होईल. चला आता हीरोच्या या सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक सायकलची माहिती जाणून घेऊया. हे देखील वाचा: 5G Launch: 4 दिवसांनी सुरु होणार 5G सर्व्हिस? की त्यापेक्षा जास्त वेळ लागणार, जाणून घ्या

Hero Cheapest Electric Cycle With 30KM Range In Just 5G Mobile Price

Hero Lectro C4 ई-सायकल

ही स्टाइलिश ई-बाइक फक्त मजबूत नव्हे तर डिटॅचेबल बॅटरीसह येते, त्येमुळे ही चार्ज करणं आणि स्वॅप करणं सोपं आहे. ही फुल चार्ज करण्यास जवळपास 4 तासांचा वेळ लागतो. परंतु जर तुमच्याकडे दुसरी फुल चार्ज्ड बॅटरी असेल तर काही मिनिटांत तुम्ही नेक्स्ट ट्रिपसाठी रेडी होऊ शकता. सायकलच्या बॅटरीवर पाणी आणि धुळीचा परिणाम होत नाही कारण ही IP67 सर्टिफाइड आहे.

Hero Cheapest Electric Cycle With 30KM Range In Just 5G Mobile Price

5G मोबाइलच्या किंमतीत इलेक्ट्रिक सायकल

हिरोच्या या इलेक्ट्रिक सायकलची किंमत पाहता कंपनीच्या साइटवरील लिस्टिंगनुसार Hero Lectro C4 ची किंमत फक्त 28,999 रुपये आहे. म्हणजे तुम्हाला एक 5G Smartphone च्या किंमतीत एक इलेक्ट्रिक व्हेईकल विकत घेता येईल. तसेच तुम्ही ही सायकल क्रेडिट कार्डच्या मदतीनं No Cost EMI वर देखील विकत घेऊ शकता. हे देखील वाचा: 7,000mAh च्या दणकट बॅटरीसह नवीन Tecno Mobile ची एंट्री; फोनमध्ये 6GB RAM आणि 16MP Camera

भन्नाट फीचर्स

हीरो लेक्ट्रो सी4 मध्ये हँडलबारवर डावीकडे एक छोटासा वॉटरप्रूफ एलईडी डिस्प्ले यूनिट मिळतो, ज्यात तुम्हाला ऑन बटन आणि हेडलाइट सोबतच लो, मीडियम आणि हाय सारखे राइडिंग मोड दिसतात. तसेच यात ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीची सुविधा देखील तुम्हाला मिळते. तुम्ही हीरो लेक्ट्रो आयस्मार्ट अ‍ॅपच्या माध्यमातून यात राइड स्टेट, राइड ट्रॅकिंग सोबतच कंट्रोल्सचा देखील लाभ घेऊ शकता.

Hero Cheapest Electric Cycle With 30KM Range In Just 5G Mobile Price

हीरो लेक्ट्रो सी4 इलेक्ट्रिक सायकलमध्ये IP67 प्रोटेक्टेड Li-Ion 36 V,5.8Ah (IP67 protection) ची बॅटरी देण्यात आली आहे. जोडीला यात BLDC 36V/250W,40 Nm, Rear Hub Motor मिळते. ही बॅटरी एकदा फुल चार्ज केल्यावर तुम्ही 30 किलोमीटर पेक्षा जास्त रेंज मिळवू शकता. तसेच ही फुल चार्ज होण्यास 4 तास लागतात. हीरो लेक्ट्रो सी4 ताशी 25Kmph चा टॉप स्पीड गाठू शकते.

The post सिंगल चार्जमध्ये 30KM पेक्षा जास्त रेंजसह आली Hero Lectro C4 इलेक्ट्रिक सायकल first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/hero-cheapest-electric-cycle-with-30km-range-in-just-5g-mobile-price/feed/ 0
हे डिवाइस जोडा आणि जुन्या सायकलला चुटकीसरशी बनवा इलेक्ट्रिक! सिंगल चार्जवर 40 किलोमीटरची रेंज; फुल फायर प्रूफ! https://www.91mobiles.com/marathi/dhruv-vidyut-electric-cycle-anand-mahindra/ https://www.91mobiles.com/marathi/dhruv-vidyut-electric-cycle-anand-mahindra/#respond Thu, 01 Sep 2022 06:07:13 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=12692 Electric Vehicle खरेदी करणाऱ्या लोकांची संख्या कमी असली तरी भारतात हे वेड वेगानं वाढत आहे. फक्त Electric Cars नव्हे तर ग्राहक Electric Bike, Electric Scooter सह Electric Cycles देखील विकत घेत आहेत. आता एक अशीच अनोखी Electric Cycle किट समोर आलं आहे ज्याचं कौतुक सर्वच करत आहेत. या विजेवर चालणाऱ्या सायकल किटची निर्मिती एका स्वदेशी […]

