Google Pixel 3A XL - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 31 May 2019 11:07:31 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 डुअल पंच-होल सेल्फी कॅमेऱ्यासह लीक झाला Google Pixel 4, फोन असेल Samsung Galaxy S10+ पेक्षा पण जास्त ताकदवान https://www.91mobiles.com/marathi/google-pixel-4-screen-protector-dual-punch-hole-selfie-camera-leaked/ https://www.91mobiles.com/marathi/google-pixel-4-screen-protector-dual-punch-hole-selfie-camera-leaked/#respond Fri, 31 May 2019 11:07:31 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4474 Pixel 4 च्या बेस मॉडल मध्ये सिंगल पंच-होल कॅमेरा दिला जाऊ शकतो.

The post डुअल पंच-होल सेल्फी कॅमेऱ्यासह लीक झाला Google Pixel 4, फोन असेल Samsung Galaxy S10+ पेक्षा पण जास्त ताकदवान first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
टेक दिग्गज Google ने अलीकडेच आपल्या Pixel डिवाईसचे स्वस्त वर्जन Pixel 3a आणि Pixel 3a XL लॉन्च केले आहेत. हे दोन्ही स्मार्टफोन Pixel 3 आणि Pixel 3 XL चे डाउनग्रेडिड वर्जन आहे जे मीड बजेट मध्ये उतरवण्यात आले आहेत. या दोन्ही स्मार्टफोन व्यतिरिक्त Google च्या Pixel सीरीजच्या नेक्स्ट जेनरेशन स्मार्टफोन Pixel 4 बद्दल पण अनेक दिवसांपासून लीक्स समोर येत आहेत. वेगवेगळ्या मीडिया रिपोर्ट्स मध्ये Pixel 4 च्या लुक, डिजाईन, फीचर्स व स्पेसिफिकेशन्स संबंधित बरीच माहिती समोर आली आहे. आता Pixel 4 चा स्क्रीन प्रोटेक्टर इंटरनेट वर लीक झाला आहे. हा स्क्रीन प्रोटेक्टर समोर आल्याने पुन्हा एकदा Pixel 4 च्या डिजाईनचा खुलासा झाला आहे.

Google Pixel 4 चा हा स्क्रीन प्रोटेक्टर बनवणाऱ्या कंपनी skinomi ने आपल्या वेबसाइट वर हा लिस्ट केला आहे. स्क्रीन प्रोटेक्टर वेबसाइट वर उपलब्ध करण्यासोबतच या कंपनीने याच्या स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स बद्दल पण सांगितले आहे. या स्क्रीन प्रोटेक्टर मध्ये Pixel 4 च्या स्पीकर आणि कॅमेरा सेंसर साठी वेगळे होल बनवण्यात आले आहेत, ज्यामुळे फोनच्या फ्रंट पॅनल आणि याच्या डिजाईनची माहिती मिळाली आहे.

Pixel 4 च्या या स्क्रीन प्रोटेक्टर मध्ये वर उजवीकडे कर्व्ड ऐज वाला आयताकार आहे. हा आयताकार होल फोनच्या फ्रंट पॅनल वरील कॅमेरा सेंसर साठी बनवण्यात आला आहे ज्याने स्पष्ट झाले आहे कि Google Pixel 4 च्या फ्रंट पॅनल वर डिस्प्लेच्या वर कॅमेरा सेंसर दिले जातील. तसेच होलच्या डिजाईन मुळे हे पण स्पष्ट झाले कि Pixel 4 एक नाही तर सोन सेल्फी कॅमेरा सेंसर्स सह येईल. हे दोन्ही ही कॅमेरा सेंसर फोन बॉडी वर नव्हे तर डिस्प्लेच्या वर असतील.

तुमच्या लक्षात असेलच कि अशीच फ्रंट कॅमेरा डिजाईन Samsung च्या Galaxy S10 Plus मध्ये पण होती. सॅमसंगने या कॅमेरा डिजाईनला इनफिनिटी ओ डिस्प्लेचे नाव दिले होते. तर इतर टेक कंपन्या डिस्प्ले वरील सेल्फी कॅमेऱ्याला पंच-होल डिस्प्ले पण म्हणतात. दोन सेल्फी कॅमेरा सेंसर्स बघून म्हणता येईल कि हा स्क्रीन प्रोटेक्टर Google Pixel 4 च्या हाईयर मॉडेलचा असू शकतो. तर Pixel 4 च्या बेस मॉडल मध्ये सिंगल पंच-होल कॅमेरा दिला जाऊ शकतो.

