Vivo Y95 आणि Y91 च्या किंमतीत झाली मोठी कपात, बघा नवीन किंमत

स्मार्टफोन बनविणारी कंपनी वीवो ने आपल्या दोन स्मार्टफोन्सची किंमत कमी केली आहे. कंपनी ने Vivo Y95 आणि Vivo Y91 च्या किंमतीत 1,000 रूपयांची कपात केली आहे. विशेष म्हणजे या दोन्ही फोन्सची किंमत आधीपण कमी करण्यात आली आहे. जर तुम्ही नवीन स्मार्टफोन विकत घेण्याचा विचार करत असाल तर हे दोन्ही फोन कमी किंमतीत विकत घेता येतील.

Vivo Y95 आणि Vivo Y91 च्या कमी झालेल्या किंमतीची माहिती 91मोबाईल्सला रिटेल सोर्स कडून मिळाली आहे. Vivo Y91 व्यतिरिक्त VivoY95 च्या किंमतीत पण 1,000 रूपयांची कपात करण्यात आली आहे. Vivo Y91 ची किंमत आधीपण की 1,000 रुपयांनी कमी करण्यात आली आहे, ज्यामुळे हा फोन 9,990 रुपयांमध्ये सेल विकला जात होता. आता पुन्हा एकदा किंमत कमी झाल्यामुळे हा फोन 8,990 रुपयांमध्ये मिळत आहे. तर Vivo Y95 ची किंमत पहिल्यांदा कमी करण्यात आली आहे. या कपातीनंतर हे दोन्ही फोन ऑफलाइन रिटेल स्टोर वर विकत घेता येतील.

हे देखील वाचा: Samsung Galaxy S10 5G model मध्ये लागली ​आग, यूजरचे झाले मोठे नुकसान

Vivo Y95 ची किंमत आणि स्पेसिफिकेशन्स
Vivo Y95 मध्ये 6.22-इंचाची फुल एचडी+ स्क्रीन देण्यात आली आहे. तसेच फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन चिपसेट वर आधारित आहे. फोन मध्ये 4जीबी रॅम व 64जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. यात मेमरी कार्ड सपोर्ट आहे. तसेच हा फोन फनटच ओएस 4.5 वर चालतो जो एंडरॉयड ऑपरेटिंग सिस्टम 8.1 ओरियो आधारित आहे.

वीवो वाई 95 मध्ये डुअल सिम सपोर्ट आहे आणि तुम्ही 4जी वोएलटीई वापरू शकाल. फोटोग्राफी पाहता बॅक पॅनल वर 13एमपी + 2एमपी डुअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. सोबत 20-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. कॅमेर्‍या सोबत तुम्हाला प्रो मोड आणि फेस ब्यूटी सारखे आॅप्शन मिळतील. तसेच Vivo Y95 मध्ये पवार बॅकअप साठी 4,030एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

हे देखील वाचा: Moto E6 चे स्पेसिफिकेशन्स झाले लीक, लवकरच होईल लॉन्च

Vivo Y91 चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स
Vivo Y91 बद्दल बोलायचे तर यात 6.22-इंचाचा फुलव्यू एचडी+ डिस्प्ले आहे. सोबत फोन मीडियाटेक हेलीयो पी22 चिपसेट वर आधारित आहे. तसेच फोन मध्ये 2जीबी रम आणि 32जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे जी माइक्रोएसडी कार्डद्वारे 256जीबी पर्यंत वाढवता येते.

फोन मध्ये फोटोग्राफी साठी रियर पॅनल वर एफ/2.2 अपर्चर वाला 13-मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा आणि एफ/2.4 अपर्चर वाला 2 मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच सेल्फी साठी फोनच्या फ्रंटला 8-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे.

फोन मध्ये पावर बॅकअप साठी 4,030एमएएच ची पावरफुल बॅटरी आहे. तसेच Vivo Y91 डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. फोन मध्ये वाई-फाई, ब्लूटूथ सारखे कनेक्टिविटी ऑप्शन्स आहेत. सिक्योरिटी व अनलॉकिंग साठी Vivo Y91 फेस अनलॉक फीचरला सपोर्ट करतो तसेच फोनच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर पण देण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here