The post हे डिवाइस जोडा आणि जुन्या सायकलला चुटकीसरशी बनवा इलेक्ट्रिक! सिंगल चार्जवर 40 किलोमीटरची रेंज; फुल फायर प्रूफ! first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Electric Vehicle खरेदी करणाऱ्या लोकांची संख्या कमी असली तरी भारतात हे वेड वेगानं वाढत आहे. फक्त Electric Cars नव्हे तर ग्राहक Electric Bike, Electric Scooter सह Electric Cycles देखील विकत घेत आहेत. आता एक अशीच अनोखी Electric Cycle किट समोर आलं आहे ज्याचं कौतुक सर्वच करत आहेत. या विजेवर चालणाऱ्या सायकल किटची निर्मिती एका स्वदेशी माणसाने केली आहे. जी जास्त पैसे खर्च न करता किंवा मेहनत न करता साध्य सायकलला इलेक्ट्रिक सायकल बनवू शकते.

गुरसौरभ सिंह नावाच्या एका व्यक्तीनं या अनोख्या डिवायसचा शोध लावला जो कोणत्याही सायकलला इलेक्ट्रिक सायकलमध्ये रूपांतरित करू शकतो. Gursaurabh Singh च्या या डिवायस तसेच इनोव्हेशनचं कौतुक उद्योगपती आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी केलं आहे आणि त्यांनी ट्वीट करून या प्रोजेक्टमध्ये गुंतवणूक करण्याचा मानस व्यक्त केला आहे. गुरसौरभ यांनी Dhruv Vidyut नावाचं एक स्टार्टअप सुरु केलं आहे आणि सायकलला इलेक्ट्रिक पावर देणारं एक किफायतशीर आणि शानदार डिवायस बनवलं आहे. हे देखील वाचा: 150KM च्या जबरदस्त रेंजसह येतेय Electric Bike; पुढील आठवड्यात होणार लाँच

Dhruv Vidyut E Cycle Indicator

कोणतीही सायकल बनेल Electric Cycle

ध्रुव विद्युत अंतगर्त बनव्यात आलेलं हे टेक सॅव्ही डिवायस एटलस किंवा हीरो, कोणत्याही कंपनीच्या साधारण सायकलला इलेक्ट्रिक सायकलमध्ये रूपांतरित करू शकतं. हे एक कॉम्पेक्ट डिवायस आहे जे सायकलला जोडण्यासाठी मोठे बदल करावे लागत नाहीत. सायकलच्या कोणत्याही भागाची तोडमोड करावी लागत नाही रसिक हे डिवाइस सहज सायकलच्या पेडलच्या वर नट व बोल्टसह बसवता येतं. स्टार्टअपच्या इंस्टाग्राम पेजनुसार या डिवाइसची जोडणी करण्यासाठी फक्त 20 मिनिटांचा कालावधी लागतो.

Dhruv Vidyut E Cycle and Gursaurabh Singh

इलेक्ट्रिक सायकलची खासियत

डिवायस जोडून इलेक्ट्रिक सायकलची निर्मिती केली जाऊ शकते, जी चालवण्यासाठी पेडल मारण्याची देखील गरज नाही. Dhruv Vidhyut Electric Cycle ताशी 25 किलोमीटर वेग देऊ शकते. ही सायकल 170 किलोग्राम पर्यंतचं वजन वाहून नेऊ शकते तसेच फुल चार्जवर 40 किलोमीटर पर्यंतची रेंज देते. विशेष म्हणजे ध्रुव विद्युत डिवायस पूर्णपणे फायर प्रूफ आणि वॉटर प्रूफ आहे तसेच सायकल चिखलात पडल्यास देखील डिवाइसवर काही परिणाम होत नाही. हे देखील वाचा: जुन्या आठवणी होणार ताज्या! रस्त्यावर पुन्हा धावणार LML Scooter; 29 सप्टेंबरला 3 Electric Two-Wheeler घेणार एंट्री

थक्क करणारी बाब म्हणजे ही सायकल चार्ज करण्यासाठी फक्त विजेवर अवलंबुन राहण्याची गरज नाही. सायकलवर 20 मिनिटे पेडल केल्यावर याची बॅटरी आपोआप 50 टक्क्यांपर्यंत चार्ज होऊ शकते. सायकलमध्ये बॅटरी इंडिकेटर देखील आहे जिथे चार्जिंगची टक्केवारी दिसते. या इलेक्ट्रिक सायकलनं तुम्ही तुमचा मोबाइल फोन देखील चार्ज करू शकता. आनंद महिंद्रा यांनी आपल्या ट्वीटर हँडलवर गुरसौरभच्या ध्रुव विद्युत डिवायसचं कौतुक करत ही कल्पना सुधारून बाजारात लाँच करणार असल्याचं म्हटलं आहे.

The post हे डिवाइस जोडा आणि जुन्या सायकलला चुटकीसरशी बनवा इलेक्ट्रिक! सिंगल चार्जवर 40 किलोमीटरची रेंज; फुल फायर प्रूफ! first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/dhruv-vidyut-electric-cycle-anand-mahindra/feed/ 0