एंडरॉयड क्यू
Google ने टेक बाजारात एंडरॉयडची लेटेस्ट ऑपरेटिंग सिस्टम Android Q सादर केली आहे. गूगल आपले Pixel डिवाईसेज लेटेस्ट एंडरॉयड ओएस सह बाजारात आणते. त्यामुळे कंपनी द्वारा लॉन्च केले जाणाऱ्या आगामी स्मार्टफोन Pixel 4 मध्ये पण एंडरॉयडची हि नवीन एंडरॉयड ऑपरेटिंग सिस्टम असेल.

स्पेसिफिकेशन्स
Google Pixel 4 चे स्पेसिफिकेशन्स पाहता आता पर्यंत समोर आलेल्या लीक्स नुसार हा फोन 6जीबी रॅम सह लॉन्च केला जाईल. Pixel 4 चे वेगवेगळे मॉडेल वेगवेगळ्या रॅम सह येतील. तसेच प्रोसेसिंग साठी गूगल आपला नवीन फोन क्वालकॉमच्या सर्वात पावरफुल चिपसेट स्नॅपड्रॅगॉन 855 सह बाजारात आणेल. Google Pixel 4 मध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट पण मिळू शकतो. बेंचमार्किंग स्कोर बद्दल बोलायचे तर गीकबेंचने या फोनला सिंगल-कोर टेस्ट मध्ये 744 आणि मल्टी-कोर टेस्ट मध्ये 3201 स्कोर दिला आहे.

The post डुअल पंच-होल सेल्फी कॅमेऱ्यासह लीक झाला Google Pixel 4, फोन असेल Samsung Galaxy S10+ पेक्षा पण जास्त ताकदवान first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/google-pixel-4-screen-protector-dual-punch-hole-selfie-camera-leaked/feed/ 0
Google Pixel 3a आणि Pixel 3a XL झाले लॉन्च, बघा यात काय आहे खास https://www.91mobiles.com/marathi/google-pixel-3a-pixel-3a-xl-officially-launched-india-price-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/google-pixel-3a-pixel-3a-xl-officially-launched-india-price-specifications/#respond Wed, 08 May 2019 10:40:33 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4266 शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वर विकत घेता येतील.

The post Google Pixel 3a आणि Pixel 3a XL झाले लॉन्च, बघा यात काय आहे खास first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
अनेक दिवसांपासून चर्चा होती कि गूगल पिक्सल सीरीज वाढवणार आहे आणि या अंतर्गत स्वस्त पिक्सल फोन लॉन्च केले जातील. या नवीन पिक्सल फोन्सची नावे पण समोर आली होती, ज्यांना Pixel 3a आणि Pixel 3a XL नाव देण्यात आले होते. आज सर्व लीक्सना उत्तर देत आणि आपल्या फॅन्सची उत्सुकता शांत करत Google ने नवीन पिक्सल स्मार्टफोन्स सादर केले आहेत. कंपनीने Pixel 3a आणि Pixel 3a XL टेक मंचावर लॉन्च केले आहेत.

गूगलने आज अमेरिकेतील सॅन फ्रांस्सिको मध्ये Google I/O 2019 चे आयोजन केले होते. याच मंचावरून Android Q, Google Assistant आणि टेक विश्‍वासंबंधित अनेक मोठ्या घोषणां सोबत गूगल ने नवीन पिक्सल स्मार्टफोन Pixel 3a आणि Pixel 3a XL पण लॉन्च केले आहेत. गूगलने हे दोन्ही स्मार्टफोन ग्लोबल मंचावर लॉन्च केले आहेत जे आगामी काही दिवसांत भारतात सेल साठी उपलब्ध होतील. शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वर विकत घेता येतील.

