200MP कॅमेऱ्यासह येईल Samsung Galaxy S23 Ultra; संपूर्ण Galaxy S23 सीरीजच्या लाँच डेटचा खुलासा

Samsung galaxy S22 Ultra

Samsung Galaxy S23 series launch: सॅमसंग सध्या आपल्या आगामी फ्लॅगशिप स्मार्टफोन सीरीज Samsung Galaxy S23 वर काम करत आहे. सॅमसंगच्या गॅलेक्सी एस23 सीरीज बद्दल बातमी आली आहे की ही पुढील वर्षी फेब्रुवारी 2023 मध्ये लाँच केले जाऊ शकतात. कोरोना व्हायरस प्रभावामुळे 2021 मध्ये कंपनीनं कंपनी आपले फ्लॅगशिप स्मार्टफोन काही आठवडे आधी लाँच केले होते. परंतु इतर वेळी कंपनीनं फेब्रुवारीच्या पहिल्या दोन आठवड्यात नवीन हँडसेट ग्राहकांच्या भेटीला आणले आहेत.

Galaxy S23 सीरीज फेब्रुवारीमध्ये होईल लाँच

दक्षिण कोरिया न्यूज वेबसाइट chosun नं आपल्या एक्सक्लूसिव्ह रिपोर्टमध्ये कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हवाल्याने सांगितलं आहे की सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स पुढील वर्षी फेब्रुवारी (Samsung Galaxy S23 series will be launched in February 2023) मध्ये आपले आगामी प्रोडक्ट लाँच करण्यासाठी सॅन फ्रांसिस्कोमध्ये Galaxy Unpacked इव्हेंटचं आयोजन करण्याची योजना बनवत आहे. नेहमीप्रमाणे यंदाही कंपनी आपले फ्लॅगशिप प्रोडक्टस एकाच इव्हेंटमध्ये लाँच करते. त्यामुळे यंदाही Galaxy S23 सीरीज फेब्रुवारी 2023 मध्ये लाँच केली जाईल. हे देखील वाचा: 49 रुपयांमध्ये 5 OTT अ‍ॅप्सचं सब्सस्क्रिप्शन; Dish TV नं आणले चार नवीन प्लॅन, सर्वांना येणार वापरता

सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स आपली Galaxy S सीरीज मार्च महिन्यात लाँच करत होती. परनु बाजारातील स्पर्धा वाढली आहे नव्या कंपन्या नवीन फ्लॅगशिप प्रोसेसरसह स्मार्टफोन सादर करत आहेत. त्यामुळे कंपनीनं नवीन प्रोडक्टची रिलीज डेट मागे खेचली आहे. रिपोर्टनुसार, दरवर्षी स्मार्टफोन मार्केटमध्ये सुमारे 10 टक्के घसरण होत आहे. त्यामुळे कंपनी अ‍ॅडव्हान्समध्ये प्रोडक्ट लाँच करून शक्य तितका नफा कमवू पाहत आहे.

तीन मॉडेल होतील लाँच

सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स हळूहळू आपल्या अपकमिंग लाँच Galaxy S23 सीरीजच्या कॅमेरा, बॅटरी आणि प्रोसेसर बद्दल माहिती शेयर करण्यावर जोर देत आहे. सॅमसंग या सीरीजचे तीन स्मार्टफोन Galaxy S23, S23 Plus, आणि S23 Ultra लाँच करू शकते. तसेच काही रिपोर्ट्समध्ये सांगितलं जात आहे आगामी Galaxy S23 आणि S23 Plus स्मार्टफोनचे कर्व्ड कॅमेरा मॉड्यूल डिजाइन बदलून Galaxy S22 Ultra सारखी केली जाऊ शकते. हे देखील वाचा: 13 हजारांच्या Redmi Note 12 5G च्या भारतीय लाँचबद्दल मोठा खुलासा; वेबसाइटवर झाला लिस्ट

200MP चा कॅमेरा

सॅमसंगच्या अपकमिंग Galaxy S23 सीरीजमध्ये Qualcomm चा Snapdragon 8 2nd generation प्रोसेसर मिळू शकतो. काही रिपोर्ट्समध्ये दावा केला जात आहे की ही सीरिज कंपनीच्या Exynos 2300 सह सादर केली जाऊ शकते. तसेच सॅमसंगच्या प्रीमियम फ्लॅगशिप स्मार्टफोनमध्ये 200-मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा असल्याचा दावा केला जात आहे.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here