किंमत
Google Pixel 3a = 39,999
Google Pixel 3a XL = 44,999

डिजाईन
गूगलने नवीन पिक्सल डिवाईस Pixel 3a आणि Pixel 3a XL पिक्सल 3 सारख्या लुक वर सादर केले आहेत. हे दोन्ही स्मार्टफोन बेजल लेस डिस्प्ले सह लॉन्च झाले आहेत ज्यात कोणतीही नॉच नाही. दोन्ही फोन मॉडेल्स ग्लॉस बॉडी वर सादर करण्यात आले आहेत. डिस्प्लेच्या बाजूचे किनारे बेजल लेस आहेत तर वर आणि खालच्या बाजूला बारीक बॉडी पार्ट देण्यात आला आहे. Pixel 3a आणि Pixel 3a XL सिंगल रियर कॅमेर्‍याला सपोर्ट करतात ज्यात कॅमेरा सेंसर सोबत फ्लॅश लाईट पण देण्यात आली आहे.

Pixel 3a आणि Pixel 3a XL दोन्ही मॉडेल्सच्या बॅक पॅनल वर सिक्योरिटी साठी रियर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे. फोनच्या उजव्या पॅनल वर वॉल्यूम रॉकर आणि पावर बटण आहे. तसेच डाव्या पॅनल वर सिम स्लॉट आहे. हे दोन्ही स्मार्टफोन यूएसबी टाईप सी पोर्टला सपोर्ट करतात जो फोनच्या खालच्या पॅनल वर आहे. यूएसबी पोर्टच्या दोन्ही बाजूंन स्पीकर्स देण्यात आले आहेत. 3.5एमएम आडियो जॅक फोनच्या वरच्या पॅनल वर आहे.

स्पेसिफिकेशन्स
Google ने Pixel 3a 18.5:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला आहे. हा फोन 2220 X 1080 पिक्सल रेज्ल्यूशन वाली 5.6-इंचाच्या फुलएचडी+ जीओएलईडी डिस्प्लेला सपोर्ट करतो. तसेच Pixel 3a XL कंपनी द्वारा 18:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर करण्यात आला आहे तसेच या फोन मॉडेल मध्ये 2160 X 1080 पिक्सल रेज्ल्यूशन वाला 6-इंचाचा फुलएचडी+ जीओएलईडी डिस्प्ले देण्यात आला आहे.

Pixel 3a आणि Pixel 3a XL एंडरॉयड 9.0 पाई वर सादर करण्यात आले आहेत जे लवकरच एंडरॉयडच्या नवीन ओएस एंडरॉयड क्यू वर अपडेट होतील हे दोन्ही स्मार्टफोन मॉडेल 64बिट आक्टा-कोर प्रोसेसरला सपोर्ट करतात. सोबत क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगन 670 चिपसेट वर चालतात. तसेच ग्राफिक्स साठी या दोन्ही पिक्सल मॉडेल्स मध्ये एड्रेनो 615 जीपीयू देण्यात आला आहे.

Google ने Pixel 3a आणि Pixel 3a XL 4जीबी रॅम सह सादर केले आहेत. हे दोन्ही स्मार्टफोन मॉडेल 64जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतात.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Pixel 3a आणि Pixel 3a XL दोन्ही सिंगल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतात. फोनच्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह एफ/1.8 अपर्चर वाला 12.2 मेगापिक्सलचा सोनी आईएमएक्स363 कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. अशाप्रकारे सेल्फी साठी हा फोन एफ/2.0 अपर्चर वाल्या 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

Pixel 3a आणि Pixel 3a XL मध्ये सिक्योरिटी आणि फोन अनलॉकिंग साठी रियर फिंग​रप्रिंट सेंसर देण्यात आला आहे. तसेच पावर बॅकअप साठी Pixel 3a मध्ये 3,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे तर Pixel 3a XL 3,700एमएमएच बॅटरीला सपोर्ट करतो. गूगल ने Pixel 3a आणि Pixel 3a XL जस्ट ब्लॅक आणि क्लीयर वाईट कलर मध्ये लॉन्च केले आहेत.

प्राइस, लॉन्च तारीख
एक्सपेक्टेड प्राइस: रु. 39,999
रिलीजची तारीख: May 15, 2019 (अनौपचारिक)
वेरियंट: 4 जीबी रॅम / 64 जीबी इंटरनल स्टोरेज
फोनची स्थिती: येणार आहे

The post Google Pixel 3a आणि Pixel 3a XL झाले लॉन्च, बघा यात काय आहे खास first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/google-pixel-3a-pixel-3a-xl-officially-launched-india-price-specifications/feed/ 0
Google Pixel 3a आणि Pixel 3a XL फ्लिपकार्ट वर झाले लिस्ट, 8 मे ला भारतात होतील लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/google-pixel-3a-3a-xl-launch-8th-may-in-india-flipkart/ https://www.91mobiles.com/marathi/google-pixel-3a-3a-xl-launch-8th-may-in-india-flipkart/#respond Wed, 01 May 2019 13:21:59 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4196 8 मे ला भारतात हे दोन्ही स्मार्टफोन लॉन्च होण्याची पूर्णपणे शक्यता आहे. तर फोन सेलची माहिती लॉन्च नंतर मिळेल.

The post Google Pixel 3a आणि Pixel 3a XL फ्लिपकार्ट वर झाले लिस्ट, 8 मे ला भारतात होतील लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
गूगलने घोषणा केली आहे कि कंपनी आपल्या पिक्सल सीरीज मध्ये मोठे बदल करणार आहे. अनेक दिवसांपासून बातम्या येत होत्या कि गूगल आता हाईएंड फ्लॅगशिप सेग्मेंट पासून दूर जात पिक्सल डिवाईस लॉन्च करेल. कंपनी येत्या 7 मे ला आपला स्वस्त पिक्सल फोन लॉन्च करेल ज्यात Pixel 3a आणि Pixel 3a XL यांचा समावेश असेल. तर आज इंडियन स्मार्टफोन यूजर्सना खुशखबर देत गूगलच्या स्वस्त पिक्सल फोनची इंडिया लॉन्च डेट पण समोर आली आहे. अंर्तराष्ट्रीय लॉन्च सोबत 8 मे ला Google चे नवीन पिक्सल फोन इंडियन बाजारात येतील. शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वर पण गूगल ईवेंट बद्दल प्रोडक्ट पेज बनवण्यात आले आहे.

लॉन्च डिटेल
Google ने कही दिवसांपूर्वी टीजर रिलीज करून सांगितले होते कि 7 मे ला कंपनी ‘पिक्सल यूनिवर्स मध्ये मोठा बदल करणार आहे. विशेष म्हणजे याच दिवशी अमेरिकेतील सॅनफ्रांसिस्को मध्ये Google I/O ची सुरवात केली जात आहे, ज्यात गूगल कडून सॉफ्टवेयर, अॅप्स व एंडरॉयडच्या क्षेत्रात नवीन घोषणा केल्या जातील. याच ईवेंटच्या मंचावरून कंपनी ने स्वस्त पिक्सल फोन पण बाजारात येतील.

तसेच भारतात शॉपिंग साइट फ्लिपकार्ट ने गूगल साठी प्रोडक्ट पेज बनवून या नवीन पिक्सल डिवाईसेजच्या इंडिया लॉन्चची स्थिती पण स्पष्ट केली आहे. फ्लिपकार्ट वर 8 मे च्या तारखे सोबत ‘सोबत रहा’ लिहिण्यात आले आहे. गूगलच्या स्वस्त पिक्सल फोन बद्दल बोलले जात आहे की यात Pixel 3a आणि Pixel 3a XL यांचा समावेश असेल. 8 मे ला भारतात हे दोन्ही स्मार्टफोन लॉन्च होण्याची पूर्णपणे शक्यता आहे. तर फोन सेलची माहिती लॉन्च नंतर मिळेल.

हे देखील वाचा: Vivo Y95 आणि Y91 च्या किंमतीत झाली मोठी कपात, बघा नवीन किंमत

स्पेसिफिकेशन्स
आता पर्यंत आलेल्या लीक्स नुसार गूगल Pixel 3a मध्ये 5.6-इंचाची स्क्रीन दिली जाऊ शकते तसेच Pixel 3a XL मध्ये 6-इंचाचा डिस्प्ले मिळू शकतो. हे दोन्ही फोन क्लियरली वाइट, जस्ट ब्लॅक आणि बियॉन्ड ब्लॅक एंड वाइट मध्ये लॉन्च केले जाऊ शकतात. पिक्सल 3ए मध्ये एक्टिव एज, टाइटन एम सिक्यॉरिटी चिप आणि ई-सिम सारखे फीचर्स असतील. लीक नुसार पिक्सल 3 च्या लाइट वर्जन गूगल द्वारा 4जीबी रॅम सह लॉन्च केला जाऊ शकतो. तसेच फोन मध्ये 32जीबी व 64जीबी स्टोरेज दिली जाऊ शकते.

रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले आहे की या स्मार्टफोन्सची कॅमेरा परफॉर्मेंस Pixel 3a आणि Pixel 3a XL सारखी असेल. म्हणजे कंपनी लाइट वर्जन मध्ये पण कॅमेरा क्वॉलिटीशी तडजोड करणार नाही. फोटोग्राफी सेग्मेंट बद्दल बोलायचे झाल्यास लीक नुसार Pixel 3a च्या बॅक पॅनल वर एफ/1.8 अपर्चर वाला 12-मेगापिक्सलचा रियर कॅमेरा दिला जाईल तसेच सेल्फी साठी या फोन मध्ये 8-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळेल. पावर बॅकअप साठी फोन मध्ये 2,915एमएएच ची बॅटरी असल्याची बातमी या लीक मध्ये सांगण्यात आली आहे.

हे देखील वाचा: Samsung Galaxy S10 5G model मध्ये लागली ​आग, यूजरचे झाले मोठे नुकसान

किंमत
विशेष म्हणजे गेल्याच आठवड्यात इंटरनेट वर Pixel 3a आणि Pixel 3a XL च्या प्राइज संबंधित लीक पण समोर आला होता. या लीक मध्ये सांगण्यात आले होते कि पिक्सल 3ए 490 यूएस डॉलर पर्यंतच्या किंमतीत लॉन्च केला जाऊ शकतो या किंमतीचा फोन 64जीबी स्टोरेज वेरिएंट सह येईल. तसेच पिक्सल 3ए एक्सएल च्या 64जीबी वेरिएंटची किंमत या लीक मध्ये 600 यूएस डॉलर सांगण्यात आली होती. या किंमती भारतीय करंसी नुसार क्रमश: 34,000 रुपये तसेच 41,000 रुपयांच्या आसपास असतिल.

The post Google Pixel 3a आणि Pixel 3a XL फ्लिपकार्ट वर झाले लिस्ट, 8 मे ला भारतात होतील लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/google-pixel-3a-3a-xl-launch-8th-may-in-india-flipkart/feed/ 0
लॉन्चच्या आधी आली गूगल पिक्सल 3ए आणि 3ए एक्सएल ची किंमत, बघा किती स्टाइलिश आहे हा फोन https://www.91mobiles.com/marathi/google-pixel-3a-and-pixel-3a-xl-price-storage-and-colors-details/ https://www.91mobiles.com/marathi/google-pixel-3a-and-pixel-3a-xl-price-storage-and-colors-details/#respond Thu, 28 Mar 2019 17:47:10 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3958 पिक्सल 3ए च्या किंमतीचा खुलासा झाला आहे, जी €450 (जवळपास 34,950 रुपये) असेल

The post लॉन्चच्या आधी आली गूगल पिक्सल 3ए आणि 3ए एक्सएल ची किंमत, बघा किती स्टाइलिश आहे हा फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
सर्च इंजन कंपनी गूगल पहिल्यांदा आपल्या पिक्सल सीरीज मध्ये स्वस्त स्मार्टफोन लॉन्च कारण्याची तयारी करत आहे. हे दोन्ही डिवाइस कंपनी मार्केट मध्ये पिक्सल 3ए आणि 3ए एक्सएल नावाने सादर करेल, ज्याबद्दल काही दिवसांपूर्वी माहिती समोर आली होती. हे आगामी स्मार्टफोन मॉडेल्स गूगल द्वारा पिक्सल स्मार्टफोन पेक्षा कमी किंमतीत लॉन्च केले जातील.

जर्मन टेक ब्लॉग विनफ्यूचरला यूरोपियन ऑनलाइन रिटेलर्स कडून याची माहिती मिळाली आहे कि दोन्ही फोन पिक्सल 3ए आणि पिक्सल 3ए एक्सएल नावाने सादर केले जातील. तसेच यात 64जीबी इंटरनल स्टोरेज असेल. पण रिपोर्ट मध्ये स्टोरेज वाढवण्याची कोणतीही माहिती उपलब्ध नाही.

हे देखील वाचा: कशाप्रकारे करावा आधार कार्ड मध्ये मोबाईल नंबर अपडेट आणि जाणून घ्या शुल्क

रिपोर्ट मध्ये अशी माहिती समोर आली आहे कि फोन ब्लॅक आणि वाइट कलर वेरीएंट मध्ये सादर केला जाईल. तसेच तिसरा वेरीएंट आईरिस नावाने समोर येईल. बोलले जात आहे कि तिसरा कलर ब्लू आणि वॉयलेटचे कॉम्बिनेशन असेल. तसेच पिक्सल 3ए च्या किंमतीचा खुलासा झाला आहे, जी €450 (जवळपास 34,950 रुपये) असेल. तसेच पिक्सल 3ए एक्सएल थोड्या जास्त किंमतीत लॉन्च केला जाईल.

आतापर्यंत समोर आलेला माहितीनुसार पिक्सल 3ए एक्सएल 4जीबी रॅम सह येईल. गीकबेंच लिस्टिंग मधून समजले आहे कि गूगल पिक्सल 3ए एक्सएल एंडरॉयडच्या लेटेस्ट ओएस एंडरॉयड 9 पाई वर सादर केला जाईल तसेच या फोन मध्ये 1.71गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेला ऑक्टा-कोर प्रोसेसर मिळेल. तसेच गीकबेंच ने स्पष्ट केले आहे कि पिक्सल 3ए एक्सएल मधे क्वालकॉमचा स्नॅपड्रॅगॉन चिपसेट दिला जाईल.

हे देखील वाचा: सॅमसंगला चोख उत्तर देण्यासाठी तयार आहे शाओमी, लवकरच येत आहे फोल्डेबल फोन

काही दिवसांपूर्वी गूगल पिक्सलच्या फोर्थ जनरेशन हँडसेट पिक्सल 4 बद्दल माहिती समोर आली होती. गूगल पिक्सल 4 मध्ये फ्रंटला पण डुअल कॅमेरा सेटअप असू शकतो. तसेच स्मार्टफोन मध्ये पंचहोल डिस्प्ले दिला जाऊ शकतो. पंचहोल डिस्प्ले आपण आतापर्यंत हॉनर आणि सॅमसंगच्या फोन मध्ये बघितला आहे. पण लीक इमेज मध्ये फिंगरप्रिंट स्कॅनर दिसत नाही. आशा आहे कि फोन मध्ये इन-डिस्प्ले फोन फिंगरप्रिंट सेंसर असेल. याआधी हा स्मार्टफोन बेंचमार्किंग वेबसाइट गीकबेंच वर दिसला होता. गीकबेंच वर गूगल पिक्सल 4 ने सिंगल कोर टेस्ट मध्ये 744 आणि मल्टिकोर टेस्ट मध्ये 3201 प्वाइंट्स स्कोर मिळवले होते.

सोर्स

The post लॉन्चच्या आधी आली गूगल पिक्सल 3ए आणि 3ए एक्सएल ची किंमत, बघा किती स्टाइलिश आहे हा फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/google-pixel-3a-and-pixel-3a-xl-price-storage-and-colors-details/feed/ 0
सॅमसंग नंतर आता गूगल पण देईल शाओमीला टक्कर, घेऊन येत आहे 2जीबी रॅम असलेला स्वस्तातला फोन https://www.91mobiles.com/marathi/google-pixel-3a-listed-on-geekbench-with-2gb-ram-specification-feature-in-hindi/ https://www.91mobiles.com/marathi/google-pixel-3a-listed-on-geekbench-with-2gb-ram-specification-feature-in-hindi/#respond Mon, 11 Feb 2019 13:09:32 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3597 आता गूगलचे आगामी पिक्सल फोन पण लो बजेट मध्ये शाओमीला चांगली स्पर्धा देतील

The post सॅमसंग नंतर आता गूगल पण देईल शाओमीला टक्कर, घेऊन येत आहे 2जीबी रॅम असलेला स्वस्तातला फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
फ्लॅगशिप सेग्मेंट मध्ये पिक्सल स्मार्टफोन हिट केल्यानंतर आता गूगलची नजर लो बजेट स्मार्टफोन्स वर आहे. गेल्या काही दिवसांपासून बातम्या पण येत आहेत कंपनी लवकरच नवीन पिक्सल स्मार्टफोन आणणार आहे. गूगलचे हे नवीन पिक्सल स्मार्टफोन पिक्सल 3 आणि पिक्सल 3 एक्सएल चे छोटे वर्जन असतील. अलीकडेच चीनी बेंचमार्किंग साइट गीकबेंच वर पिक्सल 3ए एक्सएल स्मार्टफोन दिसला होता तर आता या सीरीजचा अजून एक स्मार्टफोन पिक्सल 3ए पण गीकबेंच वर लिस्ट झाला आहे. या लिस्टिंग मध्ये पिक्सल 3ए चे महत्वाचे स्पेसि​​फिकेशन्स समोर आले आहेत.

पिक्सल 3ए कि पिक्सल 3 लाइट?

गूगलच्या आगामी स्मार्टफोन्स बद्दल प्रश्न असा होता कि कंपनी आपले स्वस्त डिवाईसेज कोणत्या नावाने बाजरात आणेल. अनेक लीक्स मध्ये या स्मार्टफोन्सची नावे गूगल पिक्सल 3 लाइट आणि पिक्सल 3 एक्सएल लाइट असल्याचे सांगण्यात येत होते तर अनेक लीक्स मध्ये पिक्सल 3ए आणि पिक्सल 3ए एक्सएल बोलले जात होते. गीकबेंचच्या या लिस्टिंग ने या प्रश्नाचे उत्तर देत सांगतिले आहे कि गूगल आपले स्वस्तातले स्मार्टफोन्स पिक्सल 3ए आणि पिक्सल 3ए एक्सएल नावांसह लॉन्च करेल.

महत्वाचे स्पेसिफिकेशन्स आले समोर

गीकबेंच वर पिक्सल 3ए 2जीबी रॅम सह येणार असल्याचे सांगितले आहे. लिस्टिंग मध्ये समजले आहे कि गूगलचा हा आगामी स्मार्टफोन किमतीच्या बाबतीती कमी जरी असला तरी एंडरॉयडच्या नवीन ऑपरेटिंग सिस्टम एंडरॉयड 10 सह लॉन्च होईल. तुम्ही ऐकून हैराण व्हाल कि एंडरॉयड 10 आतापर्यंत ऑफिशियली लॉन्च पण झालेल्या नाही. अर्थात् पिक्सल 3ए सोबतच हा एंडरॉयड चा हा नवीन ओएस पण बाजारात येईल.

48-एमपी कॅमेरा असेलेल्या वाले ओपो आर19 चा फोटो लीक, फोन मध्ये असेल पॉप-अप सेल्फी कॅमेरा

गूगल पिक्सल 3ए गीकबेंच वर ऑक्टा-कोर प्रोसेसर सह एमएसएम8953 चिपसेट ने सुसज्ज असल्याचे सांगण्यात आले आहे. हा चिपसेट क्वालकॉमचा आहे ज्याला स्नॅपड्रॅगॉन 625 पण म्हटले जाते. स्कोर पाहता पिक्सल 3ए ला गीकबेंच वर सिंगल-कोर मध्ये 732 स्कोर देण्यात आला आहे तसेच मल्टी-कोर मध्ये हा फोनला 3184 स्कोर मिळाला आहे. विशेष म्हणजे गीकबेंच वर पिक्सल 3ए काल म्हणजे 10 फेब्रुवारीला लिस्ट केला गेला आहे.

सॅमसंग गॅलेक्सी एम30 आला समोर, ट्रिपल रियर कॅमेऱ्यासह असेल इनफिनिटी वी एमोलेड डिस्प्ले आणि 5,000एमएएच बॅटरी

गूगल पिक्सल फोन आतापर्यंत हाईएंड स्पेसिफिकेशन्स सह फ्लॅगशिप रेंज मध्ये लॉन्च होत होते तर पिक्सल 3ए आणि पिक्सल 3ए एक्सएल कंपनी लो बजेट मध्ये लॉन्च करेल. अलीकडेच सॅमसंगच्या एम सीरीज ने शाओमीआला मोठी टक्कर दिली आहे त्यात आता गूगलचे आगामी पिक्सल फोन पण लो बजेट मध्ये शाओमीला चांगली स्पर्धा देतील. गूगलचे आगामी ​पिक्सल गीकबेंच वर लिस्ट झाल्यांनतर बोललेलं जात आहे कि गूगल लवकरच पिक्सल 3ए आणि पिक्सल 3ए एक्सएल सादर करेल.

The post सॅमसंग नंतर आता गूगल पण देईल शाओमीला टक्कर, घेऊन येत आहे 2जीबी रॅम असलेला स्वस्तातला फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/google-pixel-3a-listed-on-geekbench-with-2gb-ram-specification-feature-in-hindi/feed/ 0